Home » नागरी, राष्ट्रीय » भारताचा विकास दर ७४ टक्के

भारताचा विकास दर ७४ टक्के

=एस ऍण्ड पीचा अंदाज=

नवी दिल्ली, [३ डिसेंबर] – २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.४ टक्के राहील आणि पुढच्या आर्थिक वर्षात तो वाढून ८ टक्के होऊ शकतो, असा अंदाज स्टॅण्डर्ड ऍण्ड पूअर्स (एसऍण्डपी) या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने वर्तविला आहे.
भारतीय कॉर्पोरेट्‌स आणि बँकांना सध्या कमकुवत संचालन वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांची नितांत गरज आहे, असे एसऍण्डपीने इंडिया क्रेडिट स्पॉटलाईट या शीर्षकांतर्गत प्रकाशित अहवालात म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.३ टक्के दराने आर्थिक विकास झाला होता.
३१ मार्च २०१६ रोजी संपणार्‍या चालू आर्थिक वर्षात भारत ७.४ टक्के दराने विकास करेल आणि पुढील आर्थिक वर्षात हा दर ८ वर जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात चीनला मागे टाकत भारताने अग्रस्थान प्राप्त केले असून, यावरूनच भारताचे वाढते महत्त्व लक्षात येते, असेही एसऍण्डपीने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25966

Posted by on Dec 4 2015. Filed under नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in नागरी, राष्ट्रीय (577 of 1125 articles)


=सर्वतोपरी मदत करणार= नवी दिल्ली, [३ डिसेंबर] - तामिळनाडूतील गंभीर पूरपरिस्थितीवर केंद्राची नजर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला तातडीची ...

×