|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 5.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear

१०० वे सुखोई-३० हवाई दलाकडे सुपूर्द

१०० वे सुखोई-३० हवाई दलाकडे सुपूर्द– एचएएलची जबरदस्त कामगिरी, नाशिक, (०८ एप्रिल) – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शुक्रवारी १०० वे सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग करून हवाई दलाच्या सुपूर्द केले. यासह, शुक्रवारीच एचएएलने लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजसचे उत्पादन वाढवण्यासाठी तिसरी असेम्बली लाईन उघडली आहे, ज्याचे उद्घाटन देशाचे संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांनी केले. संरक्षण बाजारपेठेत आक्रमकपणे स्पर्धा करण्यासाठी आणि मानवरहित वाहनांसारख्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एचएएलला पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले....8 Apr 2023 / No Comment /

आता येणार ‘ब्रह्मास्त्र’, कर्णाच्या कवचासारखा मजबूत

आता येणार ‘ब्रह्मास्त्र’, कर्णाच्या कवचासारखा मजबूत-भारत लवकरच करणार चाचणी, नवी दिल्ली, (०५ एप्रिल) – भारतीय हवाई दल लवकरच एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेची चाचणी घेणार आहे. ही यंत्रणा म्हणजे एक प्रकारे ‘ब्रह्मास्त्र’सारखीच अभेद्य आणि महाभारतातील कर्णाच्या कवचासारखी मजबूत आहे. ही क्षेपणास्त्र यंत्रणा रशियाकडून भारताला प्राप्त झाली आहे. भारतात आणण्यापूर्वी या प्रणालीची चाचणी झाली होती, पण भारतात अद्याप त्याची चाचणी झालेली नाही. या चाचणीची तयारी हवाई दलाने सुरू केली असून, लवकरच ती करण्यात येणार आहे, अशी माहिती...5 Apr 2023 / No Comment /

बेकायदेशीर कृतीमुळे वाढू शकते नियंत्रण रेषेवर तणाव

बेकायदेशीर कृतीमुळे वाढू शकते नियंत्रण रेषेवर तणाव– लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे प्रतिपादन, पुणे, (२८ मार्च) – बेकायदेशीर कृती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढवणारी ठरू शकते आणि कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताने तयारी करून ठेवली आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. जागतिक सुरक्षा प्रदाता म्हणून अमेरिकेची जागा घेण्याची इच्छा चीनला आहे तसेच कट्टर प्रतिस्पर्धी सौदी अरब आणि इराण यांच्यातील अलिकडील शांतता चर्चेत मध्यस्थी करण्यात तसेच रशिया व युक्रेन युद्धात शांतता योजना या देशाने...28 Mar 2023 / No Comment /

यूएस-चीन शत्रुत्वामुळे इंडो-पॅसिफिक शस्त्रास्त्र शर्यत: नौदल प्रमुख

यूएस-चीन शत्रुत्वामुळे इंडो-पॅसिफिक शस्त्रास्त्र शर्यत: नौदल प्रमुखनवी दिल्ली, (१४ मार्च) – इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिका आणि चीन यांच्यातील मॅरेथॉन शत्रुत्वाचा साक्षीदार आहे, ज्यामुळे या प्रदेशात नौदल शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झाली आहे. हेच कारण आहे की बीजिंगने गेल्या दशकात आपल्या नौदलाच्या ताफ्यात १४८ युद्धनौका समाविष्ट करून आपली नौदल क्षमता वाढवली आहे, जी भारतीय नौदलाच्या सामर्थ्याइतकी आहे, असे नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले. विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन येथे झालेल्या व्याख्यानात नौदल प्रमुखांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले...14 Mar 2023 / No Comment /

आकाशातून टेहळणी करतील भारतीय जवान

आकाशातून टेहळणी करतील भारतीय जवान– ‘जेटपॅक फ्लाईंग सूट’ची यशस्वी चाचणी, नवी दिल्ली, (५ मार्च) – दुर्गम सीमा भागांत शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आता भारतीय जवान पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडून टेहाळणी करू शकतील. भारतीय सैन्याने ब्रिटिश कंपनीकडून जेटपॅक फ्लाईंग सूट मागवले आहेत. त्याची चाचणी नुकतीच उत्तरप्रदेशातील आग्रा येथे घेण्यात आली. देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय सैन्य सातत्याने आधुनिकरणाची योजना आखते. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ग्रव्हिटी इंडस्ट्रीज या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या जेटपॅक सूटची चाचणी...5 Mar 2023 / No Comment /

पंजाबमध्ये पाडलेल्या पाकी ड्रोनने केले होते चीनमध्ये उड्डाण

पंजाबमध्ये पाडलेल्या पाकी ड्रोनने केले होते चीनमध्ये उड्डाण– न्यायवैद्यक विश्लेषणातील माहिती, नवी दिल्ली, (१ मार्च) – पंजाबमधील अमृतसर सेक्टरमध्ये मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी पाडण्यात आलेल्या पाकिस्तानी ड्रोनने भारतात घुसखोरी करण्यापूर्वी चीनमध्ये तसेच पाकिस्तानमधील २८ ठिकाणांवर उड्डाण केले होते, अशी माहिती न्यायवैद्यक विश्लेषणातून समोर आल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपल्या अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी बीएसएफच्या पथकाने पाकिस्तानातून आलेले ड्रोन पाडले होते. या प्रकरणाच्या तपासाचा आदेश देण्यात आला होता. हा अहवाल त्या तपासाचा भाग...1 Mar 2023 / No Comment /

’त्या’ काश्मिरी पंडिताच्या हत्येतील दोन्ही दहशतवादी ठार

’त्या’ काश्मिरी पंडिताच्या हत्येतील दोन्ही दहशतवादी ठारकारवाईत एक जवानही शहीद, जम्मू, (२८ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दोन्ही दहशतवाद्यांचा यापूर्वी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत हात असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. या भागातील एका मशिदीत दहशतवादी लपून बसले होते. त्यामुळे सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि अत्यंत सावधगिरीने कारवाई केली. सुरक्षा दलांना सशस्त्र दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली...28 Feb 2023 / No Comment /

पाक आणि पीओकेमधील दहशतवाद्यांवर कारवाई होणार

पाक आणि पीओकेमधील दहशतवाद्यांवर कारवाई होणारनवी दिल्ली, (२६ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट रचणार्‍या पाकिस्तान आणि पीओकेमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांवर लवकरच कारवाई केली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीर पोलीस आणि आयबीसह अशा दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, जम्मूमधील डोडा येथून सर्वाधिक ११८ दहशतवादी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये बसून दहशतवादी घटनांचा कट रचतात. असे दहशतवादी परदेशी हल्ले करतात. आता भारत सरकारने काश्मिरी दहशतवाद्यांवर तातडीने कारवाई करण्याची योजना आखली आहे. अशा दहशतवाद्यांवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध)...26 Feb 2023 / No Comment /

भारतीय लष्कराने संपविल्या या जुन्या परंपरा!

भारतीय लष्कराने संपविल्या या जुन्या परंपरा!नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या अनेक जुन्या प्रथा भारतीय लष्करात संपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, सैन्याच्या सार्वजनिक कार्यक्रमात घोडागाडीचा वापर, लष्करी अधिकार्‍याच्या निवृत्तीच्या वेळी काढण्यात येणारा समारंभ आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी पाईप बँडचा वापर.आता हे सर्व संपले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने आपल्या तुकड्यांना आदेश जारी केले आहेत. समारंभीय कर्तव्यांसाठी युनिट्स किंवा फॉर्मेशनमध्ये बग्गीचा वापर बंद केला जाईल आणि या कर्तव्यांसाठी वापरण्यात येणारे घोडे...25 Feb 2023 / No Comment /

संयुक्त अरब अमीरातमध्ये युद्धाभ्यास करणार आयएएफ!

संयुक्त अरब अमीरातमध्ये युद्धाभ्यास करणार आयएएफ!नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्‍या बहुपक्षीय सरावात भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे. हा सराव २७ फेब्रुवारीपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होईल आणि १७ मार्चपर्यंत चालेल. या युद्धाला एक्स डेझर्ट फ्लॅग असे नाव देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या सरावात भारतीय हवाई दल पाच हलकी लढाऊ विमाने तेजस आणि दोन सी-१७ सह सहभागी होणार आहे. एलसीए तेजसची निर्मिती फक्त भारतातच करण्यात आली आहे. भारतीय...25 Feb 2023 / No Comment /

तुर्कीमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक

तुर्कीमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक-भारतीय सैन्याने तुर्कीमध्ये ६ तासांत बांधले हॉस्पिटल, अंकारा, (२१ फेब्रुवारी ) – विनाशकारी भूकंपामुळे हाहाकार माजवणार्‍या तुर्कस्तानमध्ये भारताने राबवलेल्या ’ऑपरेशन दोस्त’चे कौतुक होत आहे. तुर्कस्तानमध्ये भारतीय लष्कराने ज्या प्रकारे तातडीने मदत उपलब्ध करून दिली, त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराने तुर्कीमध्ये सुमारे ३६०० रुग्णांवर उपचार केले. त्यांनी सांगितले की, तुर्कस्तानचे नागरिक यासाठी मेसेज पाठवून कृतज्ञता व्यक्त करत आहेत. तुर्कस्तानच्या रुग्णांचे म्हणणे आहे की,...21 Feb 2023 / No Comment /

स्वदेशी शस्त्रांच्या खरेदीवर एक लाख कोटी राखीव: राजनाथसिंह

स्वदेशी शस्त्रांच्या खरेदीवर एक लाख कोटी राखीव: राजनाथसिंहबंगळुरू, (१५ फेब्रुवारी ) – अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राकरिता जी भांडवली तरतूद करण्यात आली आहे, त्यातील ७५ टक्के निधी देशात उत्पादन होणार्या शस्त्र आणि अन्य उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी येथे केली. बंगळुरू येथे मागील तीन दिवसांपासून एअरो इंडिया शो सुरू आहे. यात अमेरिकेसह इतर काही देश सहभागी झाले आहेत. यात अनेक महत्त्वाचे संरक्षण करारही होत आहेत. याच कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी उपरोक्त घोषणा...15 Feb 2023 / No Comment /