|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 1.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.99°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear

प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना सॅल्यूट: राजनाथ सिंह

प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना सॅल्यूट: राजनाथ सिंह– पुलवामा हल्ल्याला चार वर्षे, नवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी ) – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांसोबत देश खंबीरपणे उभा आहे. देश त्यांच्या धैर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला सॅल्यूट करतो, असे ट्विट संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी केले. पुलवामा घटनेला आज चार वर्षे झालीत. मी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे....14 Feb 2023 / No Comment /

ध्रुव हेलिकॉप्टर तटरक्षक दलात दाखल होणार

ध्रुव हेलिकॉप्टर तटरक्षक दलात दाखल होणारनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी ) – भारतीय तटरक्षक दलात पुढील काही दिवसांत नऊ स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टर दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकत आणखी वाढणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे कार्यवाहक प्रमुख राकेश पाल यांनी सांगितले की, लवकरच तटरक्षक दलात नऊ स्वदेशी एलएच ध्रुव हेविलकॉप्टर्स दाखल होतील. यानंतर त्यांना ऑपरेशनल क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात येईल....14 Feb 2023 / No Comment /

नौदलाने वाचविले ११ पायलट व्हेलचे प्राण!

नौदलाने वाचविले ११ पायलट व्हेलचे प्राण!कोलंबो, (१२ फेब्रुवारी ) – श्रीलंकेतील पुट्टलम येथील समुद्रकिनार्‍यावर तीन व्हेल मृतावस्थेत आढळून आले. याबाबत मच्छिमारांनी नौदलाला माहिती दिली. तात्काळ कारवाई करत नौदलाने किनार्‍यावर अडकलेल्या आणखी ११ पायलट व्हेलला खोल पाण्यात परत आणले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशांना खोल पाण्यात नेण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलासह कंदाकुझी मच्छिमार समुदायाच्या लोकांनी तासनतास काम केले. यासाठी त्यांना व्हेल माशांना पुन्हा खोल समुद्रात नेण्यासाठी यांत्रिक बोटींचा वापर करावा लागला. तिथेच श्रीलंकेचा मत्स्य विभाग...12 Feb 2023 / No Comment /

पाकी ड्रोनमधून आलेले शस्त्र, ड्रग्ज जप्त

पाकी ड्रोनमधून आलेले शस्त्र, ड्रग्ज जप्त– पंजाबच्या सीमेवर बीएसएफची कारवाई, चंदीगड, (१० फेब्रुवारी ) – पाकिस्तानी ड्रोनमधून पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाठविण्यात आलेले शस्त्र आणि मादक पदार्थ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले आहे. यात पोलिसांनीही जवानांना मदत केली. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात चीन बनावटीच्या पिस्तूल, काडतुसा आणि तीन किलो हेरॉईनचा समावेश आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी आज शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. तरणतारण जिल्ह्यातील खेमकरण येथे ड्रोन दिसल्यानंतर त्याबाबतची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे...10 Feb 2023 / No Comment /

भारतीय तटरक्षक दलाला समुद्रात सापडले १०.५ कोटींचे सोने!

भारतीय तटरक्षक दलाला समुद्रात सापडले १०.५ कोटींचे सोने!नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी ) – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने १०.७४ किलो विदेशी सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत १० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सोने वेगवेगळ्या १४ पॅकेटमध्ये लपवले होते. वेगवेगळ्या स्वरूपात ज्यामध्ये बार, चेन, काठ्या, टॉवेलमध्ये लपलेले होते. तीन तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तामिळनाडूमधील वेधलाई/मंडपम, रामनाथपुरम येथील टोळी श्रीलंकेतून मासेमारी बोटीतून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा...10 Feb 2023 / No Comment /

आमच्या एनडीआरएफचा अभिमान आहे : गृहमंत्री अमित शहा

आमच्या एनडीआरएफचा अभिमान आहे : गृहमंत्री अमित शहानवी दिल्ली, (१० फेब्रुवारी ) – तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपाने (तुर्की सीरिया भूकंप) हजारो लोकांचा जीव घेतला. येथे बचावकार्य जोरात सुरू आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तुर्कस्तानमधून एक अशी बातमी आली आहे, जी ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. वास्तविक, आमच्या एनडीआरएफ टीमने एका ६ वर्षाच्या मुलीला ढिगार्‍यातून वाचवले आहे. टीम इंड-११ ने गॅझियानटेप शहरातील बेरेनमध्ये एका मुलीचे प्राण वाचवले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत...10 Feb 2023 / No Comment /

आयएनएस विक्रांत जूनपर्यंत सक्रिय !

आयएनएस विक्रांत जूनपर्यंत सक्रिय !नवी दिल्ली, (९ फेब्रुवारी ) – विमानवाहू नौकेसाठी भारत स्वतःचे ट्विन-इंजिन डेक-आधारित लढाऊ विमान विकसित करणार आहे. नौदल सध्या २६ राफेल एम लढाऊ विमाने खरेदी करणार असून, मार्चमध्ये करार होण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांतच्या डेकवर हलके लढाऊ विमान (एलसीए ) नौदल आणि मिग-२९ लढाऊ विमानांचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर, या वर्षाच्या मध्यापर्यंत विमानवाहू जहाज पूर्णपणे कार्यान्वित होईल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नौदलात कार्यान्वित होऊनही, ते पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही कारण तिची प्राथमिक...9 Feb 2023 / No Comment /

२०२२ मध्ये १८७ दहशतवाद्यांचा खात्मा

२०२२ मध्ये १८७ दहशतवाद्यांचा खात्मानवी दिल्ली, (८ फेब्रुवारी ) – २०२२ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये एकूण १८७ दहशतवादी मारले गेले आणि १११ दहशतवादविरोधी कारवाया करण्यात आल्या असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत त्यांनी माहिती दिली. भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी ही माहिती दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अंतराळ पर्यटनासाठीच्या व्यवहार्यता अभ्यासाबाबत तपशील दिला....8 Feb 2023 / No Comment /

जवानांनी पाकिस्तानातून आलेला ड्रोन पकडला

जवानांनी पाकिस्तानातून आलेला ड्रोन पकडलापंजाब, (८ फेब्रुवारी ) – पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनला गोळीबार करून ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा हे ड्रोन भारतीय हद्दीत घुसले होते. सध्या आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. बीएसएफने ही माहिती दिली आहे. बीएसएफने माहिती दिली की ७-८ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा, पंजाबच्या अमृतसर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना बीओपी बाबापीरच्या एओआरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे ड्रोन आढळले. त्यानंतर...8 Feb 2023 / No Comment /

आणि आयएनएस विक्रांतवर एलसीए विमानाचे लँडिंग यशस्वी!

आणि आयएनएस विक्रांतवर एलसीए विमानाचे लँडिंग यशस्वी!नवी दिल्ली, (६ फेब्रुवारी ) – भारतीय नौदलाने सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजावर हलक्या लढाऊ विमानाचे (एलसीए) यशस्वी लँडिंग करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. नौदलातील सक्षम वैमानिकांनी हा पराक्रम गाजवला. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) खास नौदलासाठी डिझाइन केलेले आहेत. आयएनएस विक्रांत आणि एलसीए या दोन्ही विमानवाहू जहाजांची रचना भारतात करण्यात आली आहे, त्यामुळे आजचा दिवस भारतासाठीही अभिमानाचा क्षण...6 Feb 2023 / No Comment /

अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल

अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदलउमेदवारांना प्रथम प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – लष्कराने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. आतापासून सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रथम नियुक्त केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल, त्यानंतर भरती रॅली दरम्यान शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि त्यानंतर निवडीद्वारे प्रथम वैद्यकीय चाचणी पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत दलातील सैनिकांच्या भरतीसाठी तीन टप्प्यांचा तपशील देण्यात आला आहे. यापूर्वी...4 Feb 2023 / No Comment /

चीन वा पाकिस्तानला भारत जोरदार तडाखा देणार

चीन वा पाकिस्तानला भारत जोरदार तडाखा देणारनवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – आपल्या शस्त्रसामुग्रीच्या आधारावर भारत चीन वा पाकिस्तानला जोरदार तडाखा देण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय स्वदेशी संरक्षण क्षमता वाढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. क्षेपणास्रांच्या स्वदेशी निर्मितीलाही प्रोत्साहन मिळत आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी शुक‘वारी लोकसभेत दिली. भारताने मागील पाच वर्षांमध्ये अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल, स्पेन यासारख्या देशांकडून सुमारे १.९ लाख कोटी रुपये मूल्यांचे संरक्षण सामुग्री खरेदी केली आहे. यात हेलिकॉप्टर्स, रॉकेट, बंदुका, असॉल्ट...4 Feb 2023 / No Comment /