|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:04 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.32° C

कमाल तापमान : 30.98° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 5.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.32° C

Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.85°C - 30.89°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.01°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.15°C - 31.41°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.67°C - 32.91°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.17°C - 33.14°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

29.18°C - 33.01°C

sky is clear

जैशच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश; ६ दहशतवाद्यांना अटक

जैशच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश; ६ दहशतवाद्यांना अटककुलगाम, (३ फेब्रुवारी ) – सुरक्षा दलांनी शुक्रवारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि कुलगाम जिल्ह्यातील मिरहामा गावातून सहा दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. कुलगाम पोलिसांना या परिसरात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांना दहशतवादी लपण्याचे ठिकाण सापडले, तेथून सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा...3 Feb 2023 / No Comment /

अवनी चतुर्वेदीने प्रथमच विदेशात उडविले सुखोई विमान

अवनी चतुर्वेदीने प्रथमच विदेशात उडविले सुखोई विमान-संयुक्त हवाई युद्धसरावात सहभागी, नवी दिल्ली, (३० जानेवारी) – वीर गार्डियन-२०२३ या भारतीय दलाचा भाग बनलेली देशाची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी हिने पहिल्यांदाच विदेशात झालेल्या भारत-जपान मधील पहिल्या संयुक्त हवाई युद्धसरावात भाग घेतला. त्यामुळे तिचे देशभरात अभिनंदन होत आहे. जपानमध्ये १६ ते २६ जानेवारी या कालावधीत संयुक्त हवाई युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय वायुसेनेकडून चार सुखोई-३० एमकेआय, दोन सी-१७ आणि एक आयएल-७८ विमान, तर जपानकडून चार एफ-२...30 Jan 2023 / No Comment /

चीनच्या सिमेवर भारताची करडी नजर !

चीनच्या सिमेवर भारताची करडी नजर !नवी दिल्ली, (२७ जानेवारी) – सीमावर्ती गावांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून आधुनिकीकरणासाठी सुमारे २२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शुक्रवारी कोलकाता प्रेस क्लबमध्ये लष्कराच्या पूर्व कमांडचे जीओसी-इन-सी ईस्टर्न कमांड आरपी कलिता यांनी पत्रकार परिषद घेतली. भारत-चीन सीमेवर पाळत ठेवणे आणि गावांच्या आधुनिकीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे २२ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. ईस्टर्न कमांडचे जीओसी-इन-सी आरपी कलिता म्हणाले की, पूर्वेकडील सीमेवरील प्रादेशिक अखंडता...28 Jan 2023 / No Comment /

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर : लष्करप्रमुख

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर : लष्करप्रमुखनवी दिल्ली, १५ जानेवारी – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ‘जैसे थे’ स्थिती बदलविण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच हाणून पाडू. भारतीय लष्कराने यापूर्वी अनेकदा तसा स्पष्ट संदेश दिला आहे. सीमेवर अचानक उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी आपले लष्कर सदैव तत्पर आहेत, असा स्पष्ट आणि कठोर संदेश लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज शनिवारी अप्रत्यक्षरीत्या आपल्या शेजारी राष्ट्रांना दिला. लष्कर दिन परेडनिमित्त जवान आणि अधिकार्‍यांना संबोधित करताना जनरल नरवणे यांनी चीनसोबतच पाकिस्तानलाही एक प्रकारे...15 Jan 2022 / No Comment /

भारत-पाकिस्तान सीमेवर फडकला सवारत मोठा तिरंगा!

भारत-पाकिस्तान सीमेवर फडकला सवारत मोठा तिरंगा!नवी दिल्ली, १५ जानेवारी – राजस्थानच्या लोंगेवाल येथील भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात आज शनिवारी लष्कर दिनी जगातील सवारत मोठा तिरंगा फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, हा तिरंगा संपूर्ण खादीचा आहे. हा तिरंगा पाहण्यासाठी या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयातील सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९१ मध्ये लढल्या गेलेल्या युद्धात लोंगेवाल हे ठिकाण ऐतिहासिक असेच होते. यामुळेच जगातील हा...15 Jan 2022 / No Comment /

खराब हवामानामुळे रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

खराब हवामानामुळे रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघातहवाई दलाच्या चौकशीतील निष्कर्ष, नवी दिल्ली, १४ जानेवारी – सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी हवाईदलाच्या चौकशी समितीचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. चौकशी समितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता, किंवा दुर्लक्ष हे अपघाताचे कारण नव्हते. अचानकपणे बदललेल्या हवामानामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग भटकला आणि त्यामुळेच हा अपघात झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार, खोर्‍यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्यामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये अडकले आणि कोसळले. ढगांमुळे वैमानिक गोंधळला आणि हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊन जमिनीवर आदळले....14 Jan 2022 / No Comment /

सीमावाद संपेना! चर्चेची १४ वी फेरीही ठरली निष्फळ

सीमावाद संपेना! चर्चेची १४ वी फेरीही ठरली निष्फळनवी दिल्ली, १३ जानेवारी – लडाखमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष मिटवण्यासाठी भारत आणि चीनमदरम्यान सुरू असलेली लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची चौदावी फेरीही निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नसून, वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या उपायांवर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेचा वेग कायम ठेवण्यासाठी पुढील फेरी लवकरच होणे अपेक्षित आहे. दोन्ही देशांकडून याप्रकरणी प्रसिद्धीपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पार पडली...13 Jan 2022 / No Comment /

चीनला कठोरपणेच हाताळणार : लष्करप्रमुख

चीनला कठोरपणेच हाताळणार : लष्करप्रमुखनवी दिल्ली, १२ जानेवारी – चीनकडून धोका कमी झालेला नसल्याने या देशासोबत कठोर भूमिका घेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उच्च पातळीवरील सज्जता कायम ठेवली जाणार आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. सोबतच सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत चर्चाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उत्तर सीमेवर आम्ही उच्च पातळीवरील सज्जता कायम ठेवणार आहोत. त्याचवेळी पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत चर्चा करू, असे त्यांनी पूर्व लडाख सीमावादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पत्रपरिषदेत...12 Jan 2022 / No Comment /

खबरदार, पाऊल पुढे टाकाल तर…

खबरदार, पाऊल पुढे टाकाल तर…भारतीय जवानांनी ‘ड्रॅगन’ला पिटाळले, इटानगर, २ जानेवारी – चिनी लष्करातील सैनिकांनी भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील हद्दीत शिरून आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी जोरदार हरकत घेतली आणि ‘खबरदार, एक पाऊल आणखी पुढे टाकाल तर,’ अशी थेट धमकी देत चिनी सैनिकांना पिटाळून लावले. या घटनेचा व्हिडीओही समाजमाध्यमांतून व्हायरल झाला आहे. भारतीय जवानांचे मनोबल चिनी सैनिकांच्या तुलनेत किती तरी जास्त असल्याचे या व्हिडीओतून अधोरेखित झाले. भारतीय लष्कर वा संरक्षण मंत्रालयातर्फे या घटनेबद्दल...3 Jan 2022 / No Comment /

महामारी हाताळण्यासाठी जागतिक सहकार्य गरजेचे

महामारी हाताळण्यासाठी जागतिक सहकार्य गरजेचेलष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन, पुणे, २० डिसेंबर – कोरोना महामारीने आपल्याला बरेच धडे शिकवले आहेत आणि यासारख्या महामारी हाताळण्यासाठी क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज सोमवारी केले. बिमस्टेक देशांसाठी आपत्ती व्यवस्थापन पैलूंमध्ये संयुक्तता वाढवणे आणि क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने येथे दोन दिवसीय पानेक्स-२१ या बहुराष्ट्रीय आणि बहुसंस्था परिषदेचे उद्घाटन नरवणे यांच्या हस्ते झाले. जगभराला तडाखा दिलेल्या कोरोनाने आपल्याला प्रतिबंधात्मक नियंत्रण, शमन...21 Dec 2021 / No Comment /

तोयबाच्या अतिरेक्याचा खात्मा

तोयबाच्या अतिरेक्याचा खात्माश्रीनगर, १९ डिसेंबर – येथील हरवान परिसरात आज रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानी अतिरेक्याचा खात्मा केला. परिसरात अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी हरवान परिसराला वेढा दिला. जवानांना पाहताच पळ काढताना अतिरेक्याने जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात तो ठार झाला. सैफुल्ला उर्फ अबू खालिद असे ठार झालेल्या अतिरेक्याचे नाव असून, तो पाकिस्तानातील कराचीचा रहिवासी आहे. त्याने २०१६ मध्ये काश्मिरात घुसखोरी केली होती. तो हरवान परिसरात सक्रिय होता...19 Dec 2021 / No Comment /

‘त्या’ दुर्घटनेची चौकशी निर्धारित प्रक्रियेत

‘त्या’ दुर्घटनेची चौकशी निर्धारित प्रक्रियेतविवेक चौधरी यांची माहिती, काही आठवड्यांचा कालावधी लागणार, हैदराबाद, १८ डिसेंबर – तीनही दलांच्या पथकाकडून हेलिकॉप्टर दुर्घटनेची कोर्ट ऑफ इन्क्वायरी निर्धारित प्रक्रियेप्रमाणे केली जाईल आणि या दुर्घटनेतील प्रत्येक पैलूचा तपास केला जाईल, अशी माहिती वायुदलप्रमुख विवेक चौधरी यांनी आज शनिवारी दिली. दुंडिगलजवळ असलेल्या वायुदलाच्या अकादमीत झालेल्या संयुक्त पदवी परेडवेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या चौकशीसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार असून, कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये आढळणार्‍या तथ्यांवर कोणतेही भाष्य करणार नाही. कोर्ट...18 Dec 2021 / No Comment /