richwood
richwood
richwood
Home » रुचिरा » रसगुल्ले

रसगुल्ले

rasgulleसाहित्य –
१. एक लिटर गाईचे दुध (कमी स्निग्धांश असलेले)
२. दोन ते अडीच वाट्या साखर
३. सहा वाट्या पाणी
४. दोन टेबलस्पून व्हाईट व्हीनीगार
५. दोन, तीन थेंब रोझ इसेन्स
कृती –
दुध गरम करायला ठेवा. मधून मधून हलवत रहावे साई येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुधाला उकळी येऊ द्यावी. उकळी आली की व्हीनीगार टाकून गास बारीक करावा व चमच्याने ढवळावे म्हणजे दुध फाटेल . नंतर एक चाळणी घ्यावी चाळणीत मलमलचे फडके टाकून त्यात दुध ओतून अर्धा तास तसेच ठेवावे म्हणजे पाणी निथळून जाईल. पाणी पूर्ण निथळल्यावर फडक्यातून तयार पनीर बाहेर काढावे. पनीर कुस्करून त्यातील पाणीमात्र काढू नये
नंतर पनीर परातीत घेऊन तळहाताने खूप मळावे. अगदी एकजीव करून घ्यावे. मोठ्या पातेल्यात २ वाट्या साखर ६ वाट्या पाणी घालून गासवर ठेवावे उकळी येईपर्यंत चमच्याने ढवळावे. आता मळलेल्या पनीरचे जेमतेम सारख्याच आकाराचे गोळे करून घ्यावेत. उकळलेल्या साखरेच्या पाण्यात पनीरचे गोळे एक एक करून सोडावेत किमान पाच मिनिटे गोळे पाकात उकळू द्यावेत. ग‍ॅस मोठा ठेवावा. नंतर पातेल्यावर झाकण ठेवून मोठ्या ग‍ॅससवर पाच मिनिटे गोळे परत उकळावेत झाकण काढून मोठ्या ग‍ॅससवर परत १ – २ मिनिटे उकळावेत. परत उकळताना त्यात पाव वाटी पाणी आधी घालावे. झाकण न ठेवता रसगुल्ले पूर्ण थंड होऊ द्यावेत. मग रोझ इसेन्स घालून गार करावेत. रसगुल्ले तयार.

Short URL: http://vrittabharati.in/?p=1590

Posted by on 2:06 am. Filed under रुचिरा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google