|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.7° C

कमाल तापमान : 29.23° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.27 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.23° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 29.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.4°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.26°C - 28.74°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.44°C - 28.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.35°C - 28.88°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.62°C - 29.09°C

scattered clouds
Home » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » भाजपाचे प्रसरण आणि कॉंग्रेसचे आकुंचन

भाजपाचे प्रसरण आणि कॉंग्रेसचे आकुंचन

•चौफेर : अमर पुराणिक•

आसाममध्ये भाजपानं स्पष्ट बहूमत मिळवत अभूतपुर्व असा विजय मिळवला. भाजपाच्या दृष्टीने खरे तर ‘पॅन इंडिया’ची प्रतिमा निर्माण करण्याची संधी होती. काही अंशी का होईना पण तशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपाने यश मिळवले आहे. या निवडणुकीत महत्त्वाच्या अशा आसाम आणि केरळ या दोन राज्यातील सत्ता गमावत कॉंग्रेस रसातळाला गेली आहे. कॉंग्रेसमुक्त भारतच्या दिशेने कॉंग्रेस स्वत:हूनच आणखी दोन पावले पुढे गेली आहे. ६० वर्षाहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही राष्ट्राचा विकास साधू न शकणार्‍या दिशाहीन कॉंग्रेसची ही स्थिती होणे साहजिक आहे. त्यामुळे भाजपाचे प्रसरण होणे आणि कॉंग्रेसचे आकुंचन होण हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.

bjp victory 2016पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. आसाममध्ये भाजपानं स्पष्ट बहूमत मिळवत अभूतपुर्व असा विजय मिळवला. तर पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्ये चांगली कामगीरी केली. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने तर तामिळनाडूत जयललिता यांनी आपला गड राखला. या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वात महत्त्वपुर्ण आणि लक्षणीय विजय ठरला तो आसाममधील भाजपाचा विजय. भाजपाच्या दृष्टीने खरे तर ‘पॅन इंडिया’ची प्रतिमा निर्माण करण्याची संधी होती. काही अंशी का होईना पण तशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजपाने यश मिळवले आहे. ७० च्या दशकानंतर राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून र्कॉग्रेसने आपली प्रतिमा गमवायला सुरुवात केली होती. तर ८० च्या दशकानंतर भाजपाने आपली राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. या निवडणुकीत महत्त्वाच्या अशा आसाम आणि केरळ या दोन राज्यातील सत्ता गमावत कॉंग्रेस रसातळाला गेली आहे. कॉंग्रेसमुक्त भारतच्या दिशेने कॉंग्रेस स्वत:हूनच आणखी दोन पावले पुढे गेली आहे. ६० वर्षाहून अधिक काळ सत्ता उपभोगूनही राष्ट्राचा विकास साधू न शकणार्‍या दिशाहीन कॉंग्रेसची ही स्थिती होणे साहजिक आहे. त्यामुळे भाजपाचे प्रसरण होणे आणि कॉंग्रेसचे आकुंचन होण हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने चांगलेच आहे असे म्हणावे लागेल.
खरे तर कॉंग्रेसच्या या दारूण पराभवाला कॉंग्रेस श्रेष्ठी, कॉँग्रेस नेते आणि कॉंग्रेसची भूमिका कारणीभूत आहे. जेएनयु मधल्या राष्ट्रद्रोही घोषणाबाजीचे समर्थन करणे कॉंग्रेसला महागात पडले आहे. स्वत: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयुमध्ये जाऊन कन्हैय्या कुमार, उमर खालिद आदी राष्टद्रोही कृत्यं करणार्‍यांचे समर्थन केले. दुसरी बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविषयी बदनामीकारक विधानं सलमान खुर्शिद आणि मणीशंकर अय्यर सारख्या नेत्यांनी केली. देशातील जनतेला दूधखूळी समजून काहीही वाह्यात आणि स्वैर विधानं आणि कृती करुन कॉंग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे संसदेचे कामकाज सतत गोंधळ घालून बंद पाडले. ही बाब देखील कॉंग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहे. कॉंग्रेस रसातळाला जात असताना नव्याने पक्षबांधणी करणे, तळागाळापासून पक्षसंघटन मजबूत करणे सोडून कॉंग्रेस उंटावरुन शेळ्या राखण्याचे काम करत आहे. दिल्लीत बसून काही उठवळ माध्यमांना हाताशी धरुन भाजपा सरकारवर, पंतप्रधान मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात, असंबद्ध विधान करण्यातच कॉंग्रेसने धन्यता मानली त्याचीच बक्षिसी जनतेने कॉंग्रेसला पराभवाच्या रुपात दिली आहे. राष्ट्रीय प्रश्‍नांवर, सामाजिक प्रश्‍नावर आणि विकासकामांबाबतीतही कॉंग्रेसने नकारात्मक भूमिका अखंडपणे राबवली आणि आत्मघात करुन घेतला. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड वगळता इतर सर्व राज्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. येत्या काळात कर्नाटक, हिमाचल आणि उत्तराखंडातूनही कॉंग्रेस हद्दपार होणार आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात भाजपा बलवान आहे त्यामुळे ही राज्यं येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा काबीज करणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवत असताना कॉंग्रेसचे आता ममता, जयललिता, नवीन पटनायक यांच्या पक्षांइतकेही स्थान रहिलेले नाही आणि याला कॉंग्रेसची करणीच जबाबदार आहे.
या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल अतिशय बोलके आणि दिशादर्शक आहेत. ३४ वर्षांचा डाव्यांचा गड पश्‍चिम बंगालमध्ये पुर्णपणे कोसळला आहे. डाव्यांनीही काही पोथीपंडीतांना हाताशी धरुन, कन्हैयाकुमारला चुचकारुन स्वत:च कम्युनिस्ट हद्दपार करण्यास हातभार लावला आहे. जमिनीशी नाळ तुटलेल्या कम्यूनिस्ट पक्षाची अशी अवस्था उंटावरुन शेळ्या राखण्याच्या वृत्तीमुळेच झाली आहे. कोठेतरी एक उक्ती वाचली होती की, ‘बंगाल तो तरबूज है जो बाहरसे हरा और भीतरसे लाल है’ पण आता ही उक्ती डाव्याबाबत खोटी ठरली आहे. ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ प्रमाणेच आता ‘वाम मुक्त भारत’ हे वाक्य खरे ठरले आहे. चीन्यांची हुजरेगीरी करणारे डावे भारतातून हद्दपार होणे राष्ट्रहीताच्या दृष्टीने आवश्यक आहे. पश्‍चिम बंगालपुरते का होईना पण हे खरे ठरले. चीन, रशियातून बंगालमार्गे भारतात आलेली कम्यूनिस्ट संस्कृती क्षीण होत होत बंगालच्या उपसागरात बूडाली हे बरे झाले. बंगालमध्ये डावे पराभूत झालेले असले तरी केरळमध्ये अजून डाव्यांचे मुळ शिल्लक आहे. भाजपाने केरळमध्ये आपले खाते उघडले आहे. भाजपाला केरळमध्ये एक जागा मिळाली आहे. भाजपाचे उमेदवार केरळमधील ज्येष्ठ नेते ओ राजगोपाळ यांनी ही मुहुर्तमेढ रोवली आहे. राजगोपाळ यांच्या विजयाबाबत पंतप्रधान मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. भाजपाला केवळ एक जागा मिळालेली असली तरी भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. भाजपाला जवळजवळ १४-१५ टक्के मते मिळाली आहेत. केरळप्रमाणेच पश्‍चिम बंगालमध्येही भाजपाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. तामिळनाडूचा आपला गड जयललिता यांनी कायम राखण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूत मात्र भाजपाची स्थिती सुधारलेली नाही.
आसाममध्ये मात्र भाजपाने इतिहास रचला आहे. अभूतपुर्व असा विजय आसाममध्ये भाजपाने नोंदवला आहे. भाजपाचा हा विजय म्हणजे ईशान्य आणि पुर्व भारतात भाजपाचे बस्तान बसण्याची ही दमदार सुरुवात आहे. आसाममध्ये ३० टक्क्याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत असे असतानाही भाजपाचा विजय झाला. गेल्या तीन दशकांपासून आसाम सतत कोणत्या ना कोणत्या आंदोलनाच्या विळख्यात सापडला गेला आहे. त्यामुळे आता सत्तेत आल्यामुळे भाजपाच्या दृष्टीने ही संधीही आहे आणि आव्हानही. आसाममध्ये भाजपाने सर्वानंद सोनोवाल सारखा उमदा आणि कर्मठ व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवला आहे त्याची फळे नक्कीच चांगली मिळणार आहेत. भाजपाच्या या विजयात पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमाणेच पक्षाचे महासचिव राम माधव यांनाही सिंहाचा वाट द्यावा लागेल. त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि धोरणीपणे निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. अनेक वर्षे ईशान्य भारतात संघाचे काम राम माधव यांनी केल्याने भाजपाला त्याची गोमटी फळे चाखायला मिळत आहेत. आसाम आणि केरळमध्ये गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय आहे. तेथील जनतेसाठी संघाच्या स्वयंसेवकांच्या दोन पिढ्‌या तेथे खपल्या आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वयंसेवकांनी राष्ट्रकार्य करत आपले पुर्ण जीवन ईशान्य भारतातील राज्यात घालवले आहे. त्यामुळे भाजपाचे संघटन मजबूत झाले आणि त्याचीच परिणीती म्हणून आज भाजपाची आसाममध्ये सत्ता आली आहे. २०११ च्या निवडणुकीत आसाममधून भाजपाने १३९ जागा लढवल्या होत्या पण एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी मात्र भाजपाने ८७ जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवले आहे.
संसदेच्या कामात विशेषत: राज्यसभेत या निवडणुकांच्या निकालांचा भाजपाला फायदा होणार आहे. राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसल्यामुळे विधेयकं मंजुर करण्यासाठी भाजपाला अडचण होत होती. पण आता आसाममधला विजय आणि ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्या विजयामुळे भाजपाला जीएसटी सारखी महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत पारित करुन घेणे सुखकर होणार आहे. ११ जून रोजी होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकांत ममता, जयललितांना आणि भाजपालाही फायदा होणार आहे. बीजेडी आणि जयललिता भाजपाच्या बाजूने आहेतच शिवाय आता ममता बॅनर्जीही सकारात्मक भूमिका घेतील कमीत कमी तटस्थ राहून मदत करतील.
भाजपाचा हा विजय लक्षणीय असला तरी खरे तर तो केवळ आसाम पुरताच मर्यादीत आहे असे म्हणावे लागेल. कारण प्रत्यक्ष सत्तेची गणितं जमवताना मतांची वाढलेली टक्केवारी फायद्याची ठरु शकत नाही. सन २०११ च्या या पाच राज्यातील निवडणुकांत भाजपाने पाचशेहून अधिक उमेदवार उभे केले होते. त्यात केवळ ५ उमेदवारच निवडून आले. तेव्हा कोणी तरी ‘भाजपाने या निवडणुका लढणे म्हणजे कॅनडाने विश्‍वचषक खेळण्यासारखे आहे’ अशा उपहासाने ट्वीट केले होते. पण आज आसाम वगळता स्थिती बर्‍याच अंशी तशीच आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत चांगली वाढ झालेली असली तरीही सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने इतके बळ कुचकामी ठरत असते आणि आपल्याला पुढची पाच वर्षे वाट पहात बसावे लागते. पाच वर्षे घालवणे जनतेलाही परडणारे नाही आणि पक्षालाही. पश्‍चिम बंगला, केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यात भाजपाची स्थिती कमकुवत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान मिळवण्यात भाजपाने चांगले यश मिळवले आहे. या राज्यात मतांचे टक्केवारी वाढली असली तरी पक्षाची स्थिती बळकट होणे, संघटनात्मक बळ वाढवणे महत्त्वाचे आहे. या पाच राज्यातील येणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्ता काबीज करायची असेल तर पक्ष कार्याचा वेग केवळ दूप्पट करुन चालणार नाही तर हा कामाचा वेग दसपटीने वाढवावा लागेल, या राज्यातील जनतेच्या घराघरापर्यंत पोहचावे लागेल तेही सतत. तेव्हा कोठे पुढच्या निवडणुकीत पश्‍चिम बंगला, केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यात भाजपा सत्ता मिळवू शकेल. भाजपाने नगण्य स्थान असलेल्या राज्यात किती काम करावे लागेल हे भाजपा श्रेष्ठींना आणि नेत्यांना सांगण्याची गरज नाही. पण राष्ट्रीय पक्ष म्हणून अभेद्य स्थान आणि स्थिती निर्माण करायची असेल तर हाच एकमेव शाश्‍वत राजमार्ग आहे आणि कामाचा वेग हाच त्याचा खरा बीजमंत्र आहे.

Posted by : | on : 22 May 2016
Filed under : चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g