Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » इंटरव्ह्यूला जाताना… !

इंटरव्ह्यूला जाताना… !

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ६
MRINAL DRESSING ARTICLE6मला हा प्रश्न बरेचवेळा विचारला जातो, की इंटरव्ह्यूला कसा / कोणता ड्रेस घातला पाहिजे? मग मी विचारते की इंटरव्ह्यू कोणत्या कंपनीमध्ये आहे व कोणत्या पदासाठी आहे? कारण, या दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला तो इंटरव्ह्यू आपल्याकडून काय एक्सपेक्ट करतो हे सांगेल! आणि त्यानुसार मी मग काही सजेशन्स देते.
असं म्हणतात की ‘फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन’! खरंच आहे हे १००%!! आपण प्रथमच कोणाला भेटणार आहोत, ते देखील नोकरी मिळण्यासाठी, तर आपण आपलं ‘बेस्ट’ दिसलंच पाहिजे. पण, ‘बेस्ट’ म्हणजे समारंभाला तयार होतो तसे नाही… तर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप अशी पडली पाहिजे की आपणच या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार आहोत! इंटरव्ह्यूच्या बाबतीत मी असं म्हणेन की, पहिल्या काही मिनीटांमध्येच तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीचे मत तयार होते; मग ते ‘बेस्ट’च असावे यासाठी आपण प्रयत्न जरूर केला पाहिजे.
मुख्य तयारी : आपल्या विषयाचे / क्षेत्राचे उत्तम व सखोल ज्ञान असण॓ ही इंटरव्ह्यूची मुख्य तयारी आहे. तसेच, आपण सकारात्मक विचार करणे व चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. यामुळे व्यक्तिमत्व प्रसन्न दिसते. उत्कृष्ठ वेशभूषा व तणावग्रस्त चेहेरा हे अतिशय वाईट कॉम्बिनेशन आहे हे लक्षात घ्या.
याशिवाय काही खूप साध्याच पण महत्वाच्या गोष्टी आपण आज लक्षात घेवू :-
• वय आणि पद : आपले वय आणि ज्या पदासाठी इंटरव्ह्यू आहे त्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. पदाला व वयाला साजेसे कपडे घालणं नेहमी फायद्याचे आहे. कपड्यांचा रंग, डिझाईन वयानुसार व आपण ज्या पदासाठी इंटरव्ह्यू देतो आहे त्यास शोभणारे असावे. मी तर असेही सुचवेन की, इंटरव्ह्यू पॅनेलमध्ये काय वयोगटातील व्यक्ती आहेत याचादेखील अंदाज बांधून त्यानुसार आपली वेशभूषा ठरवणे उत्तम!
• वेशभूषा : साडी किंवा सलवार कमीज हा इंटरव्ह्यूसाठी अतिशय उत्तम ड्रेस आहे. हलक्या रंगाची व डिझाइनची, चापूनचोपून नेसलेली साडी किंवा सुटसुटीत, हलक्या रंगसंगतीचा, खूप जास्त फॅशनेबल नसलेला सलवार कमीज, तुम्हाला उत्तमरित्या प्रेझेंटेबल दिसायला मदत करतात. जर तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअर / मल्टिनॅशनल / बीपीओ कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जात असाल, तर तुम्हाला वेस्टर्न फॉर्मल्सचा पर्यायही निवडता येईल. या तीनही बाबत आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेतले आहे.
तसेच, स्लीवलेस, लो-कट ब्लाउज / कमीज / टॉप्स वापरु नका. ड्रेसबाबत अतिफॅशन उदा. जास्त लेस / फ्रील्स / टिकल्या / जरी / मणी-घुंगरू इ. टाळावेत. या सर्वांमुळे कपड्यांना फेस्टिव्ह आणि कॅज्युअल लूक येतो. हो आणखीन एक महत्वाचं, ट्रान्सपरंट  किंवा आतील होजिअरी दिसणारे कपडे अजिबात वापरू नका !!
कपडे नेहमी व्यवस्थित इस्री केलेले असावेत. आदल्या दिवशीच कमीज / टॉप कोठे उसवला नाही आहे ना / हुक, बटन्स तुटले नाहीत, याची खात्री करुन घ्या. ऐनवेळी मग सेफ्टीपीन इ. लावले तर ते चांगले दिसत नाही.
• केशरचना :  इंटरव्ह्यूला जाताना केस कधीही मोकळे सोडू नयेत.  (स्टेपकट इ, लहान केस हा अपवाद सोडून) केसांची तुमच्या ड्रेसला शोभेलशी रचना करा. पोनीटेल, वेणी, बन इ. इंटरव्ह्यूला सुटेबल केशरचना आहेत. कॉलेजच्या अनेक मुली वेस्टर्न फॉर्मल ड्रेस व विविध तऱ्हेचे हेअरकट उठून दिसतील अशारीतीने केस मोकळे सोडून इंटरव्ह्यूला येतात आणि त्यांचे निम्मे लक्ष हातानी केस सारखे करण्यातच असते, जे अजिबात चांगले दिसत नाही. तसेच, केसांना घुंगरु इ. असलेल्या क्लिप लावू नका. इंटरव्ह्यूमध्ये तुमच्याशी चालू असलेल्या संभाषणामध्ये यांमुळे व्यत्यय येतो.
• अॅक्सेसरीज : अॅक्सेसरीज, म्हणजेच तुमच्या कपड्यांना साजेसे दागिने, घड्याळ, पर्स, मेकअप् इ. कमीतकमी, पण ड्रेसला उठावदारपणा येईल असे दागिने (कानातले, गळ्यातले, बांगडी / ब्रेसलेट) व लेदर / मेटल बेल्टचे फॅशनेबल नसलेले घड्याळ वापरावे. खूप मोठे, लोंबते, कानातले, आवाज करतील अश्या बांगड्या घालू नयेत. यामुळे तुमचे / इंटरव्ह्यूअरचे बोलण्यातील लक्ष विचलीत होवू शकते, जे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने मारक ठरेल.
• पर्सनल हायजीन : पर्सनल हायजीनबाबत आपण मागील लेखातच बोललो, त्या सर्व गोष्टी इंटरव्ह्यूला जाताना देखील लक्षात घ्या. गडद / भडक रंगाचे नेलपॉलिश, खोटी / सजवलेली नखे टाळा. उग्र वासाच्या परफ्युम / डिओ ऐवजी मंद वासाच्या परफ्युम / डिओची निवड करावी. मेकअपही कमीतकमी व हलका केल्यास जास्त छान वाटेल.
• फूटवेअर : आपण ऑफिसला काय प्रकारचे फूटवेअर वापरले पाहिजे ते मागील लेखात पाहिले आहे. तर, इंटरव्ह्यूला जाताना देखील त्याबाबत काळजी घ्या. उंच टाचेचे, आवाज करणारे, अतिफॅशनेबल फूटवेअर आवर्जून टाळायला हवे. कारण, इंटरव्ह्यूच्या ठिकाणी इंटरव्ह्यू रूममध्ये प्रवेश केल्यापासून खुर्चीमध्ये बसेपर्यंत इंटरव्हूअरकडून तुमचे बारीक निरीक्षण होत असते; अशावेळी तुमच्या चालण्यातून देखील तुमचा आत्मविश्वास जाणवला पाहिजे! म्हणूनच एकदम नवीन, उंच टाचेच्या, सवयीच्या नसलेल्या, स्लीपरसदृश, अनकम्फर्टेबल चप्पल / बूट टाळा, जेणेकरुन तुमची चाल ही सहज व आत्मविश्वासपूर्ण असायला मदत होईल. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या चेहेऱ्याइतकाच तुमच्या हालचालींमधूनही जाणवू दे!!
ऑल द बेस्ट !!!
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापनही करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=21232

Posted by on Mar 10 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (87 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• मोदी सरकारने भविष्यातील योजना, उर्जा, संरक्षण, उद्योग आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली आहे, ती ...

×