Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » रुबाबदार वेस्टर्न फॉर्मल ड्रेसेस!

रुबाबदार वेस्टर्न फॉर्मल ड्रेसेस!

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ४

MRINAL DRESSING ARTICLE4हॅलो मैत्रिणींनो, मला माहित आहे काही मैत्रिणी नक्कीच वेस्टर्न फॉर्मल ड्रेसबद्दल कधी एकदा अजून जास्त जाणून घेता येईल याची वाट पहात असतील. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात भारतात आलेल्या मल्टिनॅशनल कंपनीज् आणि त्याचबरोबर विविध माध्यमातून आपल्यासमोर आलेलं वेस्टर्न फॅशनच जग!
गेल्या १० वर्षात खूप स्त्रिया मोठया पदावर पोहचल्या, कामानिमित्त देशी-विदेशी प्रवास करू लागल्या आणि त्यामुळे त्यांनी पाश्चात्य ऑफिस वेअरची खूप छान ओळख करुन घेतली आणि आपापल्या ऑफिसमध्ये लोकप्रिय पण केली. वेस्टर्न फॉर्मल्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑफिस वेअरचा आपण थोडक्यात परिचय पण करुन घेऊ आणि काही टिप्स देखील शेअर करू.
दिसायला अतिशय नीट-नेटके, रुबाबदार असे हे वेस्टर्न फॉर्मल ड्रेसेस! यात देखिल खूप विविधता आहे. आपल्या नजरेसमोर पटकन येतं ते म्हणजे फॉर्मल शर्ट आणि ट्राउज़र्स, विथ ब्लेज़र! तुमच्या व्यक्तिमत्वाला अतिशय सुंदर व उठाव देणारे आणि त्याची शान वाढवणारे असे हे ऑफिस वेअर. वेस्टर्न फॉर्मल्स म्हंटलं की थोडी बोरिंग वाटणारी ही कपड़यांची श्रेणी स्त्रियांच्या बाबतीत मात्र खूप पर्याय देते.
यातील काही मुख्य प्रकार :
• पँट सूट्स् : फॉर्मल ट्राउज़र्स, फॉर्मल शर्ट आणि जॅकेट असा हा प्रकार! विविध प्रकारे स्त्रिया या पद्धतीचे ऑफिस वेअर वापरू शकतात.
• स्कर्ट सूट्स् : फॉर्मल स्कर्टस् (गुडघ्यापर्यंत / अथवा त्यापेक्षा लांब) आणि फॉर्मल शर्ट व जॅकेट. या प्रकारात देखिल खूप विविध फॅशन उपलब्ध आहेत.
• फॉर्मल ड्रेस : हा प्रकार जास्त करुन उष्ण हवेच्या ठिकाणी लोकप्रिय आहे. कारण जॅकेट न घालताही नुसता सिंपल वन-पीस घालता येतो आणि तो छान ही दिसतो.
• फॉर्मल पँट्स् आणि टॉप्स् : फॉर्मल ट्राउज़र्स / पँट्स् / स्कर्ट्सबरोबर फॉर्मल टॉप असेही कॉम्बीनेशन खूप लोकप्रिय आहे. या बरोबर स्कार्फ वापरला तर ड्रेसला अज़ून उठाव येतो.
• ब्लेज़र्स / जॅकेट्स् : फॉर्मल्समध्ये फॉर्मल शर्टबरोबर विविध स्टाइलचे ब्लेज़र्स जे फॉर्मल आणि कॅज्यूअल या दोन्ही प्रकारचे असतात ते देखील छान दिसतात. तसेच जॅकेट्समध्ये ही वेस्ट जॅकेट, फुल स्लीव जॅकेट असे प्रकार येतात.
या पैकी आपल्याला जे छान दिसेल, जे आपल्या ऑफिसमध्ये वापरण्यायोग्य असेल किंवा जे तुमच्या सीनियर कलीग्स वापरतात किंवा जे तुमच्या ऑफिसचा यूनिफॉर्म/ ड्रेस कोडमध्ये सांगितले आहे ते वापरा.  मात्र वेस्टर्न फॉर्मल्स बरोबरच वेस्टर्न कॅज्यूअल, फ्रायडे कॅज्यूअल, ऑफिस पार्टी वेअर या प्रकारांविषयी देखील माहिती करुन घ्या. कारण आपण जसं जरीची साडी प्रत्येक प्रसंगी नेसत नाही, तसेच या कपड्यांबाबत ही आहे.
वेस्टर्न कपड़े खरच पर्सनॅलिटीचा लुक बदलुन टाकतात, पण ते योग्यप्रकारे वापरले तर! त्याकरिता काही छोटया-छोटया गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात :-
१. रंगसंगती : या प्रकारांमध्ये जास्त करुन ब्लॅक, ग्रे, लाइट आणि डार्क ब्लू, डार्क ग्रीन, मरून आणि व्हाईट असे रंग वापरले जातात. त्यापैकी एकाच रंगातील पँट्स् आणि शर्टपेक्षा लाइट कलर शर्ट आणि डार्क कलर पँट्स् / ट्राउज़र्स जास्त उठून दिसतात. थोडक्यात, कॉन्ट्रास्ट कलरचे कॉम्बिनेशन करुन आपल्याला जे आवडेल आणि छान दिसेल ते निवडा.
खूप ब्राइट, फ्लोरोसंट असे रंग शक्यतो टाळावेत; त्यामुळे फॉर्मल ड्रेसचा फॉर्मलपणा कमी होतो.
२. डिज़ाइन्स : लहान मोठे चेक्स, स्ट्राईपस् अथवा हल्के डिज़ाइन असलेले फॅब्रिक सर्रास वापरले जातात. मोठया फुलांचे डिज़ाइन्स, अथवा मोठे पोल्का डॉट्स आदी प्रकार टाळावे.
३. फॅब्रिक्स : कॉटन्स, वुलन, लाइक्रा, सॅटिन, सिल्क, शिफ्फॉन असे फॅब्रिक जास्त करुन वापरले जाते. आपण थोडासा इंडियन फील देण्यासाठी रॉ सिल्क, खादी सिल्क अशा प्रकारचे फॅब्रिकपण शर्टसाठी वापरू शकतो.
४. टाय आणि स्कार्फ्स : टाय हा वेस्टर्न फॉर्मल्सचा अविभाज्य भाग आहे. टायमध्ये जास्त करुन ब्लॅक टाय हे व्हाइट शर्टबरोबर वापरले जातात. पण टायचा कलर तुमच्या ब्लेज़र आणि ट्राउज़र्सला शक्यतो मॅचिंग असावा. स्कार्फ़ हा देखिल खूप लोकप्रिय प्रकार आहे. जास्त करुन स्त्रियांसाठी वेस्टर्न फॉर्मल्समध्ये स्कार्फ़ची खूप विविधता आढळून येते आणि त्याच प्रकारे स्कार्फ़ बांधायच्या विविध पद्धती देखील. त्यामुळे आपण जर टाय / स्कार्फ़ वापरणार असाल, तर सर्वात आधी तो योग्यप्रकारे बांधायचा कसा हे शिकून घ्या! नाहीतर अयोग्य पद्धतीने बांधलेल्या टाय अथवा स्कार्फ़मुळे तुमच्या वेस्टर्न फॉर्मल्सची शोभा जाऊ शकते!! टाय / स्कार्फ़ बांधायला शिकण्यासाठी गूगल / यू टयूबवर अनेक मार्गदर्शक टिप्स चित्रफितीच्या रूपात अथवा व्हीड़ीओ स्वरुपात पाहु शकता.
६. इस्त्री : वेस्टर्न कपड्यांना काय किंवा कोणत्याही कपड्यांना व्यवस्थीत इस्त्री केली तर ते जास्त उठून दिसतात. आज-काल न सुरकुतणारे फॅब्रिक्सपण उपलब्ध आहेत. ते इस्त्री न करताही वापरता येते.
६. हेअर स्टाइल : वेस्टर्न वेअरला साजेशी हेअर स्टाइल केली तर जास्त गेट-अप येतो. अथवा, फॉर्मल पँट्-सूटवर कशीतरी वेणी / पोनी / मोकळे सोडलेले केस चांगले दिसतीलच असे नाही. आजकाल कॉर्पोरेट हेअरस्टाइल्सबद्दल खूप लिहुन येते. कॉर्पोरेट पोनीटेल, वेणी हे देखिल पॉप्युलर होत आहे. त्यासाठी  थोडसं काय ट्रेंड आहे याबद्दल जागरूक रहा.
७. फुट वेअर : फॉर्मल ड्रेसचा फॉर्मलपणा टिकण्यासाठी नेहमीच फूट वेअरचे देखील तितकेच महत्व आहे. वेस्टर्न फॉर्मल्सबरोबर शूज्, सँडल्स, तुमच्या ड्रेसला साजेसेच वापरा. आशा ड्रेसबरोबर स्लीपर्स, फॅन्सी चप्पल्स, एथ्निक चप्पल्स वापरून त्याची शोभा कमी करू नका. मी अनेकदा पाहिलं आहे की फॉर्मल पँट्-सूट बरोबर मूली चक्क कोल्हापुरी शूज्, स्लीपर्स देखिल घालतात आणि त्यामुळे ड्रेसची आणि पर्यायने तुमचीही शोभा जाते! अर्थात असे बिल्कुल नाही की या ड्रेस बरोबर हाय हील्सच वापरले पाहिजेत. वीना हील्सचे फॉर्मल शूज् देखिल मिळतात वा तुमच्या कंफर्टनुसार तुम्ही योग्य ते निवडू शकता. मात्र हील्सचे प्रकार निवडताना, त्यांचा अतिरेकी आवाज होणारे प्रकार शक्यतो टाळा! त्यामुळे सर्व ऑफिसचे लक्ष तुमच्याकडे सतत वेधले जाऊन इतरांना आणि तुम्हालाही त्रास होऊ शकतो. माझ्या एका वकील मैत्रिणीला आवाज होणारे हिल्सचे शूज् वापरल्यामुळे कोर्टाच्या शांततेचा भंग केल्याबद्दल ना वापरण्याची ताकीद मिळाली होती! त्यामुळे हील्सचे शूज् निवडताना त्यांचा जास्त आवाज होत नाही ना? हे देखील पहा.
८. फिटिंग : वेस्टर्न फॉर्मल्समध्ये कपड़यांच्या फिटिंगला खूप महत्व आहे. अतिशय घट्ट फिटिंग्स किंवा अतिशय लूज् फिटिंग हे दोन्हीही तुमच्या ड्रेसची शोभा कमी करू शकतात. आपल्या प्रकृतीला, जे योग्य दिसेल त्याप्रमाणे कपड्यांचे फिटिंग असावे. सगळ्यात महत्वाचे, जर तुम्ही स्वतः या कपड्यांमध्ये कंफर्टेबल राहु शकत नसाल, तर तुमचा आत्मविश्वास आपोआप कमी होईल. त्यामुळे, तुम्हाला सुटसुटीत वाटतील असेच वेस्टर्न फॉर्मल्स वापरा. टाइट फिटिंग ट्राउज़र्स न वापरता तुम्ही थोड्या लूज् फिटिंग ट्राउज़र्स / पँट्स् किंवा स्कर्ट्स वापरू शकता.
९. शर्ट्स : फॉर्मल शर्ट्समध्येही आजकल खूप व्हरायटी मिळते. त्यात हाफ स्लीव्स, स्लीवलेस, फुल स्लीव्स असे प्रकार निरनिराळ्या जॅकेट्स, ब्लेज़रसोबत वापरता येतात. पण त्यात शक्यतो एकदम खोल गळ्याचे / लो नेकलिनचे शर्ट्स टाळावेत.
१०. बेल्ट्स आणि बॅग्स : फॉर्मल ट्राउज़र्स / पँट्स् / स्कर्ट्सला देखील योग्य साजेशा बेल्टची जोड हवी. आणि त्याचबरोबर योग्य अशा फॉर्मल पर्स अथवा हँडबॅगची देखील! वेस्टर्न फॉर्मल्स घालून त्याबरोबर टिकल्या, जरी लावलेला झोळणा वापरला तर ते नक्कीच वाईट दिसेल. त्यामुळे नेहमी वेस्टर्न फॉर्मल्स वापरत नसाल तरीही आशा सेट बरोबर एखादी फॉर्मल लेदर पर्स / ऑफिस / हँडबॅग नक्कीच तुमच्या जवळ तयार ठेवा!
आणि हो, वेस्टर्न फॉर्मल्सबरोबर ज्वेलरीपण साजेशी घाला. शक्यतो हल्की-फुल्की ज्वेलरी वापरली तर छान. मेकअपबद्दल आज जास्त लिहीणार नाही. मात्र या ड्रेसवर ठळक कुंकु अथवा टिकली लावू नका.
मी अशी आशा करते की या लेखामुळे वेस्टर्न फॉर्मल्स कसा वापरावा आणि आत्मविश्वासाने कसा कॅरी करावा, याची थोडीशी कल्पना तुम्हाला आली असेलच.
मागील लेखांना उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे मनपूर्वक आभार आणि या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आणि अज़ून काही टिप्स असतील तर जरूर शेयर करा.
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापनही करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=20871

Posted by on Feb 24 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (91 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• सध्या भाजपाकडे लोकसभेत बहूमत असले तरीही राज्यसभेत बहूमत नाही. त्यामुळे लोकसभेत मंजुर झालेली विधेयकं राज्यसभेत उधळून ...

×