Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » व्यक्तिमत्वाचं सौंदर्य दडलंय आत्मविश्वासात !

व्यक्तिमत्वाचं सौंदर्य दडलंय आत्मविश्वासात !

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ५
हॅलो मैत्रीणींनो, आपलं व्‍यक्तिमत्व अजून उठावदार आणि भारदस्त होण्यासाठी आपण कशाप्रकारचे कपडे वापरले पाहिजेत, याची ओळख मागील चार लेखांमध्ये करुन घेतली. पण, फक्त व्यवस्थित कपडे घातले की व्यक्तिमत्व उठावदार आणि उत्तम होते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे! कारण, मुळात व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आपले कपडे नव्हेत!
आत्तापर्यंत आपण छोट्या-छोट्या गोष्टी पहिल्या, आपल्या पेहेरावामूळे आपण अजून जास्त भारदस्त कसे दिसू शकतो. आज आपण पाहूया की आणखीन कोणत्या गोष्टी आपण जर अंगीकारल्या तर आपली पर्सनॅलिटी जास्त उठून दिसेल आणि इतरांवर छाप पाडू शकेल!
० पर्सनल हाइजीन : स्‍वतःच्या शारीरिक स्वछतेबद्दल जागरूक असणं खूप आवश्यक आहे. केसांची योग्य निगा, नाक, कान, दात, त्वचा, पाय, टाचा आदींची काळजी घेतली पाहिजे. कधी कधी आपण पाहतो की सुंदर सिल्क साड़ी, गजरा, छान चपला पण फूटलेल्या / भेगा पडलेल्या टाचा… इंप्रेशन खराब होतंच कितीही नाही म्हटलं तरी. मी पूर्वी कुठेतरी वाचलं होतं की तुम्ही स्‍वतःच्या शरीराची काळजी कशी घेता यावरून पण तुमच्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो! म्हणूनच आज मी काही टिप्स शेयर करणार आहे ज्या मी ही अनुभवातून, निरीक्षणातून आणि वाचून, पाहून शिकले :-
१. आपल्या कपड्यांबरोबरच आपल्या केसांची योग्य काळजी घ्या. ऑफिसमध्ये विस्कटलेले अथवा कसेतरी बांधलेले केस किंवा मोकळे केस सोडून वावरणं योग्य नाही. अधे-मधे वेळ मिळेल तेव्हा रेस्ट रूममध्ये जाऊन आपले केस व्यवस्थित आहेत ना? हे पण पाहिलं पाहिजे आणि ते नीट राहतील हे ही पाहिलं पाहिजे. पण सर्वांदेखत केस विंचरणं टाळा.. आणि आपले केस आपल्या डेस्कच्या आजू-बाजुला पडणार नाहीत याची ही काळजी घ्या.
२. तुटलेली नखं, अर्धवट निघालेला नेल पॉलिश तुमच्या हाताची शोभा घालवतो. जर नखं वाढवणार असाल तर ती नीट शेप करा. नेलपॉलिश लावत असाल तर ते नेहमी व्यवस्थित आहे याकडे लक्ष ठेवा. खूप गडद किंवा ब्राइट कलर्स ऑफिसवेअरला शोभत नाहीत, त्यामुळे नेल कलर्सच्या सिलेक्शन बाबतीत थोडी काळजी घ्या. अनेकदा आपण नखं वाढवतो पण त्यांची योग्य काळजी घेणं जमत नाही. नखात माती/ घाण दिसणं हे तुमच्या पर्सनॅलिटीची छाप कमी करतं. त्यामुळे नखं स्वच्छ ठेवा. तसंच हाताला व पायाला एकाच रंगाचे नेल पॉलिश लावा.
३. सुंदर त्वचेसाठी आपण साऱ्याजणी आग्रही आणि प्रयत्नशील असतो. मार्केटमध्ये तर क्रीम्स आणि लोशन्सची लयलूट आहे… मग हे खरंच तुम्ही अनुभवलं असेल ना की आपली त्वचा जर तजेलदार असेल तर आपल्या कॉन्फिडन्समध्येपण काही टक्के वाढ होतेच!
४. ज्यांना खूप घाम येतो, त्यांनी आपल्या घामाची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यावी.. डिओड्रंटस् व परफ्युमचा वापर करा. पण, ऑफिसमध्ये जास्त गडद आणि उग्र वासाचे डीओ स्प्रे किंवा परफ्यूम्स वापरणं टाळा.
५. आपले दात नेहमी स्वच्छ व निरोगी राखा. श्वासाच्या दुर्गंधीमुळे इतर लोक तुम्हाला टाळू शकतात; म्हणून नेहमी चूळ भरावी अथवा लवंग वा अन्य माउथ फ्रेशनरचा वापर करावा.
६. सुंदर ड्रेस अथवा साडी, छान मेकअप्, पण भेगाळलेल्या टाचा… हे दृश्य खूप कॉमन आहे… रोजच्या रुटीनमध्ये थोडासा वेळ काढा आणि आपल्या टाचा आणि पाय स्वच्छ आणि सुंदर राहतील याची खबरदारी घ्या. मी तर म्हणेन की आपण आपली स्वतःची काळजी घेतो म्हणजे एकप्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल जागरुक आहोत हेच दिसून येतं!
या सर्व गोष्टी काही प्रमाणात आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत आणि त्यामुळे त्यांची योग्य निगा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची निगा!!
० स्मितहास्य : असं म्हणतात की “स्माइल इंप्रूव्हज् युवर फेस व्हॅल्यू…” सुंदर स्मितहास्य हे नेहमीच आपल्या चेहऱ्याची शोभा वाढवतं!! प्रयत्न करा की शक्य तितका हसरा चेहरा असेल… कारण सुंदर फिगर, सुंदर कपडे, पण चेहऱ्यावर कायम ताण-तणाव किंवा कपाळावर आठ्या… त्या व्यक्तीची म्हणावी तशी छाप नाही पडत. पण, तेच चेहेऱ्यावर स्मितहास्य असेल तर आजूबाजूच्या व्यक्तींवर आपला चांगला प्रभाव पडतो. तसेच आपली देहबोलीही सकारात्मक कशी राहील याचाही प्रयत्न करा; म्हणजेच आपल्या हालचालींमधून राग, चिडचिड, उद्दामपणा, गर्व, निर्विकारपणा आदी भाव दिसू नये. पण, आत्मविश्वास, समोरच्याबद्दल आदर व पॉझिटीव्ह एनर्जी जाणवली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या चालण्यातून पण तुमचा आत्मविश्वास व पॉझिटीव्ह एनर्जी जाणवू शकते!!
मेकअप आणि अॅक्ससेसरीज् : आपण मागील काही लेखांमध्ये पाहिलं, की आपल्या कपड्यांच्या बरोबरीने आपल्या अॅक्ससेसरीज् आणि मेकअपला देखील महत्त्व असतं. ऑफिसला नेहमी कमीत कमी किंवा एकदम लाइट मेकअप् वापरा किंवा ज्या मैत्रीणींना मेकअपची आवड अथवा गरज वाटत नाही, त्या हल्की लिपस्टिक, आय लाइनर / काजळ लावू शकतात. त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्याला उठावदारपणा येतो.
असं म्हणतात की ५ अॅक्सेसरीज् वापराव्या! आणि शक्यतो त्यामध्ये सुसुत्रता हवी… सोन्याचे कानातले, चांदीची अंगठी, मोत्याचे गळ्यातले असे विसंगत अॅक्सेसरीज् वापरू नयेत. ते वाइट दिसते. प्रत्येक व्यवसायानुसार अॅक्सेसरीजची निवड वेगवेगळी असू शकते. परंतु, त्यामध्ये सुसंगतपणा असावा. ऑफिसला शक्यतो हलक्या-फुलक्या अॅक्सेसरीज् वापराव्यात. अॅक्सेसरीज् मध्ये आपली पर्स / हँडबॅग याचाही समावेश होतो.
० आत्मविश्वास : वरील सर्व गोष्टी केल्याने आपले व्यक्तिमत्व पर्फेक्ट होइल का? नाही!! या सर्व गोष्टी व्यक्तिमत्वाचा एक भाग आहेत आणि व्यक्तिमत्वाला पूरक आहेत. पण मूळ गोष्ट आहे ती म्हणजे ‘आपला आपल्याबद्दलचा आत्मविश्वास’!! हा आत्मविश्वास आपलं जर स्वतःवर प्रेम असेल, स्वतःच्या कष्टांवर विश्वास असेल, आपल्या कामाच्या क्षेत्रातील कौशल्य आपल्याकडे असेल, तर नक्कीच आपल्यामध्ये येईल!! आपल्या कामाबद्दल प्रामाणिकपणा, आवड, कौशल्य या सर्व बाबी आपल्याला आत्मविश्वास मिळवून देतात! म्हणूनच, बाह्य सौंदर्याइतकंच या गोष्टींना देखील महत्व द्या; आणि पहा तुमचं व्यक्तिमत्व कस भारदस्त, ऊठावदार होतं ते!!
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापनही करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=21051

Posted by on Mar 3 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (89 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• सरकारकडून भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली शेतकरी नागवला जात असल्याची आवई उठवून शेतकर्‍याचेच नुकसान जर होत असेल तर ...

×