किमान तापमान : 29.59° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.61 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.61°C - 31.46°C
scattered clouds28.38°C - 30.55°C
sky is clear27.8°C - 30.52°C
sky is clear27.6°C - 30.29°C
sky is clear27.11°C - 30.24°C
sky is clear27.54°C - 30.88°C
sky is clear=नव्या ग्राहकांसाठी खुशखबर, दोन महिने मिळणार सवलत=
नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सार्वजनिक कंपनीने जास्तीत जास्त नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना सादर केली असून, यामध्ये मोबाईल कॉल दरात सुमारे ८० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या आहेत. त्यामुळे नव्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता यावा यासाठी मोबाईल कॉल दरात ८० टक्के कपात केली आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. प्रतिमिनिट आणि प्रतिसेकंद अशा दोन्ही गटात कॉल रेट कमी करण्यात आले असून, ग्राहक बीएसएनएलशी जोडल्यानंतर दोन महिने या सवलतीचा लाभ घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी बीएसएनएलचे नवे कनेक्शन घेणार्या ग्राहकाला प्रतिसेकंद योजनेसाठी ३६ रुपये आणि प्रतिमिनिट योजनेसाठी ३७ रुपयांचे व्हाऊचर खरेदी करावे लागणार आहे. ३७ रुपयांचे व्हाऊचर घेणार्या ग्राहकांना कंपनीच्या नेटवर्कमध्ये स्थानिक व एसटीडी कॉलसाठी १० पैसे प्रतिमिनिट आणि इतर नेटवर्कसाठी ३० पैसे प्रतिमिनिट इतके शुल्क आकारले जाईल.
त्याचप्रमाणे ३६ रुपयांचे व्हाऊचर घेणार्या ग्राहकांना कंपनीच्या नेटवर्कमध्ये स्थानिक व एसटीडी कॉलकरिता प्रत्येक तीन सेकंदांकरिता १ पैसा याप्रमाणे दर आकारला जाईल.