किमान तापमान : 31.03° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.97 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.05°C - 32.99°C
scattered clouds28.12°C - 30.79°C
sky is clear27.62°C - 30.6°C
sky is clear28.38°C - 31.86°C
few clouds28.92°C - 33.1°C
sky is clear29.22°C - 32.93°C
few cloudsसुरत, [१५ मे] – विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांचे चुरत भाऊ भरत तोगडिया त्यांच्यासह तिघांच्या हत्येप्रकरणी सुरत पोलिसांनी आज रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे.
अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारात खंडणी मागितली असता, भरत तोगडिया यांचा मित्र बालू हिराणीने ती देण्यास नकार दिला. यावरूनच हे हत्याकांड घडले असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या हत्याकांडात एकूण सात आरोपी असून, उर्वरित चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, या हत्याकांडावरून भाजपाच्या विरोधकांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी गुजरातमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी राज्यात कायदा व सुव्वस्था अस्तित्वातच नाही, अशी टीका केली.