किमान तापमान : 31.29° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 5.5 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.38°C - 32.99°C
few clouds27.91°C - 30.32°C
sky is clear27.33°C - 30.31°C
sky is clear27.26°C - 30.1°C
sky is clear26.95°C - 30.15°C
sky is clear27.31°C - 30.25°C
sky is clearथिरुवनंतपुरम्, [२१ मार्च] – नव्यानेच उदयाला आलेल्या भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) आणि भाजपा यांच्या युतीत झालेल्या समझोत्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत या नवोदित पक्षाला १४० पैकी ३७ जागा लढवता येणार आहेत.
जागावाटपाकरिता दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बीडीजेएसला ३७ जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कुम्मनम् राजशेखरन् आणि बीडेजेएस अध्यक्ष तुषार वेलाप्पल्ली यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली.
राजशेखरन् म्हणाले की, रालोआच्या राज्यसमितीची बैठक पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, त्यापूर्वी बीजेडेएसची उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि बीडेजेएस बरोबरच माजी केंद्रीय मंत्री पी. सी. थॉमस यांच्या अध्यक्षतेखाली केरळ कॉंग्रेसही रालोआचा भाग आहे.