|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.54° C

कमाल तापमान : 28.54° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 2.78 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.54° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.45°C - 30.83°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.06°C - 30.87°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.51°C - 29.59°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.14°C - 29.74°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.94°C - 29.67°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.67°C - 29.76°C

sky is clear
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, ठळक बातम्या, राज्य » सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतले

सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतले

  • मादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन
  • २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ

Sachin Tendulkar With future citizens of Puttamraju Kandrigaनेल्लोर, [१६ नोव्हेंबर] – आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल मास्टर ब्लास्टर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली असून, युवकांनी मादक द्रव्यांच्या नव्हे तर कुटुंबाच्या प्रेमात पडा, असे आवाहन त्याने केले आहे.
सचिन तेंडुलकरने आज रविवारी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि सोयी-सुविधांपासून पूर्णपणे वंचित असलेले गाव पंतप्रधान आदर्श गाव विकास योजनेंतर्गत रविवारी दत्तक घेतले. पुत्तमराजुवरी कंद्रिका असे या गावाचे नाव असून, या गावात ना वीज आहे आणि ना रस्त्यांची सुविधा. पिण्याचे पाणीही कधीकधीच मिळते. या गावाचा आदर्श गाव म्हणून विकास करण्याचा निर्धार सचिनने व्यक्त केला आहे.
खरे म्हणजे, या गावकर्‍यांसाठी रविवारची सकाळ आश्‍चर्याचा सुखद धक्का देणारीच ठरली. सकाळी नऊच्या सुमारास सचिन या गावात आला आणि नागरिक अवाक् झाले. आपण झोपेत तर नाही, असा भास अनेकांना झाला. कारण, हे गाव दुर्गम असले, तरी सचिनला न ओळखणार्‍या लोकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असावी. सचिनने गावकर्‍यांशी संवाद साधला आणि आस्थेने विचारपूस केली. नंतर त्याने आपल्या येण्याचा उद्देश जाहीर केला. गावकर्‍यांनी केलेल्या सत्कारामुळे सचिनही भारावून गेला.
सचिन या गावाला भेट देणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यामुळे नागरिकांनी गावात जागोजागी त्याच्या स्वागतासाठी मोठमोठी फलके लावली होती. गावातील नागरिकांसोबतच आसपासच्या गावातील महिला, मुलांनीही सचिनला डोळे भरून पाहाण्यासाठी कंद्रिका गावात गर्दी केली होती. या गावातील वेंकटेश्‍वरलू असे नाव असलेल्या चाहत्याने सचिनच्या चेहर्‍याचे एक हजार मुखवटे वाटले होते.
आजवर शासन दरबारी पूर्णपणे दुर्लक्षित राहिले पुत्तमराजूवरी कंद्रिका हे गाव आज सचिनच्या आगमनामुळे प्रकाशझोतात आले आहे. शेजारच्या गावांनादेखील या गावाविषयीची माहिती नव्हती. मी याआधी कधीही सचिनला पाहिले नव्हते. मात्र, आज मला ही संधी मिळाली. मी खूप खुश आहे, अशी प्रतिक्रिया व्यंकटेश्‍वरलू याने दिली.
सचिनने गावातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांची कमतरता, शौचालयांची स्थिती तसेच वीजपुरवठा यासारख्या अनेक या समस्या गावातील नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठी सचिनने खासदारासांठी असणार्‍या स्थानिक क्षेत्र विकास योजनेतून तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. लवकरच हे गाव आदर्श गाव म्हणून विकसित झाले असेल, असा विश्‍वास सचिनने सुमारे २.७९ कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करताना व्यक्त केला.

Posted by : | on : 17 Nov 2014
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g