|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.44° C

कमाल तापमान : 30.14° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.14° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.4°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.26°C - 28.74°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.44°C - 28.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.35°C - 28.88°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.62°C - 29.09°C

scattered clouds
Home » युवा भारती » रावण, फेसबूक आणि तरुणाई

रावण, फेसबूक आणि तरुणाई

facebook1‘‘गर्भवती मॉं ने बेटी से पुछा
क्या चाहिये तुझे? बहन या भाई ?
बेटी बोली भाई!
मॉं : किसके जैसा?
बेटी : रावण जैसा
मॉं : क्या कहती है
पिता ने धमकाया, मॉं ने घुरा, गाली देती है ?
बेटी बोली क्यू मॉं ?
बहन के अपमान पर राज्यवंश और प्राण लुटा देनेवाला, शत्रू स्त्री को हरने के बाद भी स्पर्श न करनेवाला रावण जैसा भाईही तो हर लडकी को चाहिए आज’’
वरीलप्रमाणे संवाद असलेली ‘पोस्ट’ फेसबूकवर सर्वत्र ‘शेअर’ केली गेली आणि तेही ऐन रामाच्या नवरात्रात, श्रीरामनवमीच्या पर्वावर. आणि आमच्या तरुणाईने मागचापुढचा विचार न करता,जराही वस्तुस्थिती जाणून न घेता त्या ‘पोस्ट’वर ‘लाईक’ची मोहोर उमटवली. तरुणाईच कशाला रामायणाबद्दल काहीही जाणून न घेता अनेक ज्येष्ठ मंडळींनीही ही पोस्ट शेअर केली व त्यावर आपली ‘कॉमेंट’ही टाकली. देशात मोठ्या संख्येत स्त्रियांवर तसेच कोवळ्या बालिकांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांच्या पार्श्‍वभूमीवर कोणीतरी ही पोस्ट तयार केली. मात्र, ज्या व्यक्तीने ही पोस्ट तयार केली त्याच्या मूळ हेतूविषयीच शंका घ्यायला पुरेसा वाव आहे.येथील हिंदूंचा, प्रामुख्याने तरुणाईचा बुद्धिभेद व्हावा, त्यांची (श्रीरामावरील) श्रद्धा डळमळावी अथवा युवकांनी रावणाला वाईट, दुराचारी मानू नये, त्याला अनैतिक ठरवू नये आणि तोदेखील (रामाप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षाही!)श्रेष्ठ होता हे कुठेतरी बिंबविण्याचा प्रयत्न फेसबूकवरील या पोस्टवरून दिसतो. नव्हे अनेक कथित बुद्धिवादी रामापेक्षा रावचणच श्रेष्ठ होता असे ठासून सांगतात. या देशातील कम्युनिस्ट विचारवंतांनी तसेच पुरोगामी बुद्धिवाद्यांनी भारतीयांच्या श्रद्धा, त्यांचा धर्म, त्यांचेे आदर्श नेहमीच पायदळी तुडविण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर उघडउघड किंवा छुपा हल्ला चढविला आहे. अनेक पुस्तकांतून व लेखांतून रावण, दुर्योधन, धृतराष्ट्र व शकुनीसारख्या दुष्ट व अनैतिक लोकांचे उदात्तीकरण केले आहे तर राम, सीता, कृष्ण, पांडव व अन्य नीतिमान लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम केले आहे. आर्य संस्कृती, हिंदू धर्म व हिंदुत्वाबद्दल वाटणार्‍या द्वेषातूनच हे करंटे उद्योग गेल्या ६० वर्षांपासून सुरू आहेत. दुर्दैवाने नवीन पिढीला याविषयी फारशी माहिती नसल्याने किंवा फारसे वाचन नसल्याने हल्लीच्या तरुणांचा चटकन बुद्धिभेद होतो आणि ही हुषार मुले राम, कृष्ण व अन्य श्रेष्ठ व्यक्तिरेखांबद्दल नाहीनाही ते बोलतात, वितंडवाद (तेही फेसबूकवरून) घालतात आणि तोही कुठलाही अभ्यास किंवा वाचन न करता. हे सारे भयंकरच आहे.
वर उल्लेखित फेसबूकच्या पोस्ट मध्ये ‘बहन के अपमान पर राज्यवंश और प्राण लुटा देनेवाला, शत्रू स्त्री को हरने के बाद भी स्पर्श न करनेवाला रावण जैसा भाईही तो हर लडकी को चाहिए आज’ असे म्हटले आहे. असे म्हणणे आणि याला अनुमोदन देणे म्हणजे वैचारिक व बौद्धिक दिवाळखोरीच आहे, नव्हे, हे तर आपल्या इतिहासविषयक अज्ञानाचे प्रदर्शन करणेच होय.
मूळ वाल्मीकी रामायणात रावणाच्या चरित्र आणि चारित्र्याबद्दल सुस्पष्ट प्रकाश टाकला आहे. रावण नेमका कसा होता, त्याचे चरित्र कसे होते? रावणावर कोणते संस्कार झाले होते ? तो कशा प्रवृत्तीचा होता हे युवा पिढीला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्या आई-वडिलांचे नाव काय हे बहुतेकांना आज सांगता येणार नाही.
सुमाली नावाचा एक राक्षस होता. त्याला केशिनी नावाची सुंदर मुलगी होती. सुमाली मात्र आपल्या मुलीचे लग्न करीत नव्हता. तिला सांगून आलेल्या ‘स्थळां’मध्येच दोष काढत होता. केशिनीचे तारुण्य संपायची वेळ आली तरीही तो तिचा विवाह करीत नव्हता. तिला सर्व सुखांचा अनुभव व आनंद घ्यायचा होता. म्हणून काममोहित झालेली केशिनी एका आश्रमात आली. त्या आश्रमात अग्निहोत्री ऋषी पुलस्त्यांचा पुत्र विश्रवा राहात होता.केशिनीने त्या ऋषीकुमाराला शब्दांत पकडून त्याच्याशी विवाह केला. पण तिची आसुरी वृत्ती नष्ट झाली नव्हती. ‘खा, प्या आणि मजा करा’ ही आसुरी वृत्ती आहे. आर्य संस्कृती ध्वेयहिन आणि तत्त्वशून्य जीवन जगणार्‍यांना राक्षस म्हणते. राक्षस, असूर म्हणजे दात, दाढा वाढलेले, अक्राळविक्राळ रूप धारण केलेले नव्हेत, तर ती प्रवृत्ती आहे. अशाप्रकारे विश्रवा आणि केशिनी यांच्या पोटी रावण, बिभिषण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा अशी चार मुले जन्माला आली.बिभिषण सोडून अन्य तीन मुलांमध्ये मातेचे गुण आले. मातृसंस्कृतीचा प्रभाव अन्य तीन मुलांवर पडला होता. रावणाने भगवान शिवाची आराधना केली. पण माता दोषी होती. म्हणून त्याच्यात उन्मत्तपणा आला. ज्या परमेश्‍वराच्या कृपेमुळे त्याने सामर्थ्य, धन व कीर्ती मिळविली त्या परमेश्‍वरालाच तो आव्हान देऊ लागला.
रावण शूर, विद्वान, साहसी होता, हे निश्‍चित. परंतु, नम्र नव्हता. रावणात गुण असले तरीही तो अधार्मिक व अनैतिक होता. हाच त्याचा सर्वात मोठा दोष. त्याने आपल्या गुणांचा उपयोग सत्कार्य, नीमिमत्ता वाढविण्यासाठी केला नाही. सत्पुरुषाला शोभेल असे वर्तन त्याने कधीच केले नाही. म्हणून अफाट सामर्थ्य असलेल्या रावणाला चांगली व्यक्ती म्हणून गौरविता येणार नाही. जी व्यक्ती आपल्या सामर्थ्याचा, गुणांचा उपयोग समाज व राष्ट्रकार्यासाठी करते तिलाच आपण चांगली व्यक्ती म्हणून गौरवितो.
वास्तविक लंका ही कुबेराची होती. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. लंकेशी रावणाचा कुठलाही संबंध नव्हता. तो आपले राज्य म्हणून लंकेेची मागणी कुबेराकडे करू शकत नव्हता. तो त्यासाठी वडिलांना सारखा त्रास देत होता. अखेर विश्रवाने कुबेराची समजूत काढून लंकेचे राज्य रावणाला दिले. मंदोदरीसारखी सात्त्विक, सुंदर व एकनिष्ठ पत्नी रावणाला मिळाली कारण मयाने रावणाचा पितृवंश पाहिला होता आणि आपली कन्या रावणाला दिली. तारुण्य, धन, सामर्थ्य याबरोबरच अविवेकीपणा यामुळे रावण अतिशय उन्मत्त झाला. त्याच्या क्रूर कृत्यांना आळा बसावा म्हणून कुबेराने आपला दूत त्याची समजूत काढण्यासाठी पाठविला. पण, रावणाने त्या दूताचे तुकडे करून त्याला ठार मारले. वास्तविक कोणत्याही दूतावर शस्त्र चालवायचे नसते, त्याचा मान राखून त्याचे रक्षण करायचे असते हा धर्म रावणाने पाळला नाही. त्याने शिष्टाचार गुंडाळून ठेवला. कुबेराच्या दूताला रावण म्हणतो, मी कसे राहावे हे मी ठरवीन. माझे कल्याण कशात आहे हे सांगणारा तू कोण ? मी तर तुला ठार करणारच आहे, पण माझा भाऊ जर असाच वागत राहिला तर त्यालाही मी जिवंत ठेवणार नाही.
अंगद श्रीरामाचा दूत म्हणून गेला होता. पण, त्यालाही मारण्याचा त्याचा डाव होता. पण बिभिषणाने अडविल्याने रावण गप्प बसला. तो अतिशय कामांध होता. कुशध्वज नावाचे एक ऋषी होते. त्यांची वेदवती नावाची एक मुलगी होती. ती फार सुंदर तसेच विदुषी होती. ती रावणाच्या दृष्टीस पडताच तिच्यावर त्याने अत्याचार केले. आपणाला रावणाने भ्रष्ट केल्याचे वेदवतीला तीव्र दु:ख झाले. अखेरीस तिने आपला देह अग्नीच्या स्वाधीन केला.
रंभा ही कुबेराचा मुलगा, नलकुबेर याची पत्नी होती. अर्थात रावणाच्या सावत्र भावाची सून. रावण हा नलकुबेराचा सावत्र काका. तरीही आपल्या मुलीप्रमाणे असलेल्या सुनेवर, रंभेवर रावणाने बलात्कार केला.
सीतेला पळवून आणल्यावर रावण उन्मत्तपणे सीतेला सांगतो, स्वधर्मो रक्षासां भीरू
| सर्व दैव न संशय:| गमनं वा परस्त्रीणां हरणं सप्रमथ्य वा॥ (हे भीरू ! परस्त्रियांना त्यांच्या संमतीने भ्रष्ट करणे अथवा त्यांच्या बधुजनांना मारून अपहरण करणे हा राक्षसांचा धर्म आहे.) यावरून रावण हा पाशवी वृत्तीचा अर्थात नरपशू होता हे सिद्ध होते.
शूर्पणखेवर लक्ष्मणाने बलात्कार केल्याने तिचा सूड घेण्यासाठी रावणाने सीतेेला पळवून नेले, अशी तद्दन बकवास, खोटी, मूर्खासारखी आणि बुद्धिभेद करणारी कॉमेन्ट काहींनी फेसबूकवर लिहिली आहे. वास्तविक शूर्पणखेचा सूड घेण्यासाठी रावणाने सीतेला पळविलेले नाही. शूर्पणखेने सीतेच्या अमाप सौंदर्याचे वर्णन रावणाजवळ केले होते. ती रामापेक्षा तुलाच अधिक शोभून दिसेल, असे म्हणून तिने आपल्या कामांध भावाची वृत्ती चाळविली. त्यामुळे शूर्पणखेच्या अपमानापेक्षा सीतेच्या सौंदर्याची अभिलाषा त्याच्या मनात निर्माण झाली. आपला भाऊ कामांध, स्त्रीलंपट आहे हे शूर्पणखेला चांगले माहीत होते. म्हणूनच तिने सीतेच्या सुंदर रूपाचे वर्णन करून त्याला उत्तेजित केले.
रामाच्या देखणेपणावर भाळलेली शूर्पणखा सीतेला मारायला धावली होती. त्यावेळी तिच्या रक्षणार्थ श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा करून तिचे नाक व कान कापून टाकले. कोणताही क्षत्रिय, वीर पुरुष आपल्या पत्नीचा झालेला अपमान व तिच्यावर आलेले संकट पाहून गप्प बसणार नाही. तो त्वरित आपले क्षात्रतेज प्रकट करेल. विवाहाचा शूर्पणखेचा प्रस्ताव एकपत्नीव्रत धारण केलेल्या श्रीरामांनी मान्य करण्याचा प्रश्‍नच नव्हता. जोपर्यंत सीता जिवंत आहे तोपर्यंत श्रीराम आपला स्वीकार करणार नाहीत, हे लक्षात येताच तिने आपला मोर्चा सीतेकडे वळविला. तिला ठार करणे हाच शूर्पणखेचा हेतू होता. म्हणूनच तिला केवळ विद्रूप करून पाठविले. कारण स्त्रीला ठार करायचे नाही हा श्रीरामांचा दंडक होता.
शूर्पणखेला विरूप करणार्‍या श्रीराम व लक्ष्मणाचा बदला घेण्यासाठी आलेला रावण मारीचाशी संगनमत करतो. पराक्रमी रामलक्ष्मणाशी उघडउघड लढाई न करता यतिवेशात येऊन सीतेला कपटाने पळवून नेतो आणि तरीही रावणाचे उदात्तीकरण सुरू आहे. कशासाठी ? रावणाने सीतेला भ्रष्ट केले नाही त्यामुळे तो सभ्य, श्रेष्ठ ठरत नाही का? असा आणखी एक मूर्खपणाचा तसेच उर्मटपणाचा प्रश्‍न फेसबूकवर विचारण्यात येत आहे.
रावण जर सभ्य होता तर त्याने सीतेला का पळविले ? सीतेच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श करणार नाही, असे म्हणणारा रावण सभ्य कसा ? सभ्य, सज्जन माणूस परस्त्रीला पळविणार नाही. रावणाने सीतेच्या अब्रुवर हात टाकला नाही याचे खरे कारण म्हणजे ब्रह्मदेवाचा शाप! ‘पुंजिस्मला’ नावाच्या अप्सरेवर रावणाने बलात्कार केला तेव्हा ‘यापुढे तू कोणा स्त्रीवर अत्याचार करशील तर तुझे मस्तक छिन्नविछिन्न होईल’ असा ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला. या शापाच्या भीतीमुळे तो सीतेला स्पर्श करीत नाही, नीतिमान व सभ्य असल्यामुळे नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आमच्या तरुणाईने सारासार विचार करून, वस्तुस्थिती जाणून घेऊनच फेसबूकसारख्या माध्यमांचा उपयोग करावा व आमचे आदर्श, श्रद्धा आणि मूल्यांचे रक्षण करावे. तसेच बुद्धिभेद होईल, श्रद्धेवर आघात होईल अशा प्रचाराला बळी पडू नये ही खबरदारी घ्यावी.
अभिजित वर्तक

Posted by : | on : 19 May 2013
Filed under : युवा भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g