|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 24.99° C

कमाल तापमान : 25.76° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 88 %

वायू वेग : 1.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

24.99° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

24.99°C - 29.81°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.84°C - 31.31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.9°C - 32.27°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.46°C - 28.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.61°C - 29.11°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.31°C - 29.2°C

sky is clear

गुजरात विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या कौतुक प्रस्तावाला काँग्रेस-आपचा पाठिंबा

गुजरात विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या कौतुक प्रस्तावाला काँग्रेस-आपचा पाठिंबागांधीनगर, (०६ फेब्रुवारी) – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुजरातच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे ऐतिहासिक सांस्कृतिक कर्तव्य हजारो वर्षे स्मरणात राहील, यासाठी नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला भाजपासोबतच काँग्रेस आणि आपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये अयोध्येत जिथे मंदिर उभारले, त्या ठिकाणी पायाभरणीसाठी परवानगी दिली होती, असे...6 Feb 2024 / No Comment /

गुजरातमध्ये गरळ ओकणाऱ्या मौलानाला मुंबईत अटक

गुजरातमध्ये गरळ ओकणाऱ्या मौलानाला मुंबईत अटकजुनागढ, (०३ फेब्रुवारी) – द्वेषभावना निर्माण करणारी गरळ ओकणारा मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी याला गुजरात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मुंबईतून अटक केली, अशी माहिती अधिकार्यांनी सोमवारी दिली. गुजरातच्या जुनागढ शहरातील एका पोलिस ठाण्याजवळील मैदानात ३१ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात त्याने गरळ ओकली होती. त्याच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर अझहरी, स्थानिक आयोजक मोहम्मद युसुफ मालेक आणि अझिम हबिब ओडेदराच्या विरोधात भादंवितील कलम १५३ बी (दोन समुदायांमध्ये वैर निर्माण करणे) आणि...5 Feb 2024 / No Comment /

रामलल्लासाठी हिरे व्यापार्‍याने बनवले ११ कोटींचे मुकुट

रामलल्लासाठी हिरे व्यापार्‍याने बनवले ११ कोटींचे मुकुटसुरत, (२२ जानेवारी) – गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापार्‍याने अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात बसवण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी ’मुकुट’ दान केला आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील देवतेसाठी ११ कोटी रुपयांचा मुकुट खास तयार करण्यात आला होता. सुरतमधील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी भगवान रामाला सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेला ६ किलो वजनाचा मुकुट भेट दिला. मंदिर ट्रस्टच्या अधिकार्‍यांना काळजीपूर्वक तयार केलेला मुकुट सादर करण्यासाठी...23 Jan 2024 / No Comment /

राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा

राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये पहिला राजीनामागांधीनगर, (१९ जानेवारी) – गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि उत्तर गुजरातमधील विजापूर मतदारसंघाचे आमदार चतुरसिंह जवानजी चावडा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चावडा यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राम मंदिराच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेवर नाराज असल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. चावडा लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे....19 Jan 2024 / No Comment /

गुजरातची निम्मी ग्रीन एनर्जी रिलायन्स तयार करणार

गुजरातची निम्मी ग्रीन एनर्जी रिलायन्स तयार करणारजामनगर, (१३ जानेवारी) – रिलायन्स गुजरातच्या हरित ऊर्जा क्षेत्रात पुढील १० वर्षे गुंतवणूक करत राहणार आहे. रिलायन्स २०३० पर्यंत गुजरातच्या जवळपास निम्म्या ग्रीन एनर्जीचे उत्पादन करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये ही घोषणा केली. हरित विकासामध्ये गुजरातचा जागतिक नेता म्हणून उदयास येण्यासाठी, रिलायन्सने जामनगरमध्ये ५,००० एकरच्या धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. अंबानी म्हणाले, यामुळे मोठ्या प्रमाणात हरित नोकर्‍या...14 Jan 2024 / No Comment /

श्रीराममंदिर सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारल्याने गुजरात काँग्रेस नेत्यांची नाराजी

श्रीराममंदिर सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारल्याने गुजरात काँग्रेस नेत्यांची नाराजी– सर्वजण न बोलावता देवाच्या द्वारी जाऊ शकतात, गांधीनगर, (१२ जानेवारी) – काँग्रेस नेतृत्वाने अयोध्येतील श्रीराममंदिर सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारल्याने गुजरात काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष गोहिल यांनी पक्षाच्या वतीने स्पष्टीकरण दिले. मात्र, अशा नाराजीमुळे भाजपाच्या हाती तयार मुद्दा मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी समाज माध्यमात आपल्या भावना व्यक्त केल्या. भगवान श्रीराम आराध्य देव असून, देशवासीयांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे...12 Jan 2024 / No Comment /

देशाची पहिली ’मेक इन इंडिया चिप’ गुजरातमध्ये बनणार

देशाची पहिली ’मेक इन इंडिया चिप’ गुजरातमध्ये बनणार– माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन, गांधीनगर, (१२ जानेवारी) – केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली व्हायब्रंट गुजरात समिट हे एक मॉडेल आहे, ज्यामुळे गुजरातमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग आले आहेत. देशातील पहिली मेक इन इंडिया चिप २०२४ मध्ये गुजरातमध्ये तयार केले जाणार आहे. १० व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या दुसर्‍या...12 Jan 2024 / No Comment /

नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान– मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन, अहमदाबाद, (१० जानेवारी) – नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. यासोबतच अंबानी म्हणाले की, त्यांची कंपनी रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे.येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या १० व्या आवृत्तीत बोलताना अंबानी म्हणाले की रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील. ते म्हणाले, गेल्या १० वर्षांत,...10 Jan 2024 / No Comment /

मारुती सुझुकी गुजरातमध्ये दुसरा प्रकल्प उभारणार

मारुती सुझुकी गुजरातमध्ये दुसरा प्रकल्प उभारणार– ३५ हजार कोटींची गुंतवणूक, – अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांची माहिती, गांधीनगर, (१० जानेवारी) – मारुती सुझुकी इंडिया गुजरातमध्ये आपला दुसरा प्रकल्प उभारण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पाची स्थापित उत्पादन क्षमता प्रतिवर्ष १० लाख युनिट्स असेल, असे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी बुधवारी सांगितले. व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिटच्या (व्हीजीजीएस) १० व्या आवृत्तीत ते बोलत होते. तोशिहिरो म्हणाले, गुजरातमध्ये दुसरा कार कारखाना उभारण्यासाठी आम्ही ३५ हजार...10 Jan 2024 / No Comment /

इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी भगवतगीता अभ्यासक्रमात समाविष्ट

इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी भगवतगीता अभ्यासक्रमात समाविष्ट– गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांची घोषणा, अहमदाबाद, (२२ डिसेंबर) – गुजरात सरकारने शुक्रवारी ’भगवद्गीता’ या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारतातील समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि प्राचीन संस्कृती आणि ज्ञान प्रणालीशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी सांगितले. केंद्राने तीन वर्षांपूर्वी तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) आराखड्यानुसार हा निर्णय घेण्यात...22 Dec 2023 / No Comment /

गुजरातच्या हिरे बाजाराची वार्षिक उलाढाल २ लाख कोटीपर्यंत जाणार

गुजरातच्या हिरे बाजाराची वार्षिक उलाढाल २ लाख कोटीपर्यंत जाणार– दीड लाख लोकांना मिळणार रोजगार, अहमदाबाद, (२१ डिसेंबर) – गुजरातमधील सूरत हिरे बाजार नवीन भारताचे सामर्थ्य आहे. या बाजाराचे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे. व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिट या नवीन हिरे बाजाराच्या वाढीला आणखी चालना देणार आहे. केंद्र सरकारचे रत्न आणि दागिन्यांसाठीचे महत्त्वाकांक्षी निर्यात लक्ष्य साध्य करण्यात मदत करेल. त्यामुळे या बाजाराची वार्षिक उलाढाल २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. उद्योग आणखी १.५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून...22 Dec 2023 / No Comment /

व्हॉट्सअपवर विवस्त्र महिलेशी बोलणे हिरे व्यापार्‍याला पडले महागात

व्हॉट्सअपवर विवस्त्र महिलेशी बोलणे हिरे व्यापार्‍याला पडले महागात– सहा लाख रुपये गमावले, सुरत, (२१ डिसेंबर) – गुजरातमधील सुरतमध्ये एका हिरे व्यापार्‍याने फसवणूक करणार्‍या महिलेला बळी पडून सहा लाख रुपये गमावले. या तरुणाने सुरत गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली पूजा शर्मा नावाच्या महिलेने १३ ऑगस्ट रोजी फेसबुकवर ३२ वर्षीय हिरे व्यापार्‍याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि महिलेशी बोलण्यास सुरुवात केली. दोघांनीही...22 Dec 2023 / No Comment /