|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.31° C

कमाल तापमान : 29.43° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 67 %

वायू वेग : 7.3 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.43° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.48°C - 29.09°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.38°C - 29.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.34°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.81°C - 28.79°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.4°C - 28.7°C

sky is clear
Home » रा. स्व. संघ, सेवाभारती » अपूर्व सेवा संगम २०१३

अपूर्व सेवा संगम २०१३

– सेवाकार्य
प्रत्येक माणसाच्या मनात समाजाचे एक वेगळे चित्र असते. समाजाने त्याला घडविले असते, शिकविले असते, संस्कारित केले असते. आजूबाजूचे शेजारी संकटाच्या वेळी धावून आलेले त्याने पाहिले असते. शिक्षकांनी विशेष परिश्रम घेऊन शिकविले असते. अनोळखी व्यक्तींनी प्राण वाचविताना त्याने पाहिलेले असते. आज समाज जर आपल्या पाठीशी उभा नसता, तर आपण एकटे काहीच करू शकलो नसतो, ही जाणीव त्याला समाजऋणाची आठवण करून देते. आपण समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीवच त्याला सेवेची प्रेरणा देऊन जाते व इथेच सेवाकार्याचा प्रारंभ माणसाच्या मनात होतो.
प्रत्येक माणसाच्या मनाच्या कोपर्‍यात सेवाभाव असतोच. माणूस जेव्हा मंदिर, मशीद, गुरुद्वारा, बुद्धविहारात जातो, आपल्या आराध्य देवतेसमोर नतमस्तक होतो. कदाचित काही मागायलाही जात असेल, पण जाता-जाता १०-२० रुपये दानपेटीत टाकतो, २-४ रुपये समोर बसलेल्या भिकार्‍याला देतो. पण, असा विचार करत नाही, हे पैसे कुठे खर्च होतात? फक्त त्याच्यात समर्पण हा भाव असतो. हा समर्पणाचा भावच माणसाला सेवेच्या दिशेने घेऊन जातो. म्हणजेच माणसाच्या अंत:प्रेरणेतून सेवावृत्तीचा जन्म होतो. त्याला कुणी सांगत नाही, केवळ आत्मप्रेरणेतून तो ते करीत असतो, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता.
प्रत्येक व्यक्तीला सेवेची आवड असते. पण, प्रत्येकाची रुची वेगळी असते, प्रेरणा वेगळी असते. मनाच्या गाभार्‍यातून त्याला जाणवते, मला या कामाची आवड आहे, या क्षेत्रात मी काम करण्याची गरज आहे, हे जाणवते तेव्हाच माणसाच्या अंत:प्रेरणेतून सेवाभावाचा प्रारंभ होतो.
रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस यांनी समाजमनाची ही गरज ओळखून, आपल्या सुसंस्कारित कार्यकर्त्यांच्या साह्याने संघामध्ये सेवाकार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यातूनच देशभर लाखो सेवा प्रकल्प सुरू झाले. या सेवेचा प्रारंभ विविध क्षेत्रांत झाला. कुणी शिक्षणाचे क्षेत्र निवडले, तर कुणी संस्काराचे, कुणी रुग्णाचे हाल होताना पाहिलेत आणि आरोग्यसेवेकडे वळले, कुणी रोजगारनिर्मितीसाठी, तर कुणी गृहोद्योग व महिलांसाठी झटले. त्यापैकीच एक शिकलेला तरुण गावाची दारुण अवस्था पाहून ग्रामविकासाकडे वळला. त्याने पाण्याचे स्रोत निर्माण केले, जमिनीची प्रत वाढविली. नवीन बियाणे आणून पीक घेण्यास प्रोत्साहित केले, मालाच्या विक्रीची व्यवस्था केली. गावातील लहान मुलांना शिक्षण व संस्कारांसाठी प्रोत्साहित केले. तरुणांना उद्योगासाठी मार्गदर्शन केले, महिलांना शिक्षण, रोजगार, लघुउद्योग, बचतगटासाठी प्रोत्साहित केले. वृद्धांना धार्मिक कार्याकडे वळविले. सर्वांना आरोग्याचे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आज मूक-बधिर, अंध, अपंग, अनाथ बालक, पर्यावरण, कुपोषण इ. विविध क्षेत्रांत अनेक सेवाप्रकल्प कार्यरत आहेत.
विविध क्षेत्रांतील सेवाप्रकल्प : १) आरोग्य, २) शिक्षण, ३) संस्कार, ४) स्वावलंबन, ५) आपत्ती प्रबंधन, ६) ग्रामविकास, ७) मूक-बधिर शाळा, ८) अपंगांसाठी, अंधांसाठी शाळा, ९) वृद्धाश्रम, १०) रुग्णसेवा, ११) कुपोषित बालक, १२) अनाथ शाळा, आश्रम, १३) पीडित नारी, १४) योगशिक्षण, १५) महिला स्वयंरोजगार, १६) वेश्यांच्या मुलांचे संगोपन, १७) दुर्बल मनस्क मुलांची शाळा, १८) देहदान प्रकल्प, १९) पर्यावरण, २०) संशोधन, २१) गो-अनुसंधान, २२) वनवासी क्षेत्र…ही सारी यादी अपुरी आहे. याशिवाय अनेक क्षेत्रांत सेवाप्रकल्प आहेत.
या कार्याचा विदर्भातील जनतेला परिचय व्हावा, सेवा कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम लोकांसमोर यावेत, यासाठी सेवा भारती व लोककल्याण समिती या संस्थेने हा सेवासंगम दि. २२-२३-२४ फेब्रुवारी २०१३ रोजी डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या प्रांगणात, रेशीमबाग येथे आयोजित केला आहे.
सेवा संगम २०१३ मध्ये सहभागी सेवा-संस्था : १) जनकल्याणकारी संस्था, २) श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, ३) लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट, ४) जीवन सुरक्षा प्रकल्प, ५) गणपतराव इंगोले स्मृती सेवा संस्था, ६) डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान न्यास, ७) विजया परिवार, ८) विमलाश्रम घरकूल-रामभाऊ इंगोले, ९) श्रीकृष्ण शांतिनिकेतन- प्रज्ञा राऊत, १०) देहदान सेवा, ११) मैत्री परिवार, १२) निसर्गालय- विजय घुगे, १३) वरदान, १४) सक्षम, १५) स्वावलंबी मतिमंद मुलांची शाळा, १६) आरोग्य भारती, १७) विवेकानंद केंद्र, १८) श्री शक्तिपीठ, १९) महिला कला निकेतन, २०) संघमित्रा सेवा प्रतिष्ठान, २१) भारतीय श्री विद्या निकेतन, २२) सेवा भारती, २३) देवी अहल्या स्मारक समिती, २४) इंद्रधनू, २५) स्वीकार, २६) मूक-बधिर मुलांची शाळा- सावनेर, २७) राष्ट्रीय दृष्टिहीन शिक्षण व पुनर्वसन संस्था, २८) रीसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया (कृतज्ञता), २९) संज्ञा संवर्धन, ३०) दीनदयाल शोध संस्थान, ३१) गोरक्षण सभा, धंतोली, ३२) दि ब्लाईंड रिलिफ असोसिएशन, ३३) स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, ३४) भारतीय उत्कर्ष मंडळ, ३५) डॉ. हेडगेवार स्मारक समिती, ३६) विश्‍व हिंदू जनकल्याण परिषद, ३७) भारतीय जनसेवा संस्थान, ३८) मातृशक्ती कल्याण केंद्र, ३९) गोविज्ञान अनुसंधान केंद्र, ४०) वनवासी कल्याण आश्रम, ४१) रा. स्व. संघ लोककल्याण समिती.
विदर्भ स्तरावरील कार्यरत सेवाभावी संस्था : १) डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, चंद्रपूर, २) जनजाती विकास समिती, चंद्रपूर, ३) रोल, चंद्रपूर, ४) जनकल्याण सेवा संस्था, ५) प्रज्ञा प्रबोधिनी, अमरावती, ६) ओलावा-अमरावती, ७) संपूर्ण बांबू केंद्र, अमरावती, ८) बचत गट (मंगलाताई वाघ), अमरावती, ९) दीनदयाल बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ, १०) माया पाखर, यवतमाळ, ११) वृद्धाश्रम, यवतमाळ, १२) संजीवनी सेवा, यवतमाळ, १३) तेजस्विनी, यवतमाळ, १४) केशव गोरक्षण संस्था, यवतमाळ, १५) वनवासी सेवा समिती, जामोद, १६) डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला, १७) आदर्श गो अनुसंधान केंद्र, १८) डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला, १९) समाज जागृती प्रतिष्ठान, भंडारा, २०) स्व. श्यामराव बापू कापगते ट्रस्ट, २१) भटके विमुक्त जाती विकास परिषद, भंडारा, २१) शुभकर्ता मंडल, गोंदिया, २२) अन्त्योदय संस्था, आमगाव, २३) नवनाथ सेवा ट्रस्ट, रामटेक.
सेवा संगम २०१३ : एक झलक
विदर्भात कार्यरत सर्व सेवा संस्थांचा परिचय व्हावा, सर्व संस्थांचे कार्य समाजासमोर यावे, बहुआयामी कार्यातून परस्परांना ऊर्जा मिळावी या हेतूने सेवा संगमचे आयोजन केले आहे.
या सेवा संगममध्ये विविध संस्थांची माहिती असणारे प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. प्रत्येक स्टॉलवर संस्थांची माहिती दृश्य स्वरूपात मांडली जाईल. विविध बॅनर, फोटो, भित्तिचित्रे, आलेख, सीडी, पीपीटी याद्वारे माहिती दिली जाईल. ही माहिती देण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर २ कार्यकर्ते हजर राहतील.
ही माहितीची गंगा डोळ्यांत, कानांत साठवत प्रदर्शनीतून पुढे सरकत आपण संकल्प तीर्थावर पोहोचाल, तेव्हा आपल्या मनात जागृत झालेला सेवाभाव संकल्पपत्राच्या रूपात भरून द्यावयाचा आहे. आपण प्रदर्शनी दालनातून जेव्हा बाहेर पडाल, तेव्हा आपल्याला एका सेवामूर्तीच्या प्रकट मुलाखतीचा आनंद घेता येईल. यांपैकी पहिली मुलाखत शुक्रवार दि. २२ फेब्रु. २०१३ रोजी संध्या. ६ वाजता विमलाश्रम- घरकूल या संस्थेचे संस्थापक रामभाऊ इंगोले यांची मुलाखत आशुतोष अडोणी घेतील; तर शनिवार दि. २३ फेब्रु. २०१३ रोजी धुळे जिल्ह्यातील, बारीपाडा या गावाचा, ग्रामविकासाच्या माध्यमातून कायापालट करून, गावाचे नाव जगाच्या नकाशावर आणणारे चैतराम पवार यांची प्रकट मुलाखत प्रकाश एदलाबादकर घेतील.
वेश्यांच्या मुलांची व्यथा व बारीपाडा गावाची कथा जाणून घेण्यासाठी काही क्षण इथे थांबायलाच हवे.
आवाहन : आपण या मातीतले सुपुत्र आहोत. आपली नाळ या मातीशी जुळलेली आहे. आपण या मातीतच घडलो, आपण या मातीचे काही देणे लागतो, हा भाव मनात घेऊन, वेळात वेळ काढून ही प्रदर्शनी पाहावयास यावे. आपल्यातील सर्वसामान्य माणसांनी अंत:प्रेरणेने हे काम उभे केले. आपल्या बंधूंनी हे काम उभे करताना किती कष्ट घेतले असतील, किती संकटांचा सामना केला असेल, किती दु:ख झेलले असेल, हे जाणून घेऊन स्वत:मधल्या माणसाला शोधा. आपली आवड नक्की कोणत्या क्षेत्रात आहे, हे जाणून घ्या आणि एक संकल्प मनाशी करून प्रदर्शनीच्या बाहेर या. नक्कीच तुमच्यातील माणूस तुम्हालाच सापडेल!
संजय वासुदेव कठाळे
९४२३६३०७०९

Posted by : | on : 19 Feb 2013
Filed under : रा. स्व. संघ, सेवाभारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g