|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.9° C

कमाल तापमान : 28.29° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.29° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 29.32°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.46°C - 29.47°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.37°C - 28.96°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.41°C - 28.55°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.42°C - 28.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.55°C - 29°C

sky is clear

मला कारागृहातून बाहेर काढा

मला कारागृहातून बाहेर काढा-इम्रानखान यांची वकिलांकडे गयावया, इस्लामाबाद, (०९ ऑगस्ट) – मी संपूर्ण आयुष्य कारागृहात राहायला तयार आहे,असे वक्तव्य एक दिवस आधी करणारे माजी पंतप्रधान इम्रानखान यांनी आज मात्र, ‘मला कारागृहात राहायचे नाही, कसेही करून बाहेर काढा,’ अशी गयावया आपल्या वकिलांकडे केली.तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरल्यानंतर तीन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेले इम्रान सध्या पंजाब प्रांतातील अ‍ॅटॉक कारागृहात बंद आहेत. मागील शनिवारी अटक केल्यानंतर त्यांची या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांच्या खोलीत ढेकूण...9 Aug 2023 / No Comment /

लाल समुद्रात होणार मोठे युद्ध!

लाल समुद्रात होणार मोठे युद्ध!तेहरान, (०८ ऑगस्ट) – जगात आधीच एक मोठे युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धादरम्यान लाल समुद्रातही मोठे युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. सुएझ कालव्यातून लाल समुद्राच्या परिसरात येणारी जहाजे इराणने ताब्यात घेतल्याच्या घटनांनंतर अमेरिका आणि इराण आमनेसामने आले आहेत. दरम्यान, इराणला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेच्या नौदलाचे ३००० जवान दोन युद्धनौकांवर बसून लाल समुद्रात पोहोचले आहेत. इराणने अमेरिकन टँकरवर ताबा घेतल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे इराणही प्रत्येक परिस्थितीला...8 Aug 2023 / No Comment /

आम्ही आंघोळही करू शकत नाही; तुर्कीवर नवीन संकट

आम्ही आंघोळही करू शकत नाही; तुर्कीवर नवीन संकटअंकारा, (०७ ऑगस्ट) – विनाशकारी भूकंपाचा तडाखा बसलेल्या तुर्कस्तानमध्ये पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. भूकंपात कसातरी जीव वाचवणार्‍या लोकांना आता कडक उन्हात आणि उन्हात पाण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोक अंघोळीसाठी तळमळत आहेत. दुसरीकडे, भूकंपामुळे सर्व उद्ध्वस्त झाल्यामुळे, भूगर्भातील पाईप आणि पाणी पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी तुर्की सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी धडपडत आहेत. एका वृत्तानुसार, हाते प्रांताची राजधानी अंताक्यामध्ये उष्णतेची...7 Aug 2023 / No Comment /

हिजाब न घालणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा

हिजाब न घालणाऱ्या महिलांना मृतदेहांच्या साफसफाईची शिक्षा– इराणचा अजब कारभार, तेहरान, (०७ ऑगस्ट) – इराण सरकार हिजाब परिधान करण्यावरून आक्रमक झाले आहे. त्यामुळे महिलांवर प्रतिबंध घालण्यात येत असून, हिजाब परिधान न करणार्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सुनावण्यात येत आहे. ज्या महिला हिजाबच्या नियमांचे उल्लंघन करेल, त्या महिलांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. इराण सरकार हिजाब न घालणार्या महिलांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी पाठवत आहे. महिला जितक्या जास्त नियमांचे उल्लंघन करतील, तितकीच सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करीत आहे. इराणची...7 Aug 2023 / No Comment /

रशिया-युक्रेन युद्धावर भारत काढणार तोडगा

रशिया-युक्रेन युद्धावर भारत काढणार तोडगा-अजित डोवालांनी दिले स्पष्ट संकेत, जेद्दाह, (०६ ऑगस्ट) – रशिया-युक्रेन संघर्षाला दीड वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी अद्याप दोन्ही बाजूंनी माघार घेण्याची शक्यता दिसत नाही. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारत हा एकमेव देश आहे, ज्याचे रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांचे नेते ऐकतात आणि भारताची भूमिका गांभीर्याने घेतात. दोन्ही बाजूला भारताची सारखीच मदत आणि सहकार्याची भूमिका राहिली आहे. अशा स्थितीत युद्ध थांबविण्याच्या प्रयत्नात भारत सक्रिय भागीदार राहू शकतो, असे स्पष्ट संकेत...6 Aug 2023 / No Comment /

इम्रान खान यांना अटक

इम्रान खान यांना अटक– तोशखाना प्रकरणी तीन वर्षांचा कारावास, – निवडणूक लढविण्यास पाच वर्षे मनाई, इस्लामाबाद, (०६ ऑगस्ट) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी विशेष न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात आली. या शिक्षेमुळे त्यांना आपली खासदारकीही गमवावी लागली असून पुढील पाच वर्षे त्यांना निवडणूकही लढविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधानपदी असताना इम्रान खान यांनी सरकारच्या तिजोरीतील महागड्या भेटवस्तूंची विक्री करून, स्वत:चा आर्थिक...6 Aug 2023 / No Comment /

५७ इस्लामिक देशांची जळफळाट

५७ इस्लामिक देशांची जळफळाटतेहरान, (०१ ऑगस्ट) – कुराण वारंवार जाळण्यावरून स्वीडनमध्ये वाद सुरूच आहे. या घटनेबाबत अनेक इस्लामिक देशांमध्ये स्वीडनविरोधात निदर्शने झाली. या घटनेमुळे इस्लामिक देशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात, ५७ इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) ने पुन्हा बैठक घेतली. स्वीडन, डेन्मार्क किंवा ज्या देशात कुराण दहनाच्या घटना घडतात त्या देशांवर आवश्यक कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. बैठकीच्या सुरुवातीला ओआयसीचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा...1 Aug 2023 / No Comment /

निवडणूक जिंकल्यास नवाज शरीफ पंतप्रधान

निवडणूक जिंकल्यास नवाज शरीफ पंतप्रधान– शाहबाज शरीफ यांचे संकेत, इस्लामाबाद, (०१ ऑगस्ट) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्थमंत्री इशाक दार यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची शक्यता फेटाळली असून, आगामी सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक व्हाव्या म्हणून पुढील महिन्यात अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी तटस्थ व्यक्तीची निवड केली जाईल, असे म्हटले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी संकेत दिले की, २०१९ पासून लंडनमध्ये निर्वासिताचे जीवन जगत असलेले आणि पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान...1 Aug 2023 / No Comment /

पाकिस्तानात पावसामुळे प्रचंड नुकसान, १४ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात पावसामुळे प्रचंड नुकसान, १४ जणांचा मृत्यूइस्लामाबाद, (२९ जुलै) – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत संपूर्ण पाकिस्तानमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान १४ लोक ठार आणि सात जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, मान्सूनच्या पावसाच्या प्रकोपामुळे पर्वतीय भागात पूर आला आहे, शहरी भाग पाण्याखाली गेले आहेत आणि देशभरातील घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असे म्हटले आहे. माहितीनुसार, पख्तुनख्वामध्ये सहा, बलुचिस्तानमध्ये पाच, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन आणि सिंधमध्ये एक जण मरण...29 Jul 2023 / No Comment /

पाकिस्तानच पाठवत आहे भारतात ड्रग्ज!

पाकिस्तानच पाठवत आहे भारतात ड्रग्ज!-शाहबाज शरीफ यांच्या निकटवर्तीयांचा खुलासा, इस्लामाबाद, (२८ जुलै) – सीमेवरून भारतात ड्रग्ज पाठवण्यामागे पाकिस्तानची भूमिका समोर आली आहे. पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ यांच्या निकटवर्तीयाने खुद्द पाकिस्तानी तस्कर भारतात ड्रोन पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे ही कबुली अशा वेळी आली आहे जेव्हा भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोनच्या कारवाया सातत्याने होत आहेत. पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान शरीफ यांचे सल्लागार मलिक मोहम्मद अहमद खान...28 Jul 2023 / No Comment /

म्यानमारच्या ७१८ नागरिकांची घुसखोरी

म्यानमारच्या ७१८ नागरिकांची घुसखोरीइम्फाळ, (२६ जुलै) – मागील आठवड्यात म्यानमारमधील ७१८ नागरिकांनी राज्यात घुसखोरी केली. यात ३०१ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती मणिपूर सरकारने दिली. २२ आणि २३ जुलै रोजी चंदेल जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमांचे रक्षण करणार्या आसाम रायफल्सने या बेकायदेशीर घुसखोरीची नोंद केली, असे गृह विभागाने म्हटले आहे. योग्य दस्तावेज नसताना म्यानमारच्या नागरिकांना का परवानगी देण्यात आली, याची माहिती मुख्य सचिव विनीत जोशी यांनी मागितली असून, त्यांना तत्काळ माघारी पाठविण्यास सांगितले आहे. घुसखोरी...26 Jul 2023 / No Comment /

चीन पुन्हा पृथ्वीच्या गर्भात करतोय १०,००० मीटर खोल खड्डा

चीन पुन्हा पृथ्वीच्या गर्भात करतोय १०,००० मीटर खोल खड्डाबीजिंग, (२१ जुलै) – भारताचा शेजारी चीन पुन्हा एकदा जमिनीत १०,००० मीटर खोल खड्डा खोदत आहे. काही काळापुरती चीननेही जमिनीत असेच छिद्र पाडले होते. वास्तविक या माध्यमातून चीन नैसर्गिक वायूचे साठे शोधत आहे. चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सिचुआन प्रांतातील शेंडी चुआनके येथे विहीर खोदण्यास सुरुवात केली, ज्याची खोली १०,५२० मीटर (६.५ मैल) आहे, असे वृत्त पुढे आले आहे. यापूर्वी मे महिन्यात सीएनपीसीने शिनजियांगमध्ये असाच खोल खड्डा खोदण्यास सुरुवात केली होती....21 Jul 2023 / No Comment /