|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.89° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 2.38 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.44°C - 30.82°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.15°C - 31.32°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.76°C - 29.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.37°C - 30.01°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.04°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.7°C - 29.86°C

sky is clear

चीन पुन्हा पृथ्वीच्या गर्भात करतोय १०,००० मीटर खोल खड्डा

चीन पुन्हा पृथ्वीच्या गर्भात करतोय १०,००० मीटर खोल खड्डाबीजिंग, (२१ जुलै) – भारताचा शेजारी चीन पुन्हा एकदा जमिनीत १०,००० मीटर खोल खड्डा खोदत आहे. काही काळापुरती चीननेही जमिनीत असेच छिद्र पाडले होते. वास्तविक या माध्यमातून चीन नैसर्गिक वायूचे साठे शोधत आहे. चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सिचुआन प्रांतातील शेंडी चुआनके येथे विहीर खोदण्यास सुरुवात केली, ज्याची खोली १०,५२० मीटर (६.५ मैल) आहे, असे वृत्त पुढे आले आहे. यापूर्वी मे महिन्यात सीएनपीसीने शिनजियांगमध्ये असाच खोल खड्डा खोदण्यास सुरुवात केली होती....21 Jul 2023 / No Comment /

सीमा हैदरचा बदला! पाकमध्ये तीन हिंदू बहिणींचे अपहरण अन् धर्मांतर

सीमा हैदरचा बदला! पाकमध्ये तीन हिंदू बहिणींचे अपहरण अन् धर्मांतरसिंध, (२१ जुलै) – पाकिस्तानमध्ये तीन हिंदू बहिणींचे अपहरण करून बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारून त्यांच्याशी विवाह केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे, जिथे हिंदूंची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. येथे काही मुस्लिम तरुणांनी एका हिंदू व्यावसायिकाच्या तीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले आणि अपहरणकर्त्यांनी त्यांच्याशीच लग्न केले. या घटनेनंतर सिंधसह संपूर्ण पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना...21 Jul 2023 / No Comment /

बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले रावळपिंडी हे नाव

बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले रावळपिंडी हे नाव– पाकिस्तानी लेखक सज्जाद अजहर यांचा उघडपणे दावा, रावळपिंडी, (२१ जुलै) – पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहराबाबत नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानचे प्रसिद्ध लेखक सज्जाद अजहर यांचा आहे. ‘रावळपिंडी’ हे नाव हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले आहे, असा दावा सज्जाद यांनी केला आहे. १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीमुळे निर्माण झालेला पाकिस्तान हा इस्लामिक धार्मिक देश बनला. फाळणीपूर्वी...21 Jul 2023 / No Comment /

सीमा हैदरवर पाकची पहिली प्रतिक्रिया…

सीमा हैदरवर पाकची पहिली प्रतिक्रिया…इस्लामाबाद, (१४ जुलै) – सीमा हैदरच्या मुद्द्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यात भारताला सीमा हैदरबद्दलच्या बातम्या आणि तिच्या प्रकृतीची माहिती पडताळून पाहण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की आम्ही कॉन्सुलर ऍक्सेसची विनंती देखील केली आहे. आम्ही भारताकडून उत्तराची वाट पाहत आहोत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला पत्रकारांनी विचारले की, सीमा हैदर सध्या भारतात चर्चेत आहेत. सीमा हैदरला भारतातून रॉ एजंट म्हणून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते आणि ती व्हिसाशिवाय...14 Jul 2023 / No Comment /

जयशंकर यांची आसियन समकक्षांसोबत भेट

जयशंकर यांची आसियन समकक्षांसोबत भेटजकार्ता, (१३ जुलै) – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज गुरुवारी दक्षिण-पूर्व आशियायी देशांच्या संघटनेच्या (आसियन) परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. वित्तीय तंत्रज्ञान, अन्नधान्य सुरक्षा आणि अंतराळ यासार‘या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेतला. एस. जयशंकर सध्या आसियन देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्याच्या निमित्ताने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे उपस्थिती आहे. भेटीत त्यांनी सिंगापूरचे अनिवासी भारतीय परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालाकृष्णन् आणि ब्रुनेईचे मंत्री दातो एरिवान पेहिन युसूफ यांचीसुद्धा भेट घेतली....14 Jul 2023 / No Comment /

पाक म्हणतो, भारतामुळे आमच्या देशात पूर!

पाक म्हणतो, भारतामुळे आमच्या देशात पूर!इस्लामाबाद, (११ जुलै) – सध्या पाकिस्तानच्या पूर्व लाहोरमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तेथील लोकांनी या पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे. पुरासाठी भारतावर आरोप करत पाकिस्तानी लोक म्हणाले की, भारत गरज असताना पाणी देत नाही आणि गरज नसताना पाणी देतो. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार, भारताने किमान १ लाख ८५ हजार क्युसेक पाणी सोडले आहे. यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरस्थितीचा इशारा जारी केला आहे. पाकिस्तानच्या रावी...11 Jul 2023 / No Comment /

आता कधीच वृद्ध होणार नाही माणूस!

आता कधीच वृद्ध होणार नाही माणूस!-चिनी शास्त्रज्ञाचा धक्कादायक दावा, बीजिंग, (११ जुलै) – आपले वय वेगाने वाढू नये, आपण लवकर वृद्ध होऊ नये, तसेच कायम तरुण, सुंदर आणि चपळच राहावे अशी जगातील बहुतांश स्त्री-पुरुषांची इच्छा असते. जगातील बहुतांश लोकांना त्यांच्या वाढत्या वयाची चिंता असते कारण त्यांना लवकर वृद्ध व्हायचे नसते. या पृष्ठभूमीवर ‘आपण असा एक शोध लावला आहे की ज्यामुळे आता माणूस कधीच वृद्ध होणार नाही व मानवांचे वृद्धत्व थांबू शकते’, असा दावा एका चिनी...11 Jul 2023 / No Comment /

चीनला माझ्याशी संपर्क साधायचा आहे!

चीनला माझ्याशी संपर्क साधायचा आहे!-दलाई लामा यांचा मोठा खुलासा, धरमशाला, (०८ जुलै) – तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी तिबेटी लोकांच्या समस्यांवर चीनशी चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. दिल्ली आणि लडाखच्या भेटीपूर्वी धरमशाला येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की चिनी लोकांना त्यांच्याशी अधिकृत किंवा अनौपचारिक संपर्क साधायचा आहे. ते म्हणाले, मी चर्चेसाठी नेहमीच तयार असतो. आता चीनलाही हे समजले आहे की तिबेटी लोकांचे धैर्य खूप मजबूत आहे. त्यामुळे तिबेटच्या समस्यांना तोंड देण्यासाठी ते माझ्याशी...8 Jul 2023 / No Comment /

पाकिस्तानी संसद १३ ऑगस्टला विसर्जित होणार

पाकिस्तानी संसद १३ ऑगस्टला विसर्जित होणार– पुढील निवडणूक नवाज शरीफ लढवण्याची शक्यता, इस्लामाबाद, (०८ जुलै) – पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली अर्थात् संसद १३ ऑगस्टला विसर्जित केली जाणार आहे. पाकिस्तानचे विधि मंत्री आझम नजीर तरार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान नवाज शरीफदेखील निवडणूक लढवू शकणार आहेत. नवीन निवडणूक कायद्यानंतर पीएमएल-एन सुप्रीमोवरील बंदी उठवण्यात आली आहे. आता ते आणि पाकिस्तान शुगर माफिया जहांगीर खान निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. पाकिस्तानच्या एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना...8 Jul 2023 / No Comment /

पाकिस्तान बनणार आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार

पाकिस्तान बनणार आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदारइस्लामाबाद, (०३ जुलै) – गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला आयएमएफचा पाठिंबा मिळाला आहे. पुढील नऊ महिन्यांत पाकिस्तानला आयएमएफकडून तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळणार आहे. हे नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार बनणार आहे. सध्या पाकिस्तान आयएमएफचा पाचवा सर्वात मोठा कर्जदार आहे, परंतु तीन अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान चौथा सर्वात मोठा कर्जदार बनेल. अर्जेंटिना सर्वात मोठा कर्जदार पाकिस्तान १९४७ मध्ये स्थापन झाल्यापासून सर्वात वाईट आर्थिक...3 Jul 2023 / No Comment /

इस्रायलच्या लष्करी कारवाईत ७ पॅलेस्टिनी ठार

इस्रायलच्या लष्करी कारवाईत ७ पॅलेस्टिनी ठार– वेस्ट बँकमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले, जेरुसलेम, (०३ जुलै) – इस्रायलने सोमवारी पहाटे व्याप्त वेस्ट बँकमधील अतिरेक्यांच्या तळांना लक्ष्य करीत ड्रोनने हल्ला केला. दोन दशकांपूर्वी पॅलेस्टिनी उठावाच्या दरम्यान केलेल्या व्यापक लष्करी कारवायांप्रमाणेच या भागात शेकडो सैन्य तैनात केले. या हल्ल्यात किमान सात पॅलेस्टिनी ठार झाले, असे स्थानिक आरोग्य अधिकार्यांनी सांगितले. सैन्य सोमवारी मध्यरात्री जेनिन शरणार्थी शिबिरात राहिले आणि एका वर्षाहून अधिक काळच्या लढाईत या भागातील सर्वात मोठे हल्ले करण्यात आले....3 Jul 2023 / No Comment /

पुतिन यांना भारताच्या प्रगतीचा अभिमान

पुतिन यांना भारताच्या प्रगतीचा अभिमान-मेक इन इंडियाचे जोरदार कौतुक, मॉस्को, (३० जून) – रशियाने पुन्हा एकदा मित्र देश भारताचे कौतुक केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत मेक इन इंडिया उपक्रमाचे कौतुक केले. मॉस्को येथे झालेल्या एका कार्यक्रमात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियाचे सर्वात मोठे मित्र असल्याचे वर्णन करून त्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या सर्वोत्तम उदाहरणांचा...30 Jun 2023 / No Comment /