Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पठाणकोटसारख्या घटना घडतच राहणार

पठाणकोटसारख्या घटना घडतच राहणार

=मुशर्रफ यांचे ‘नापाक’ बोल=
pervez-musharrafइस्लामाबाद, [१२ जानेवारी] – भारतावर कारगिल युद्ध लादणारे आणि आपल्याच देशात देशद्रोहाचा आरोपी ठरलेले पाकिस्तानचे माजी हुकुमशाह परवेझ मुशर्रफ यांनी, पठाणकोटसारखे हल्ले भविष्यातही होतच राहणार असल्याने भारताने फार जास्त प्रतिक्रियावादी असू नये, असे नापाक वक्तव्य केले आहे.
पाकमधील ‘आज’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ बोलत होते. एकटा भारतच दहशतवदी कारवायांचा सामना करीत नाही, तर पाकलाही दहशतवादी कारवायांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एखादा हल्ला झाल्यानंतर भारताने लगेच प्रतिक्रिया द्यायला नको. अशा प्रकारचे हल्ले व्हायला नको, असे आम्हालाही वाटते. पण, हे हल्ले होतच राहणार आहेत, असे मुशर्रफ यांनी या मुलाखतीत बोलताना सांगितले.
भारतात जेव्हाजेव्हा दहशतवादी हल्ला होत असतो, त्या प्रत्येक वेळी हा देश पाकिस्तानवर दबाव आणत असतो. प्रत्येक हल्ल्यात भारताची पहिली प्रतिक्रिया पाकला आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करणारी असते. आमच्या देशातीलही काही दहशतवादी हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे भारताने वारंवार पाककडे बोट दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात लाहोरमध्ये झालेल्या बैठकीवरही टीका केली. शरीफ यांची भेट घेण्यासाठी नरेंद्र मोदी अचानकपणे लाहोरला आले. ही बैठक निव्वळ देखावा होती, मोदींचा हेतू प्रामाणिक नव्हता, असे सांगण्याचा विसरही त्यांना पडला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26497

Posted by on Jan 13 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया (125 of 351 articles)


=पठाणकोट हल्ला, आयएसआय, लष्करी अधिकार्‍यांचा समावेश= इस्लामाबाद, [११ जानेवारी] - पठाणकोट येथील वायुदलाच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी ...

×