Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

ब्रेक्झिटच्या सर्वच पर्यायी योजनांविरोधात मतदान

लंडन, २ एप्रिल –

Brexit

Brexit

युरोपियन युनियनसोबत केलेला करार तीन वेळा नाकारणार्‍या ब्रिटिश खासदारांनी ब्रेक्झिटच्या चार संभाव्य पर्यायी योजनांच्या विरोधात आज मंगळवारी मतदान केले आहे. युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यावर त्यासोबत आर्थिक संबंध कायम ठेवण्यासाठी प्रस्तावित पर्यायानुसार दुसर्‍यांदा सार्वमत घेण्यासाठी किंवा ब्रेक्झिट रोखण्यासाठी बहुमत प्राप्त करण्यास ब्रिटिश संसद अपयशी ठरली आहे. दुसर्‍या सार्वमतादरम्यान प्रस्तावाच्या बाजूने सर्वाधिक २८० मते प्राप्त झाली. मात्र, प्रस्तावाविरोधात २९२ मते पडली आहेत. युरोपियन युनियनसोबत कायम ठेवण्याचा सर्वाधिक मते प्राप्त झालेला पर्याय होता. या पर्यायाच्या बाजूने २७३ मते प्राप्त झाली. मात्र, या प्रस्तावाविरोधात २७६ मते पडली आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला पाठिंबा देणार्‍यांना अद्यापही आशेचा किरण दिसत आहे. आपण सादर केलेली योजना सर्वोत्तम होती, असे मतदानानंतर सांगताना सरकारने, पुढील आठवड्यात हा प्रस्ताव परत सादर केला जाण्याचे संकेत दिले आहे.
कोणत्याही एका प्रस्तावावर संसदेत बहुमत प्राप्त करण्यात परत एकदा अपयशी ठरलो आहोत, असे ब्रेक्झिटचे सचिव स्टिफन बर्क्ले यांनी मतदानानंतर खासदारांना सांगितले.
उद्भवलेल्या कायदेशीर परिस्थितीमुळे कोणताही ठोस पर्याय न निवडता इंग्लंड ११ दिवसांच्या कालावधीत युरोपियन युनियनबाहेर पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35605

Posted by on Apr 3 2019. Filed under आंतरराष्ट्रीय, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, युरोप (2 of 353 articles)


=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही ...

×