Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » हेडली भारताचा एजंट : पाकची मुक्ताफळे

हेडली भारताचा एजंट : पाकची मुक्ताफळे

Pakistan's Interior Minister Rehman Malik speaks during an interview with Reuters in lslamabadइस्लामाबाद, [११ फेब्रुवारी] – २६/११ ला मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडली याने दिलेली साक्ष खोटी असून, हेडली भारताची गुप्तचर संस्था रॉचा एजंट असल्याची मुक्ताफळे पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी उधळली आहेत.
पाकला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, सोयीनुसार त्याची साक्ष नोंदविण्यात आली आहे. मुंबईत हल्ला घडवून आणण्यासाठी रॉ या गुप्तचर संस्थेनेच त्याची मदत घेतली आणि दिशाभूल करणारी साक्ष नोंदवली, असा आरोपही त्यांनी केला आहे. हेडलीचा प्रवास खर्च कोणी केला व हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांची भरती कोणाच्या निर्देशानुसार करण्यात आली, याचे पुरावे आमच्याजवळ आहेत, असेही त्यांनी सांगितले. मुंबई हल्ल्यातील सहभागावरून ५५ वर्षीय हेडलीला अमेरिकेत ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्यात आपला सहभाग आहे. मुंब्रातील इशरत जहां लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक असून, या हल्ल्यासाठी पाकिस्तानातून आर्थिक मदत करण्यात आली असल्याचा कबुलीजबाब हेडलीने दिला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीची साक्ष नोंदवण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा त्याने केल्यानंतर पाकने भारताच्याच दिशेने बोट दाखवून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26815

Posted by on Feb 12 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया (108 of 351 articles)


=अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकार्‍याचा दावा= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - अल् कायदा या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन ...

×