Home » कला भारती » राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

मुंबई, [२२ ऑगस्ट] – ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीनेच म्हणते की, आता लेडी सिंघम यायला हवा आणि हा योगायोग म्हणावा की काय दुसर्‍याच शुक्रवारी राणीचा ‘मर्दानी’ चित्रपट पडद्यावर झळकतो. राणी मुखर्जी यात लेडी सिंघमच्या रूपात म्हणजे पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसते.
‘मर्दानी ’म्हणजे चोर आणि पोलिसांचा खेळ. मात्र चाईल्ड ट्रॅफिं किंगची पार्श्‍वभूमी या चित्रपटात दाखविली आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेला देह व्यापार आणि त्यात प्रामुख्याने लहान अनाथ मुलींना ओढले जाते. या सर्वाविरोधात ‘मर्दानी’ म्हणजे शिवानी रॉयचा लढा. पोलिसाच्या भूमिकेत राणीने तर खलनायकाच्या भूमिकेत ताहिर भसीनची जबरदस्त भूमिका पाहायला मिळते.
जगात बालकांच्या लैंगिक शोषणाच्या अवैध व्यापाराचे भारत मोठे केंद्र आहे. भारतात प्रत्येक आठ मिनिटाला एक मुलगी बेपत्ता होते. त्यात गरीब आणि अनाथ मुलींचे तर अपहरण ठरलेलेच आहे तर शोषण बड्या लोकांकडून केले जाते. हाच विषय चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकारने या चित्रपटात मांडला आहे. या भूमिकेला राणी मुखर्जीने पूर्णपणे न्याय दिला आहे. या चित्रपटात केवळ महिला पोलिसांचा संघर्षच नाही तर देह व्यापार आणि अपहरणाच्या निमित्ताने पुरूषांची मानसिकताही दाखविली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=16003

Posted by on Aug 25 2014. Filed under कला भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती (20 of 30 articles)


=मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रावर शोककळा= मुंबई, [६ ऑगस्ट] - मराठी बातम्यांसाठी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीचा प्रारंभ करणार्‍या आणि नंतरच्या काळात ...

×