Home » क्रीडा » नेमबाज बिन्द्राला सुवर्ण, गोयलला रौप्यपदक

नेमबाज बिन्द्राला सुवर्ण, गोयलला रौप्यपदक

ग्लास्गो, [२५ जुलै] – राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवातील दुसर्‍या दिवशी भारताचा विश्‍व विख्यात नेमबाज अभिनव बिन्द्रा याने सुवर्णपदक आणि त्यापूर्वी १६ वर्षाच्या मलाईका गोयलने रौप्यपदक पटकावले. तर विश्‍व अग्रस्थानावरील हीना सिध्दूला निराशा हाती आली.
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास भारताचा विख्यात नेमबाज अभिनव बिन्द्रा याने सुवर्ण नेम साधला. भारताचे हे तिसरे सुवर्ण ठरले.
२००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा अभिनव बिन्द्रा आणि रविकुमार हे नेमबाजव्दयांनी १० मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत बिन्द्रा तिसर्‍या व रविकुमार चौथ्या स्थानी आला होता. त्याच वेळी भारताला दोन पदके नक्कीच मिळतील असे वाटत होते.
अभिनव बिन्द्राची ही शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा गणली जात आहे. आज त्याने भारताचा तिरंगा डौलात फडकविला. २० शॉट्‌स मारले व त्यातून २०५.३ गुणांची नोंद केली. बांगलादेशचा अब्दुल्ला बालू दुसर्‍या स्थानी (२०२.१ गुण) आणि इंग्लंडचा डॅनियल रिव्हर्स तिसर्‍या स्थानी (१८२.४ गुण) आला.
राष्ट्रकुलमधील त्याचे हे पहिलेच वैयक्तिक गटातील सुवर्ण ठरले आहे. याअगोदर त्याने मॅन्चेस्टरमध्ये (२००२), मेलबर्नमध्येे (२००६) आणि चार वर्षापूर्वी नवी दिल्लीत (२०१०)
३१ वर्षीय अभिनव बिन्द्रा याने पेयर्समध्ये सुवर्णांची कमाई केली होती. भारताचा अन्य नेमबाज रविकुमार अंतिम फेरीपूर्वी आघाडीवर असायचा. पण निर्णायक क्षणी तो चौथ्या स्थानावर माघारला.
१६ वर्षाच्या मलाईका गोयलने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात रौप्यपदक मिळविले. अंतिम फेरीत एकूण १९७.१ गुण मिळविले होते. याच प्रकारातील सुवर्णपदक सिंगापुरातील शून हिने नव्या विक्रमासह मिळविले. कॅनडाची लुईविकला कांस्य मिळाले.
पात्रता फेरीत मलाईकाने ३७८ गुण घेत चौथे स्थान मिळवले होते. तर दुसरीकडे हीनाला पात्रता फेरीत ३८३ गुण मिळाले व ती पहिल्या स्थानावर होती. पण अंतिम फेरीत तिला सातवे स्थान मिणाल्याने पदकाने तिला हुलकावणी दिली.
भारताची सुनीबाला हुईड्रोम महिलांच्या ७० किलो वजन गटात ऑस्ट्रेलियाच्या ऍस्क्वाटकडून पराभूत झाली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14440

Posted by on Jul 26 2014. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (24 of 43 articles)


=२८ वर्षानंतर भारताचा इंग्लंडवर विजय= लंडन, [२१ जुलै] - ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या (७-७४) जोरावर, क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या ...

×