Home » क्रीडा » फ्रान्स अंतिम सोळात, इक्वाडोरचा विजय

फ्रान्स अंतिम सोळात, इक्वाडोरचा विजय

साल्वा डोर, [२१ जून] – येथील एरेना फोंटे नोवात झालेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीत बलाढ्य फ्रान्स संघाने स्वित्झर्लंड संघावर ५-२ गोल फरकाने विजय नोंदवित अंतिम १६ संघात धडक दिली. अन्य सामन्यात इक्वाडोर संघाने होेंडुरास संघावर २-१ गोलने विजय मिळविला.
विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेतील ई गटात फ्रान्स संघाने मोठा विजय मिळविला. या स्पर्धेत त्यांचा सलग दुसरा विजय आहे. खेळातील १७ व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऑलियर गिरोल्ड याने हेडिंगवर पहिला गोल केला. पुढच्याच मिनिटाला ब्लेस याने गोल झळकवून फ्रान्सला २-० ची आघाडी मिळवून दिली.
जलपानास खेळ थांबण्यापूर्वी म्हणजे खेळातील ४० व्या मिनिटाला वॉल्बवेना याने गोल करुन फ्रान्सची बाजू भक्कम केली, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडचा संघ प्रचंड दबावात आला. मध्यंतरापर्यंत फ्रान्स ३-० ने आघाडीवर होता.
उत्तरार्धात ब्लेरिम याने गोल करून स्वित्झर्लंड संघासाठी पहिला गोल खेळातील ८१ व्या मिनिटाला केला त्यावेळी त्यांचा संघ १-५ ने माघारला होता. ८७ व्या मिनिटाला यानिटने गोल केला. पण तोपर्यंत त्यांच्या हातून वेळ निघून गेली होती. ते २-५ ने माघारले होते. स्वित्झर्लंडच्या गोलरक्षकाने फ्रान्सची पेनल्टी अडविली. पहिल्या सामन्यात फ्रान्सने होंडुरासचा ३-० गोलने पराभव केला होता.
इक्वाडोरचा विजय
अन्य सामन्यात इक्वाडोर संघाने होंडुरास संघाचा २-१ गोलने पराभव केला. सलग पराभवासह होंडुरासचा संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. या सामन्यात २४ वर्षीय वेहेलेंसिया याने संघासाठी दोन्ही गोल केले. त्याचीच सामनावीर मानासाठी निवड झाली.
इक्वाडोर संघाने जर पुढच्या (बुधवारी) सामन्यात फ्रान्सचा पराभव केला तर त्यांचा संघ अंतिम १६ संघात दाखल होवू शकतो. याअगोदर २००६ मध्ये त्यांचा संघ अंतिम १६ मध्ये पोचला होता. पराभूत होंडुरासतर्फे एकमेव गोल कोस्टली याने केला. विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात होंडुरासकडून पहिला गोल करण्याचा मान त्याला मिळाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13690

Posted by on Jun 21 2014. Filed under क्रीडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा (40 of 43 articles)


=इराण, नायजेरिया ०-० ने बरोबरीत= नताल, [१७ जून] - ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकाने विजय नोंदविला. तर ...

×