Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अडवाणींना ‘पद्म विभूषण’, रामदेव बाबांना ‘पद्म’?

अडवाणींना ‘पद्म विभूषण’, रामदेव बाबांना ‘पद्म’?

got-padma-awards-advani-and-ramdevनवी दिल्ली, [६ जानेवारी] – माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पद्म विभूषण या दुसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर योग गुरू रामदेव बाबा यांना ‘पद्म‘ पुरस्कारापैकी एक पुरस्कार जाहीर होण्याची चर्चा सुरू आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केल्यानंतर आता ‘पद्म विभूषण’ पुरस्कारसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. हा पुरस्कार देशातील दुसरा मानाचा पुरस्कार मानला जातो. तर त्यानंतर ‘पद्म’ पुरस्काराचे स्थान आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘पद्म विभूषण’ तर योग गुरू रामदेव बाबा यांच्यासह प्रो. डेव्हिड फ्रावली यांची नावे ‘पद्म’ पुरस्कारासाठी शर्यतीत असल्याचं सांगितले जात आहे. याशिवाय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचीही शिफारस ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19494

Posted by on Jan 6 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2284 of 2477 articles)


पाकच्या कुरापती सुरूच जवान शहीद भारताचे चोख प्रत्युत्तर जम्मू, [५ जानेवारी] - रविवारची रात्र शांत राहिल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी सांबा ...

×