Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अडवाणी, अमिताभ, दिलीप कुमार यांना पद्म विभूषण

अडवाणी, अमिताभ, दिलीप कुमार यांना पद्म विभूषण

  • डॉ. विजय भटकर, हरीश साळवे यांना पद्म भूषण
  • ७५ जणांचा पद्मश्रीने होणार गौरव

lk-advani-amitabhनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – भाजपाचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भारतीय चित्रपट सृष्टीचे सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह एकूण नऊ जणांना पद्म विभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे तर, डॉ. विजय भटकर, हरीश साळवे यांच्यासह २० जणांना पद्म भूषण आणि एकूण ७५ जणांना पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
लालकृष्ण अडवाणी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच जुन्या काळातील प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य, प्रा. एम. रामास्वामी, के. के. वेणूगोपाल आणि करीम अल हुसैनी आगा खान यांनाही या दुसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अडवाणी यांनी राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी, तर अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट सृष्टीची दीर्घकाळ सेवा केल्याबद्दल हा सन्मान दिला जात आहे.
पद्म भूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांमध्ये जे. बरुआ, डॉ. विजय भटकर, राजकीय विश्‍लेषक स्वपन दासगुप्ता, स्वामी सत्यमित्रानंद गिरी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, पंडित गोकुलोत्सवजी महाराज, सुधा रघुनाथन, हरीश साळवे, डॉ. अशोक सेठ, रजत शर्मा, शिवकुमार स्वामी, बिल गेट्‌स, त्यांची पत्नी मलिंदा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
तर, पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. मंजुला अनागणी, एस. अरुण, कन्याकुमार अवसरला, संजय लीला भन्साळी, साहित्यिक ग्यान चतुर्वेदी, प्रा. योगेश कुमार चावला, रवींद्र जैन, प्रसून जोशी, तारक मेहता, डॉ. प्रल्हाद यांचा प्रामुख्याने समावेश आहे

Short URL: https://vrittabharati.in/?p=20051

Posted by on Jan 26 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2180 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - टू-जी सेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा आणि झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीच्या काळात आमदारांच्या खरेदी-विक्रीचा तपास करणार्‍या ...

×