Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

=पाकमध्ये मात्र दूतावासातच केला योग=
times-square-yoga_dayनवी दिल्ली, [२१ जून] – पहिलाच आंतरराष्ट्रीय योगदिन आज जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, चीन, हॉंगकॉंग, सिंगापूर, थायलंड, नेपाळ, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, फिलिपाईन्स यासह अनेक देशांची सकाळ योगानेच सुरू झाली होती. तथापि, पाकिस्तान सरकारने योगावर बंदी घातल्यानंतर इस्लामाबादेतील दूतावासांमध्येच इतर देशांचे अधिकारी आणि अन्य कर्मचार्‍यांनी योग केला.
ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये आयोजित योग सोहळ्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मेलबर्न शहरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान टोनी अबॉट यांनी या शहरातील सोहळ्याचे नेतृत्व केले. सिडनी शहरातही हजारो नागरिक सहभागी झाले.
ब्रिटनमध्ये लंडनसह अनेक शहरांमध्ये योग आयोजित करण्यात आला. येथेही हजारो नागरिकांचा सहभाग होता. जास्तीत जास्त नागरिकांना योगात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वत: पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केले. हॉंगकॉंग येथे मुसळधार पाऊस सुरू असतानाही लोकांमध्ये योगाबाबत प्रचंड उत्साह होता. भर पावसातही लोक योगसोहळ्यात सहभागी झाले होते. सिंगापूरमध्ये चार हजारांवर लोक यात सहभागी होते. तर, थायलंडमध्ये बँकॉक विद्यापीठाच्या प्रांगणात हजारो लोकांनी योग केला. यात मोठ्या प्रमाणात भारतीयांचाही समावेश होता. येथील भारतीय दूतावासातर्फे आयोजित योगदिन कार्यक्रमात ७५०० लोक सहभागी झाले होते.
नेपाळमध्ये मोठ्या उत्साहाने योगदिन साजरा करण्यात आला. मुसळधार पाऊस असतानाही हजारो लोक या सोहळ्यात सहभागी झाले होते. काठमांडूतील कार्यक्रम मुख्य आकर्षक ठरला. याशिवाय, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया यासारख्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात पार पडला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23065

Posted by on Jun 22 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1613 of 2477 articles)


=बान की मून यांची प्रतिक्रिया= संयुक्त राष्ट्रसंघ, [२१ जून] - पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनाने संपूर्ण जगात आगळाच जोश निर्माण केला आहे. ...

×