Home » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » अभाविपच्या ‘चलो संसद’ मार्चमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी

अभाविपच्या ‘चलो संसद’ मार्चमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी

JNU_students_attending_a_protest_rally_inside_the_campus_and_ABVP-3नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रद्रोहाच्या घटनेच्या विरोधात आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रामलीला मैदानापासून जंतरमंतरपर्यत भव्य मोर्चा काढण्यात आला. ‘चलो संसद’ या नावाने काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येत राष्ट्रप्रेमी विद्यार्थी सहभागी झाले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ आणि इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या अनेक महाविद्यालयातील छात्रसंघाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. ‘जो अफजल के यार है, देश के गद्दार है’, ‘वीर शहिदोंका अपमान नही सहेंगा हिंदुस्तान’, अशा घोषणा देत आणि हातात तिरंगा घेत या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. जंतरमंतरवर या मोर्चाला विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर आणि अन्य विद्यार्थी नेत्यांनी संबोधित केले.
देशातील प्रतिष्ठेच्या एका विद्यापीठातील विद्यार्थी देशद्रोहाच्या घोषणा देतात आणि विविध राजकीय पक्षांचे नेते देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे समर्थन करतात, ही दुर्देवाची बाब आहे, असे सुनील आंबेकर यांनी म्हटले. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांचा अपमान करीत काही खासदार संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍यांची बाजू घेतात, ही आमच्यासाठी अतिशय वेदनेची बाब आहे, आम्ही याचा निषेध करतो, असे आंबेकर म्हणाले.
देशासाठी शहीद झालेल्यांच्या सन्मानासाठी युवा पिढी आज सडकेवर आली असल्याचे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री विनय बिद्रे यांनी सांगितले. देशद्रोहाच्या घोषणांचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशा घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करीत बिद्रे म्हणाले की, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात अशा घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26867

Posted by on Feb 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (821 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - संसदेवर हल्ला करणार्‍यांसोबत राहायचे की संसद वाचवणार्‍यांसोबत हे कॉंग्रेसला ठरवायचे आहे, म्हणजे देशद्रोह्यांसोबत राहायचे की ...

×