Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » अमिताभ, कंगनाला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

अमिताभ, कंगनाला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार

  • ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
  • बाहुबली, दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट चित्रपट

amitabh-kanganaनवी दिल्ली, [२८ मार्च] – ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून ‘बाहुबली’ ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार ‘दम लगा के हईशा’ला मिळाला. ‘पीकू’ चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला असून कंगना राणावतने सलग दुसर्‍या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
अमिताभ बच्चन यांना मिळालेला हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. याआधी १९९० मध्ये ‘अग्निपथ’, २००५ मध्ये ‘ब्लॅक’ तर २००९ मध्ये ‘पा’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘तनु वेड्‌स मनू रिटर्न्स’मधील भूमिकेसाठी कंगना राणावतला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गतवर्षी ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्याआधी ‘फॅशन’मधील भूमिकेसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली’ ला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बाहुबलीला सुवर्णकमळ आणि अडीच लाखाचा पुरस्कार मिळणार आहे. मागील वर्षी बाहुबलीने विक्रमी कमाई केली होती. बाहुबलीचा मुकाबला ‘मसान’ चित्रपटाशी होता. ‘मसान’चे दिग्दर्शक नीरज घायवन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. शरद कटारिया यांच्या ‘दम लगा के हईशा’ला सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सलमान खान यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘बजरंगी भाईजान’ला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘दुरान्तो’ला मिळाला. सर्वोत्कृष्ट बाल अभिनेत्याचा पुरस्कार ‘बेन’ चित्रपटासाठी गौरवच मेननला मिळाला.
‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
बाजीराव मस्तानीला आणखी तीन पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार तन्वी आझमीला मिळाला. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार रेमो डिसुझा आणि उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार सुदीप चटर्जी यांना मिळाला.
उत्कृष्ट मूळ पटकथा आणि संवादाचा पुरस्कार जुही चतुर्वेदी (पीकू) आणि हिमांशू शर्मा (तनु वेडस मनु रिटर्न्स) यांना जाहीर झाला. सर्वश्रेष्ठ अनुवादित पटकथेचा पुरस्कार तलवारसाठी विशाल भारद्वाज यांना मिळाला.
‘रिंगणा’चाही सन्मान
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्‍वगायकाचा पुरस्कार ‘कट्यार काळजात घुसली’ पुरस्कारासाठी महेश काळे यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्‍वगायिका म्हणून ‘दम लगा के हईशा’साठी मोनाली ठाकूरला मिळाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ला मिळाला. अमोल देशमुख दिग्दर्शित आणि निर्मित ‘औषध’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रमेश सिप्पी यांनी पुरस्कार विजेत्यांची यादी आज माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांना सादर केली. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आणि मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा उपस्थित होते. नंतर राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. तीन वेगवेगळ्या समित्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. फीचर फिल्मसाठीची समिती रमेश सिप्पी यांच्या नेतृत्वात होती. यात दहा सदस्य होते. नॉनफीचर फिल्मसाठीची समिती विनोद गणात्रा यांच्या नेतृत्वात होती. यात सात सदस्य होते. लेखन पुरस्कारांची निवड श्रीमती अद्वैैत कला यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने केली.
‘‘वाढदिवसाची मला मिळालेली ही सर्वोत्कृष्ट भेट आहे. मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासोबतच उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अमिताभ बच्चन यांनाही जाहीर झाल्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजत आहे.’’
– कंगना राणावत

Short URL: https://vrittabharati.in/?p=27630

Posted by on Mar 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (553 of 2477 articles)


पणजी, [२८ मार्च] - ज्यांना समुद्राची ताकद माहिती आहे, असेच देश महासत्ता बनतात आणि भारतालाही महासत्ता बनायचे आहे, असे प्रतिपादन ...

×