Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अमेरिकेचा मोठा सहयोगी होणार भारत

अमेरिकेचा मोठा सहयोगी होणार भारत

=पॉल रेयान यांनी केली मोदींची स्तुती=
Prime Minister Narendra Modi meets with U.S. House Speaker Paul Ryanवॉशिंग्टन, [११ जून] – भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा सहयोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून आता दोन्ही देशात तयार झालेले हे दृढ नाते जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अमेरिकी संसदेचे सभापती पॉल रेयान यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधल्यानंतर दुसर्‍या दिवशी, गुरुवारी त्यांनी परराष्ट्र संबंधांबाबत एका परिषदेत या भावना व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेचे प्रस्थापित संबंध, विशेषत: प्रशांत आणि हिंदी महासागराबाबत अधिक सहकार्याचे नाते निर्माण होईल. तसेच विश्‍वकल्याणासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एकमेकांचे सहकार्य करू, चीन वादग्रस्त भागांतील बेटांवर रनवे बनवण्यास सज्ज झाला आहे, हे जगाला माहिती आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत आणि अमेरिकेने आता आपले बंध अधिक दृढ केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
तसेच ओबामांच्या विदेश धोरणावरही टीका करत त्यांनी, आपण आपल्या सहयोगी देशांकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28551

Posted by on Jun 12 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (255 of 2483 articles)


=ईडीची धडक कारवाई= मुंबई, [११ जून] - आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्याच्या दिशेने धडक कारवाई करताना ...

×