अमेरिकेत पुन्हा नमो नमो

=पंतप्रधानांचे न्यूयॉर्कमध्ये भव्य स्वागत=
A warm welcome Narendra Modi in New York.न्यूयॉर्क, [२४ सप्टेंबर] – आयर्लंडचा छोटेखानी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यासाठी न्यूयॉर्क येथे दाखल झाले. गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी अमेरिकेत मोदींची जादू कायम असल्याचे दिसून आले आणि असंख्य भारतीयांनी मोदींचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील दोन दिवस न्यूयॉर्क शहरात भरगच्च कार्यक्रम असून, त्यानंतर २६ आणि २७ सप्टेंबरला पंतप्रधान कॅलिफोर्नियाचा दौरा करणार आहेत. भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण के. सिंग, युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी, कौन्सूल जनरल ज्ञानेश्‍वर मुळे आणि त्यांच्या पत्नीसह काही भारतीयांनी न्यूयॉर्क विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. अमेरिका दौर्‍यातील पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदींचे न्यूयॉर्कमध्ये आगमन झालेे. आता त्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत, असे परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी मोदींचे विशेष विमान न्यूयॉर्क विमानतळावर उतरताच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत होणार्‍या द्विपक्षीय चर्चेसाठी पंतप्रधान मोदी २८ सप्टेंबरला न्यूयॉर्कला परततील. याशिवाय संयुक्त राष्ट्र संघात होणार्‍या एका उच्चस्तरीय शांतता परिषदेलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान शुक्रवारी युनोचे सरचिटणीस बान की मून यांनी स्थायी विकासाबाबत आयोजित केलेल्या परिषदेत जागतिक नेत्यांना संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीच्या भागात रवाना होण्यापूर्वी २६ सप्टेंबरला भारताने जी-४ परिषद आयोजित केली आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या आपल्या दौर्‍यात पंतप्रधान मोदी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, ऍपलचे सीईओ टीम कुक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना भेटणार आहेत. याशिवाय सॅन जोस येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास मोदी उपस्थित राहतील. २८ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24030

Posted by on Sep 25 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1426 of 2483 articles)


न्यूयॉर्क, [२४ सप्टेंबर] - भारताचे पंतप्रधान म्हणून दुसर्‍या अमेरिका दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भरगच्च कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ...

×