Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अमेरिकेत मोदींचे ‘स्टार’सारखेच स्वागत

अमेरिकेत मोदींचे ‘स्टार’सारखेच स्वागत

=पाकी मीडियालाही पटली सत्यता=
narendra modi in irelandइस्लामाबाद, [२८ सप्टेंबर] – अतिशय लोकप्रिय स्टार जेव्हा एखाद्या देशात जातो, तेव्हा त्याचे ज्याप्रमाणे भव्य स्वागत होते, तसेच स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत होत आहे. मोदी हे अद्वितीय राजकारणी आहेत, ज्यांच्यात विरोधकांवरही प्रभाव पाडण्याची क्षमता आहे, अशा शब्दात पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मोदी यांचे गुणगान केले आहे.
‘द नेशन’ या आघाडीच्या वृत्तपत्राने आज सोमवारच्या अग्रलेखात नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. नरेंद्र मोदी अमेरिकेत ज्या-ज्या सभा आणि कार्यक्रमांमध्ये जात आहेत, तिथे त्यांचे एखाद्या जागतिक स्तरावरील लोकप्रिय अभिनेत्यासारखे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात. पण, बिचारे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे फक्त संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करून आपल्या मायदेशी परत जातात.
अनेक देशांचे नेते विविध देशांचा दौरा करीत असतात. आपल्या देशातील नेता आल्यानंतर विदेशी भूमीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आनंद होत असतो. पण, मोदी यांच्या आगमनाने अमेरिकेतील भारतीयांमध्ये जो उत्साह पाहायला मिळत आहे. तो शरीफांच्या भेटीने तेथील मुस्लिमांमध्ये पाहायला मिळत नाही. नवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली असता, मोदी हेच लोकप्रिय नेते ठरले असले, तरी आम्ही मात्र शरीफांनाच पाठिंबा देऊ, अशी सारवासारवही या वृत्तपत्राने केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24095

Posted by on Sep 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1407 of 2483 articles)


=७० वर्षांनंतरही युनो अपयशी: पंतप्रधान मोदी यांची रोखठोक भूमिका= सॅन जोस, [२८ सप्टेंबर] - संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण ...

×