Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड

=भिंतीवर लिहिले ‘गेट आऊट’=
get-out_us templeवॉशिंग्टन, [१७ फेब्रुवारी] – भारतासह जगभरातील भारतीय नागरिक महाशिवरात्रीचे पावन पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरे करीत असतानाच, अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांतात काही समाजकंटकांनी हिंदू मंदिरात तोडफोड केली. इतकेच नव्हे, तर मंदिराच्या भिंतीवर स्वस्तिक काढून त्याखाली ‘गेट आऊट’ असे लिहिले. या घटनेमुळे येथील भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत, स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. येथील सिऍटल मेट्रोपोलिटन भागातील मंदिरावर शनिवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. या मंदिराच्या भिंतीवर ‘गेट आऊट’ असा संदेशही लिहिण्यात आला होता. हे मंदिर अमेरिकेतील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.
अमरिकेत अशा प्रकारच्या घटना घडायलाच नको. आम्हाला देश सोडून जायला सांगणारे तुम्ही कोण आहात? हा स्थलांतरितांचा देश आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया वॉशिंग्टनमधील हिंदू मंदिर व सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष नित्या निरंजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेची पर्वा न करता हिंदूंनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आज मंगळवारी या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला. काही वर्षांपूर्वीही या मंदिराच्या भिंतीवर आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती.
२० वर्षांपूर्वी या भागातील हिंदूंनी एकत्र येऊन या मंदिराचे बांधकाम केले होते. अलीकडेच या मंदिराच्या प्रांगणात नवे बांधकाम सुरू झाले आहे. हिंदू-अमेरिकन फाऊंडेशनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारच्या निंदनीय घटना घडणे, योग्य नाही, असे मत संघटनेचे पदाधिकारी जय कंसारा यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20650

Posted by on Feb 18 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. Both comments and pings are currently closed.

Comments are closed

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (2065 of 2483 articles)


=पाच संशयितांना अटक= कोल्हापूर, [१७ फेब्रुवारी] - भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती आता स्थिर असल्याची ...

×