Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » ‘अरिहंत’ची होणार क्षेपणास्त्र चाचणी

‘अरिहंत’ची होणार क्षेपणास्त्र चाचणी

INS Arihant India's Indigeous Nuclear Powered Submarineनवी दिल्ली, [११ ऑक्टोबर] – संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेल्या आणि समुद्रातील सर्वच चाचण्या यशस्वीपणे पार पाडणार्‍या ‘अरिहंत’ या अण्वस्त्रवाहू पाणबुडीला आता आणखी एका चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याच महिन्यात ‘अरिहंत’ची पहिली क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचा पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात आढावा घेण्यात येणार आहे. त्यावेळी ही पाणबुडी नौदलाच्या सुपूर्द करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्धार आहे.
‘अरिहंत’च्या आजवरच्या सर्वच चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. क्षेपणास्त्राचा मारा करण्याची पाणबुडीची क्षमता आम्ही आता तपासून पाहणार आहोत. याच महिन्यात आम्ही निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहोत. त्यानंतर आणखीही काही क्षेपणास्त्रांची या पाणबुडीवरून चाचणी घेण्यात येणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
निर्भय हे सबसोनिक कू्रझ क्षेपणास्त्र असून, एक हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता आहे. त्यानंतर चाचणी होणारे क्षेपणास्त्र स्वदेशी असून, त्याची मारकक्षमता ७०० किलोमीटरची राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25099

Posted by on Oct 11 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1349 of 2477 articles)


मुंबई, [११ ऑक्टोबर] - सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या वयाला रविवारी ७३ वर्ष पूर्ण झाली असून, त्यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण ...

×