Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अरुण शौरी, यशवंत सिन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

अरुण शौरी, यशवंत सिन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

=ब्रिक्स बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून एकाचा विचार=
Arun Shourie, Member of Rajya Sabha with  Yashwant Sinha, former Union Cabinet Minister of finance addressing a BJP Meeting in New Delhi, Indiaनवी दिल्ली, [११ मार्च] – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ब्रिक्स संघटनेची स्वत:ची ब्रिक्स बँक स्थापन करण्यात येणार असून, या बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्री अरुण शौरी व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यापैकी एकाचा विचार केंद्र सरकार करीत असल्याची माहिती आहे.
ब्रिक्स बँकेसंदर्भात झालेल्या सहमतीनुसार या नवीन बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे राहणार असून भारताला बँकेचा प्रथम अध्यक्ष नियुक्त करण्याचा बहुमान मिळाला आहे. या पदासाठी अनेकांच्या नावाचा विचार करण्यात आला. मात्र, प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाबरोबरच आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीचे ज्ञान आणि बहुस्तरीय संस्थांचे कार्य याचा विचार करून वरील दोघांच्या नावाच्या विचार करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्राने दिली.
शौरी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून त्यांनी जागतिक बँकेत कार्य केले आहे, तर सिन्हा हे माजी सनदी अधिकारी असून त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून प्रभावी भूमिका बजावली होती. प्रशासकीय कौशल्य असलेल्या राजकीय नेताच अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय बँकेची जबाबदारी सांभाळू शकतो, असे सरकारचे मत आहे व त्यादृष्टीनेच सरकार विचार करीत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21284

Posted by on Mar 12 2015. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1940 of 2477 articles)


=विशेष न्यायालयाने बजावला समन्स, बिर्ला, पारख यांच्यासह अन्य तिघांचाही समावेश= नवी दिल्ली, [११ मार्च] - लाखो कोटी रुपयांच्या कोळसा खाणवाटप ...

×