Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अर्ध्यापेक्षा जास्त वचने पूर्ण केली

अर्ध्यापेक्षा जास्त वचने पूर्ण केली

  • माझे सरकार भ्रष्टाचारमुक्त
  • राजकारण्यांच्या मुली, जावयाने केली हजारो कोटींची कमाई
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंगे्रसवर अप्रत्यक्ष हल्ला

modi in usसॅन जोस, [२८ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पूर्वीचे संपुआ सरकार आणि विशेषत: कॉंगे्रसवर घणाघाती हल्ला चढविला. १७ महिन्यांच्या सत्ताकाळात माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. देशवासीयांना दिलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त वचनांची पूर्तता केली आहे. तिथेच, पूर्वीच्या सरकारच्या काळात राजकारण्यांचा मुलगा, मुलगी, जावयाने हजारो कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, असा स्पष्ट आरोप पंतप्रधानांनी केला.
‘कुणी म्हणतात, अमूक राजकारण्याच्या मुलाने ५० कोटी जमा केले, कुणाच्या मुलाने २५० कोटी, कुणाच्या मुलीने ५०० कोटी आणि कुणाच्या जावयाने एक हजार कोटी रुपयांची माया जमा केली. कुणाच्या चुलत भावाला मोठे कंत्राट मिळाले, तर कुणाला भूखंड मिळाला. असा आरोप गेल्या वर्षीपर्यंत सातत्याने केला जायचा,’ असे नरेंद्र मोदी यांनी कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथे ‘सॅप सेंटर’ येथे आयोजित भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित करताना सांगितले.
मागील सरकारच्या काळात ‘दामाद’ने तर दोन्ही हातांनी हजारो कोटी रुपये जमविले, असे सांगताना मोदी क्षणभर थांबले आणि लगेच म्हणाले की, गेल्या वर्षी मे महिन्यात देशात सत्तांतर झाले आणि माझ्या नेतृत्वात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर आले. या सरकारने पाहतापाहता १७ महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप सरकारवर नाही. अर्ध्यापेक्षा जास्त वचनांची पूर्तता मात्र केली. माझे आयुष्य या देशासाठीच आहे आणि मरण आले तरी याच देशासाठी… माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी देशाला समर्पित केला आहे, असे मोदी यांनी सांगताच उपस्थित सुमारे १८ हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
संपुआ सरकारच्या काळात उघडकीस आलेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांमुळे तुम्ही त्रासले नव्हते का, या घोटाळ्यांचा तुम्हाला संताप येत नव्हता का, माझ्या देशवासीयांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे… मला प्रामाणिकपणे सांगा, माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकतरी आरोप आहे का, माझ्यावर व्यक्तिगत कुठला आरोप आहे का, माझ्या सरकारने निवडणूकपूर्व दिलेल्या वचनांची पूर्तता केली नाही का, असा सवाल मोदी यांनी केला असता, सभागृहात उपस्थित हजारो भारतीयांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देऊन त्यांच्या सुशासनावर जणू शिक्कामोर्तबच केले.
जणू मॅडिसन स्क्वेअरच…
एक वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले होते. तिथे मोदी यांच्या आगमनासाठी भारतीय आतुर झाले होते. मोदी यांचे आगमन होताच जबरदस्त जल्लोष झाला होता. विशेष म्हणजे, तो महिनाही सप्टेंबरच होता आणि तारीखही २७ सप्टेंबरच होती. यावर्षी पुन्हा एकदा सप्टेंबर महिना आणि तारीखही २७ सप्टेंबरच… १८ हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह…केवळ जागा बदलली. मॅडिसन स्क्वेअरच्या ऐवजी सॅन जोस येथील ‘सॅप’ सेंटर… पण, येथेही जणू मॅडिसन स्क्वेअरचीच अनुभूती आली.
गूड मॉर्निंग कॅलिफोर्निया
पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच उत्साहित अनिवासी भारतीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनीही ‘गूड मॉर्निंग कॅलिफोर्निया’ असे म्हणून त्यांचे स्वागत स्वीकारले. आज भगत सिंग यांचा जन्मदिवस आहे याची आठवण त्यांनी अनिवासी भारतीयांना करून दिली आणि ‘भगत सिंग अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24118

Posted by on Sep 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1402 of 2483 articles)


मुंबई, [२८ सप्टेंबर] - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार हेमंत भोसले यांचे स्कॉटलंडमध्ये कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन ...

×