Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » अशी दिसते रोज धगधगणारी नियंत्रण रेषा

अशी दिसते रोज धगधगणारी नियंत्रण रेषा

=नासाने काढले भारत-पाक सीमेचे छायाचित्र=
india-pakistan-border-nasa-pictureवॉशिंग्टन, [६ ऑक्टोबर] – भारत आणि पाकिस्तानला विभागणारी सीमा म्हणजेच नियंत्रण रेषा. गेल्या अनेक वर्षांपासून ही रेषा दोन्ही देशांमधील सैनिकांच्या गोळीबारामुळे तसेच तोफांच्या जबरदस्त मार्‍यामुळे सातत्याने धगधगत असते. पण, प्रत्यक्षात ही सीमा कशी दिसते, याबाबतची कल्पना क्वचितच कुणाला असावी. मात्र, अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने या सीमेचे मनोहारी छायाचित्र काढले आणि आपल्या फेसबुक पेजवरही टाकले आहे.
नासाच्या एका अंतराळवीराने गेल्या २३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या काळोखात नियंत्रण रेषेचे हे छायाचित्र काढले आहे. भारत-पाकला विभाजणारी ही रेषा अर्थात सीमा रात्रीच्या काळोखात अतिशय स्पष्ट, स्वच्छ आणि तितकीच मनमोहक दिसते.
पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या पात्राकडून उत्तर दिशेकडे पाहात असताना या अंतराळवीराने नियंत्रण रेषेचे हे छायाचित्र टिपले आहे. रविवारी हे छायाचित्र फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले. पाकव्याप्त काश्मिरातून अतिरेक्यांची होणारी घुसखोरी आणि पाकी सैनिकांच्या वाढत्या कुरापती यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून ही सीमा पथदिव्यांनी प्रकाशमान करण्यात आली आहे. केशरी रंगाच्या प्रकाशामुळे अंतराळातूनही ही सीमारेषा अगदी स्पष्ट दिसते. हे छायाचित्र फेसबुकवर टाकण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25015

Posted by on Oct 7 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1375 of 2483 articles)


=पंतप्रधानांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] - देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असलेले वस्तू ...

×