आधार नोंदणी न केल्यास बँकांना दंड
Friday, September 8th, 2017=खात्याशी जोडणी गरजेची,
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –
देशातील बँकांनी ३० सप्टेंबरपर्यंत १० टक्केशाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, अन्यथा १ ऑक्टोबरपासून २० हजार रुपये प्रतिशाखा दंड आकारण्यात येईल, असा आदेश युआयडीएआयने दिला आहे.
सूत्रानुसार, केंद्र सरकारकडून सर्व आवश्यक गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. यात बँक खात्याला आधार कार्ड जोडण्याचाही समावेश आहे. मात्र, अद्यापही देशातील सवर्र् ग्राहकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही. त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) बँकांना याबाबत सर्व आवश्यक ते उपाय करण्याचा आदेश दिला आहे.
मागील ऑगस्टमध्येच बँकांना आपल्या १० टक्केशाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. काही बँकांनी सदर प्रक्रियांसाठी वेळ मागितल्याने ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आल्याचे युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी सांगितले.
बँकांना प्रत्येक १०० शाखांपैकी १० शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अन्यथा दंड वसूल करण्यात येईल, असेही भूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
Short URL: https://vrittabharati.in/?p=34907

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!