Home » छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » आधी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळला, नंतर केले अभिनंदन

आधी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळला, नंतर केले अभिनंदन

=श्रीपाल सबनीस यांची अशीही असहिष्णुता=

Pune: Lyricist Gulzar lights the lamps as Maharashtra CM Devendra Fadnavis and NCP chief Sharad Pawar look on during the inauguration of 89th All India Marathi Sahitya Sammelan in Pimpari near Pune, Maharashtra on Saturday. PTI Photo (PTI1_16_2016_000113B)मंगेश पाडगावकर सभागृह (पिंपरी), [१५ जानेवारी] – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी शब्दाचा उल्लेख करीत वाद उकरून काढल्यानंतर ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितली आणि वादावर पडदा पडला. भाजपाचे नेते साहित्य संमेलनाच्या मंचावर येतील, हे ठरले होते. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी संमेलनाला उपस्थिती दर्शवली. शिवाय या विषयावर अतिशय संयमाने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. परंतु, तरीही नेमके देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट या दोघांच्याच नावाचा उल्लेख संमेलनाध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात टाळला. ही बाब उपस्थित सर्वांनाच खटकली. शेवटी कुणीतरी त्यांना आठवण करून दिल्यानंतर सबनीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरवोल्लेख करीत, त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.
वाद झालाच, तर तो साहित्यावर व्हावा, असे संयमी मत व्यक्त केल्यानंतरही कुठेतरी पूर्वग्रहदूषित मत ठेवत, संमेलनाचे मुख्य अतिथी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीला नामोल्लेख टाळणे, ही डॉ. श्रीपाल सबनीस यांची तर्‍हा उपस्थितांना खटकली. सर्वांच्या लक्षात आल्यानंतरही सबनीस भाषणास पुढे सरसावले होते. पण तेवढ्यात कुणीतरी त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली.
ही बाब तेवढी सोडली, तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उशिरा सुरू झालेले आणि बरेच लांबलेले उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. शनिवारी सकाळी नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि जवळपास लाखभर साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या संमेलनाला उद्घाटक म्हणून देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पाहुणे डॉ. डी. वाय. पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार गुलजार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाग्यश्री पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, सीताकांत महापात्रा प्रभृती उपस्थित होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, संतांच्या जातीनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. माणसांत पशुत्व आहे. ते दूर करण्याची भूमिका संत महात्मे घेत असतात. अशा संतांनाच माणसांपासून दूर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्याची जात संपली, तोच विद्वान मानावा. फडणवीस व सबनीस हे दोन घराणे शिवाजी महाराजांचे निष्ठावंत होते. त्यातील एक आज सत्याचा आणि दुसरा सत्तेचा प्रतिनिधी असला, तरी दोघांच्याही भूमिकेत वाद होण्याचे काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले. संमेलनाचे व्यासपीठ हे सेक्युलर व्यासपीठ आहे. ते कुठल्याही जातिधर्माचे नाही. या व्यासपीठावर शेतकर्‍यांची मुले आहेत. शेतकर्‍यांच्या व सार्‍याच वर्गाच्या परंपरा येथे एकत्र येतात. कुठल्याही परंपरा वेगळ्या नाहीत. सर्वांचा मिलाप या व्यासपीठावर होतो, असे मत सबनीसांनी व्यक्त केले.
शेवटी सबनीस पत्रकारांवरही कोरडे ओढते झाले. लोकशाहीचा चौथा खांब शिल्लक आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीचा खांब हा तिरडीची दांडी आहे का, याचा विचार करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. आपले १२७ पानांचे अध्यक्षीय भाषण बाहेर मिळेल, ते एका पुस्तकाच्या स्वरूपात असून विकत घ्यावे, असे आवाहन करीत सबनीस यांनी भाषण संपवले.
माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांच्या भाषणात, ‘नाम’ या संस्थेमार्फत शेतकर्‍यांना १ कोटीची मदत देण्याची घोषणा केली. गिरीश बापट, डी. वाय. पाटील आणि शकुंतला धराडे यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. स्मरण ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. संचालन कलावंत सुबोध भावे आणि सोनाली कुळकर्णी यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26548

Posted by on Jan 17 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (901 of 2476 articles)


‘स्टार्ट अप इंडिया’चा शुभारंभ १० हजार कोटींच्या निधीची घोषणा अटल इनोव्हेशन मिशन गठित नवी दिल्ली, [१६ जानेवारी] - पंतप्रधान ...

×