Home » छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » आर.के. लक्ष्मण यांना शासकीय इतमामात निरोप

आर.के. लक्ष्मण यांना शासकीय इतमामात निरोप

=मिस्किल कुंचला शांत झाला=
Devendra-Fadnavis Paid floral tributes to R.K Laxman at SMIMS, Puneपुणे, [२७ जानेवारी] – स्वातंत्र्योत्तर भारताला पन्नास वर्षापेक्षाही अधिक काळ आपल्या व्यंग्यचित्राने अधिक सुंदर बनविण्यासाठी झटणारे आणि वृत्तपत्रांमधील व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून देशवासीयांच्या हृदयावर राज्य करणारे प्रतिभावंत व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. आज मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘कॉमन मॅन’ अशीच ओळख असलेले आर. के. लक्ष्मण यांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या जीवनातील व्यंग्य दाखवून अधिक सुंदर बनविण्यावरच भर दिला, असेच त्यांच्या बाबतीत म्हटले जाते. ‘कॉमन मॅन’ ही त्यांची अजरामर कलाकृती! पण भारताचा ‘कॉमन मॅन’ प्रातिनिधिक सामान्य माणूस कसा असावा, यासाठी अनेक वर्षे देशभर पायपीट करून आकृती निश्‍चित केलेला हा प्रतिभावंत पत्रकार म्हणजे भारताचे लेणे होते. गेली पंधरा वर्षे ते पुण्यात सेवानिवृत्त आयुष्य जगत होते. गेल्या काही वर्षांपासून लघवीच्या त्रासामुळे ते आजारी होते. अलीकडील काळात त्यांचे बहुतांश अवयव निकामी झाले होते. गेल्या १७ जानेवारी रोजी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिस्कील कुंचला शांत झाला असला, तरी त्यांच्या कुंचल्याने साकारलेला ‘कॉमन मॅन’ मात्र सदैव सर्वसामान्याच्या हृदयात कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरावरून उमटत आहे.
१९५० पासून सुरू केलेली व्यंग्यचित्राची कला गेल्या काही वर्षांपर्यंत निरंतर सुरूच होती. गेल्या काही दिवसांपर्यंत त्यांनी प्रत्येक पिढीसोबत स्वत:ला व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून जोडून ठेवले होते. मात्र प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांचा कुंचला काही दिवसांपासून चालला नाही आणि आता तो अखेरचा थांबला.
वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर सर्वच स्तरांवरील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांचे पुत्र श्रीनिवास यांनी आपल्या पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक नेते व मान्यवर उपस्थित होते. जावडेकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखविला. अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव सिम्बॉयसिस संस्थेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
‘‘लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जगाच्या अंतापर्यंत जिवंत राहील. हाच कॉमन मॅन राजकीय व्यवस्थेला वेसण घालणार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणार नाही आणि ती कुणीच भरूही शकत नाही.’’
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Short URL: https://vrittabharati.in/?p=20116

Posted by on Jan 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2165 of 2476 articles)


=राजपथवर घडले देशाच्या वैविधतेचे दर्शन= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - भारताचे लष्करी सामर्थ्य आणि वैविध्यतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन अमेरिकेचे ...

×