आसामात उमललं भाजपाचं कमळ!
Thursday, May 19th, 2016- कॉंग्रेस,डाव्यांना केरळ आणि बंगालमध्ये नारळ
- बंगालमध्ये दीदींवरच ‘ममता’
- तामिळनाडूत अम्मांचाच करिश्मा
- पुद्दुचेरीत कॉंग्रेस काठावर
नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत विजय मिळवला. भाजपाने कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचताना येथे प्रथमच कमळ फुलवून नवा इतिहास घडविला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली, तर केरळात डाव्या आघाडीने कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीला मागे टाकत सत्ता सिंहासनापर्यंत मजल मारली. इतर चारही ठिकाणी सपाटून मार खावा लागलेल्या कॉंग्रेसला पुद्दुचेरीत द्रमुकच्या सहकार्याने निसटते बहुमत मिळाले आहे.
प्रमुख विजयी उमेदवार
सर्वानंद सोनोवाल, ममता बॅनर्जी, ओमन चंडी, जयललिता, व्ही. एस. अच्युतानंदन, ओ. राजगोपाल, लक्ष्मीरतन शुक्ला.
प्रमुख पराभूत
श्रीशांत, रूपा गांगुली, बायच्युंग भूतिया, पवनसिंह घाटोवार, बदरुद्दिन अजमल.
आसाम
एकूण जागा – १२६ (बहुमत ६४)
भाजपा आघाडी – ८७
कॉंग्रेस आघाडी- २४
एआययूडीएफ- १३
इतर- ०२
पश्चिम बंगाल
एकूण जागा -२९४ (बहुमत १४८)
तृणमूल- २११
डावी आघाडी- ७६
भाजपा – ०६
इतर- ०१
तामिळनाडू
एकूण जागा- २३४ (बहुमत ११८)
अद्रमुक- १३४
द्रमुक आघाडी- ९७
डीएमडीके आघाडी- ००
इतर- ०१
केरळ
एकूण जागा- १४०(बहुमत ७१)
एलडीएफ – ८४
युडीएफ- ४६
भाजपा- ०१
इतर- ०९
पुद्दुचेरी
एकूण जागा- ३० (बहुमत १६)
कॉंग्रेस-द्रमुक- १७
एआयएनआरसी- ०८
अद्रमुक – ०४
इतर- ०१
Short URL: https://vrittabharati.in/?p=28345

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!