Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर » इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी

Modi-time-screengrabनवी दिल्ली, [१७ मार्च] – अमेरिकेच्या ‘टाइम’ या नियतकालिकाने इंटरनेटवरील प्रभावित व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला आहे. टाईम नियतकालिकाने आज गुरूवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे.
‘टाईम’ या नियतकालिकाने इंटरनेटवरील प्रभावित ३० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत नरेंद्र मोदींचा समावेश आहे. मोदींचे टि्‌वटरवर १ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांच्या पेजला ३ कोटी २० लाख लाईक्स आहेत. त्यामुळेच ‘टाईम’कडून नरेंद्र मोदींचा इंटरनेटवरील ३० प्रभावी लोकांच्या यादीत सलग दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला आहे.
या यादीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, रिऍलिटी टिव्हि स्टार किम कारदाशिया व तिचा पती केन वेस्ट, लेखक जे. के. रोलिंग, माजी ऑलिपिंकपटू केटलिन जेनर, फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचाही समावेश आहे.
दरम्यान, या यादीसाठी व्यक्तींची निवड करताना संबंधित व्यक्तीचा जागतिक समाज माध्यमांवरील प्रभावाचा विचार करण्यात आल्याचे ‘टाईम’ तर्फे सांगण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27411

Posted by on Mar 18 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, फिचर (632 of 2484 articles)


मुंबई, [१७ मार्च] - सध्या परदेशात असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांच्याकडे असलेल्या थकित कर्जाची वसुली करण्यासाठी येथील किंगफिशर हाऊसच्या गुरुवारी ...

×