Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » इंडोनेशियात विमानाला अपघात, ४५ ठार

इंडोनेशियात विमानाला अपघात, ४५ ठार

=अनेक इमारतीही जमीनदोस्त=
Indonesian military plane crashजकार्ता, [३० जून] – इंडोनेशिया हवाई दलाच्या विमानाला आज मंगळवारी भीषण अपघात झाला. हवेतच आग लागून विमानाचे तुकडे झाल्याने ४५ जण ठार झाले.
‘सी-१३०’या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटातच विमानाने पेट घेतला आणि स्फोट होऊन त्याचे अनेक तुकडे झाले. मेदान शहरातील एका वसाहतीवर हे तुकडे पडले आहेत. विमानातील सर्वच ४५ जणांचा यात जागीच मृत्यू झाला. तर, जमिनीवरीलही काही नागरिक ठार झाल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती हवाई दल अधिकार्‍याने दिली. मेदान हे सुमात्रा बेटावरील दोन लाख लोकवस्तीचे शहर आहे.
विमान या शहरावर कोसळल्यामुळे अनेक इमारतींना तडे गेले असून, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक कारचीही राखरांगोळी झाली आहे, असे हा अधिकारी म्हणाला. विमानाच्या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदत व बचाव मोहीम हाती घेतली. शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. अपघातग्रस्त विमानाचे तुकडे अनेक भागांमध्ये पडले होते.
आगीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेले विमान आकाशातून खाली पडताना अनेकांनी पाहिले. विमान कुठे पडणार याची कल्पना नसल्याने लोक सैरावैरा धावत होते. काही क्षणातच एका वसाहतीवर ते कोसळले आणि स्फोट व्हावा, असा मोठा आवाज झाला. उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. यामुळेच विमानाला आग लागली आणि अपघात झाला, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. आतापयर्र्त ४५ जणांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून, जमीनदोस्त झालेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली मृतदेह आहेत काय, याचा शोध घेण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23163

Posted by on Jul 1 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1602 of 2483 articles)


=व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देणे शक्य नाही, पीएमओने पाठविले पत्र= नवी दिल्ली, [३० जून] - दिल्लीवरील अधिकाराबाबत नायब राज्यपालांसोबतचा वाद ...

×