Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » इंदू मिल जागेवर डॉ आंबेडकर स्मारक लवकरच

इंदू मिल जागेवर डॉ आंबेडकर स्मारक लवकरच

=मुख्यमंत्र्यांची घोषणा=
Agreement for transfer of land for construction of memorial for Dr. Babasaheb Ambedkarसंत साहित्य नामदेव नगरी (घुमान), [५ एप्रिल] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर लवकरच उभारण्यात येईल, त्यासंबंधीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार व नॅशनल टेक्सटाईल्स कॉर्पोरेशन यांच्यात यासंबंधीचा एक त्रिपक्षीय करार झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी घुमान येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली.
८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून, मुख्यमंत्र्यांचे रविवारी दुपारी घुमान येथे आगमन झाले. समारोप समारंभापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंबंधी पुढे बोलताना ते म्हणाले की, या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. जवळपास १२ एकर जमिनीवर उत्तम डिझाईन असलेले स्मारक उभारले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला येत्या वर्षी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवात हे स्मारक पूर्ण व्हावे असाच आमचा प्रयत्न राहील.
घुमान येथील संमेलनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या सुदूर प्रदेशातून संत शिरोमणी नामदेव पंजाबात आले आणि येथे त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. पंजाब आणि महाराष्ट्र यांचा सांस्कृतिक संबंध साडेसातशे वर्षांचा आहे. ज्याप्रमाणे संत नामदेव पंजाबात आले तसेच गुरुगोविंदसिंग हे महाराष्ट्रात नांदेडपर्यंत आले, असा हा संस्कृतीचा आणि भक्तीचा सेतू आहे. या संमेलनाच्या निमित्ताने पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंधांना उजाळा मिळेल. शेती आणि सैनिकी वृत्ती हे गुण दोन्ही प्रदेशात समान दिसतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21903

Posted by on Apr 6 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1826 of 2476 articles)


=सरकार राबविणार देशव्यापी मोहीम: अरुण जेटली= बंगळुरू, [४ एप्रिल] - संपुआ सरकारच्या काळात तयार झालेले भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांचे हित ...

×