Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » इतिहासकार निनाद बेडेकर यांचे निधन

इतिहासकार निनाद बेडेकर यांचे निधन

ninad-bedekar1पुणे, [१० मे] – गेली ४० वर्षे महाराष्ट्रात भ्रमंती करून शिवचरित्र्याचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्यात एकाग्र राहिलेले इतिहास संशोधक निनाद गंगाधर बेडेकर यांचे आज रविवारी पहाटे अडीच वाजता येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये लिव्हरसोरॅसिस आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिवचरित्राचे लेखन आणि त्यावरील भाषणमाला देण्यासाठी निनाद बेडेकर यांनी देशाच्या प्रत्येक प्रांतासोबतच जगाच्या पाठीवरील विविध देशांचाही प्रवासही केला होता. मोडी, फारसी, अरेबिक लिपी अणि भाषांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अल्प परिचय
तब्बल ४० वर्षे महाराष्ट्रात शिवशाहिरी, गडदुर्गांची भ्रमंती आणि इतिहास संशोधन यात स्वत:ला वाहून घेणारे निनाद बेडेकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी झाला. शर्थीचे शिलेदार (पाच भाग) दुर्गकथा, हसरा इतिहास, दुर्गवैभव, इतिहास दुर्गांचे, महाराष्ट्रातील दुर्ग, थोरला राजा सांगून गेला, खांदेरी, जव्हार, गजकथा, एका नवीन शिवचरित्राची निर्मिती, विजय दुर्गाचे रहस्य, शिवभूषण अशा महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ग्रंथाचे ते लेखक होते. सध्या पुण्यातील शनिवारवाडा येथे ध्वनीप्रकाश कार्यक्रम दाखविण्यात येतो, त्याची संहिता निनाद बेडेकर यांनी लिहिली होती. पेशवाई या मराठीतील मालिकेचीही संहिता त्यांनी लिहिली होती. त्यांनी त्यांचे बरेचसे इतिहास संशोधन पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात केले. राज्य शासनाच्या गडकिल्ले दुरुस्ती व सौंदर्यीकरण समितीचे ते सदस्य होते. १२ वर्षापूर्वी महाराष्ट्रात जेम्स लेन प्रकरण उद्भवले तेव्हा जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी म्हणून शिवसेनेबरोबर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
व्यक्तिगत पातळीवर त्यांनी मेकॅनिकल इंजिअरींगची पदवी प्राप्त केली होती. तसेच त्यांनी किर्लोस्कर कमिन्समध्ये व्यवस्थापन क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या.
शिवकालीन इतिहास संशोधनासाठी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गड आणि ऐतिहासिक स्थळावर वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील ७५ गडांचा गाढा अभ्यास केला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यावर त्यांनी काढलेला ४२ मिनिटांची वृत्तपट विशेष गाजला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22483

Posted by on May 10 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1716 of 2476 articles)


=केंद्रीय मंत्री जेटली यांनी केला सन्मान= मुंबई, [१० मे] - भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना आज रविवारी ...

×