Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ई -मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन

ई -मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन

ray-tomlinson-email founderवॉशिंग्टन, [७ मार्च] – आधुनिक ई-मेलचा शोध लावणारे अमेरिकेतील आयटी तज्ज्ञ ‘रे टॉमलिनसन’ यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
ज्या पद्धतीने या आधुनिक विश्‍वात ई-मेल पाठविला जातो आहे. खरे पाहता ती पद्धती खूप वर्षांआधी विकसीत झाली होती. तेव्हा मात्र ही पद्धत खूपच किचकट होती. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे ई -मेल नेमका कुठल्या पत्त्यावर पाठवायचा हेच कळत नसे. शिवाय ई – मेल पत्तेही फार लांबलचक होते. मात्र टॉमलिनसन यांनी १९७१ मध्ये पहिल्यांदा नीट नेटका आणि ‘@’ या चिन्हाचा वापर करून ई -मेल ऍड्रेस तयार केला.
रे टॉमिलसन यांनी १९७१ मध्ये बोस्टनमधील एका रिचर्स कंपनीत काम करत असताना पहिला ई – मेल पाठवला होता. खरं तर तेव्हा इंटरनेटची सुरूवातही झाली नव्हती. आज मात्र टॉमलिनसन यांनी तयार केलेला ई-मेल ऍड्रेस आज जगभरात वापरला जातो.
पहिला ई -मेल एका संगणकावरून दुसर्‍या संगणकावर पाठविण्यात आला. हे दोन्ही संगणक एकाच ठिकाणी आजूबाजूला ठेवण्यात आले होते. यात मेल कम्पोज करून त्यावर पत्ता लिहून ते दुसर्‍या युजरला पाठविण्याची व्यवस्था होती. दरम्यान, २०१२ मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता. त्यांच्या निधनानं माहिती -तंत्रज्ञान क्षेत्राचा विश्‍वकोषच हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27093

Posted by on Mar 7 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (748 of 2483 articles)


=सी-व्होटरच्या जनमत चाचणीतील निष्कर्ष= नवी दिल्ली, [७ मार्च] - निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. ...

×