Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » उत्तम अध्यक्ष होऊ शकतात हिलरी: ओबामा

उत्तम अध्यक्ष होऊ शकतात हिलरी: ओबामा

hillary_clinton_obamaवॉशिंग्टन, [१२ एप्रिल] – अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिटंन यांच्या पत्नी व माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी पुढील वर्षी होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली दावेदारी घोषित करण्याची तयारी सुरू केली असतानाच, हिलरी देशाच्या उत्तम अध्यक्ष ठरू शकतात, या शब्दात विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे कौतुक केले आहे
२००८ साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हिलरी क्लिटंन यांनी आपला दावा केला होता. परंतु, बराक ओबामांनी त्यांना मागे टाकले होते. २०१६ मध्ये होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार असलेल्या हिलरी क्लिटंन देशाच्या एक उत्तम अध्यक्ष म्हणून आपला ठसा उमटवू शकतात, असे ओबामा यांनी पनामा येथे एका पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. २००८ च्या निवडणुकीतही त्या प्रबळ दावेदार होत्या आणि सार्वत्रिक निवडणुकीत एक चांगल्या समर्थक, असेही ओबामा म्हणाले.
हिलरी क्लिटंन जेव्हा आपल्या उमेदवारीची घोषणा करतील त्यावेळी त्यांच्या मनात देशाला पुढे नेण्याचाच विचार असेल, असे सांगतानाच परराष्ट्र धोरणवर होणार्‍या कोणत्याही चर्चेत त्या आपला पक्ष समर्थपणे मांडू शकतात, असेही ओबामा यावेळी म्हणाले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार हिलरी क्लिटंन यांच्या चमूने ब्रुकलिन येथे कार्यालय सुरू करण्यासाठी अर्ज दिला आहे. बहुतेक हे हिलरी क्लिटंन यांच्या निवडणूक प्रचार अभियानाचे मुख्यालय असेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. हिलरी क्लिटंन यांच्याकडून मात्र याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21971

Posted by on Apr 13 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (1817 of 2483 articles)


हैदराबाद, [१२ एप्रिल] - येत्या काही महिन्यात बिहारमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे माजी ...

×