Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » ऍन्जेला मर्केल आज भारत भेटीवर

ऍन्जेला मर्केल आज भारत भेटीवर

=वरिष्ठ मंत्र्यांचे शिष्टमंडळही येणार=
Angela Merkel Germanyबर्लिन, [३ ऑक्टोबर] – जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मार्केल यांचे उद्या रविवारी भारत भेटीवर आगमन होत आहे. त्यांच्यासोबत वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही येत असून, दोन्ही देशांमधील वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या तिसर्‍या संयुक्त बैठकीत मर्केल व त्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.
सोमवारी नवी दिल्लीत आयोजित या बैठकीची अध्यक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऍन्जेला मर्केल संयुक्तपणे करणार असून, व्यापार आणि सुरक्षा हा त्यांच्या बैठकीतील मुख्य मुद्दा राहणार आहे. मर्केल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात व्हाईस चान्सलर आणि जर्मनीचे अर्थमंत्री सिग्मार गॅब्रियल, परराष्ट्र मंत्री फ्रॅन्क वॉल्टर स्टेनमीअर, अन्न व कृषी मंत्री ख्रिस्तियन स्किमीड, शिक्षण व संशोधन मंत्री जोहाना वॉंक आणि विकास व सहकार्य मंत्री गेर्ड मुल्लेर यांचा समावेश राहणार आहे.
मार्केल यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून, या भेटीत त्या भारतातील काही बड्या उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदी शिष्टाचार बाजूला सारून स्वत: मर्केल यांचे स्वागत करणार आहेत. सोमवारी त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेणार आहेत.
नियोजित गुंतवणुकीसंदर्भात जर्मनीतील उद्योगांना भेडसावत असलेल्या समस्यांचा मुद्दा मर्केल पंतप्रधान मोदी यांच्यापुढे उपस्थित करणार आहेत. याशिवाय, आर्थिक, व्यावसायिक प्रशिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण सुरक्षा आणि विकास यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरही दोन्ही देशांचा भर राहणार आहे. सोबतच, परस्पर हितांचे प्रादेशिक व जागतिक मुद्देही त्यांच्या चर्चेत प्रामुख्याने उपस्थित होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि ऍन्जेला मर्केल यांच्यातील चर्चेनंतर काही महत्त्वाच्या करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24147

Posted by on Oct 4 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1391 of 2483 articles)


=अधिकृत घोषणा आज= मुंबई, [३ ऑक्टोबर] - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व नागपूरचे ...

×