Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » एकमेकांच्या परंपरांचा आदर करा

एकमेकांच्या परंपरांचा आदर करा

=राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांचे आवाहन=
pm narendra modi addressing to youth festivalरायपूर, [१२ जानेवारी] – स्वामी विवेकानंद जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी शांतता, एकता आणि सलोख्याचा मंत्र देतानाच, एकमेकांच्या परंपरा आणि विचारांचा आदर करण्याचा सल्ला दिला. शांतता आणि सलोखा नसेल, तर विकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
विविधतेने नटलेला आपला देश आहे. हीच आपली खरी शक्ती आहे. या शक्तीला सलोख्याची जोड मिळाली, तर ती आणखी वृद्धिंगत होईल, असे पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना सांगितले.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठीच माझे सरकार काम करीत आहे, असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, आपण जर सलोखा आणि आत्मीयतेची भावना कायम ठेवू शकलो नाही, तर आपण कधीच प्रगती करू शकणार नाही. विकासाच्या मार्गात नेहमीच अडथळे येत राहतील. देशात शांतता आणि एकता नसेल, तर भरभराट, आरोग्यसंपन्न समाज आणि रोजगार निर्मितीच्या पुढाकाराला कुठलाच अर्थ उरणार नाही. आज समाजाला खर्‍या अर्थाने कुठल्या गोष्टीची गरज असेल, तर ती केवळ शांतता, एकता आणि सलोख्याचीच आहे.
शांतता आणि सलोखा हीच आपली संस्कृती आहे. याच संस्कृतीत आपण वाढलो आहोत. त्यामुळे त्याचे जतन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. स्वामी विवेकानंदांनीही समाजाला हीच शिकवण दिली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26499

Posted by on Jan 13 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (920 of 2477 articles)


=राजनाथसिंह यांची भूमिका= नोएडा, [१२ जानेवारी] - पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सूत्रधारांवर कारवाई करण्याचे ठोस आश्‍वासन ...

×