Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » एकविसावे शतक भारताचेच : मोदी

एकविसावे शतक भारताचेच : मोदी

modi at Shri Mata Vaishno Devi Universityकटरा, [१९ एप्रिल] – आता आपण एकविसाव्या अर्थात ज्ञानाच्या युगात प्रवेश केला आहेे आणि हे शतक केवळ भारताचेच राहणार आहे. आपल्या देशातील ८० लाख लोकसंख्या ३५ वर्षे वयोगटाच्या आत असल्याने प्रत्येक तरुणाचे स्वप्नच देशाच्या विकासाची गाथा ठरणार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मोदी बोलत होते.
मोदींनी दिला अटलजींचा संदर्भ
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगिण विकासावर भर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही संदर्भ दिला.
इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियत हेच राज्याच्या विकासाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत, असे अटलजी नेहमीच सांगायचे, याकडे नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले. जम्मू-काश्मिरातील नागरिकांचा अटलजींवर प्रचंड विश्‍वास होता. अशाप्रकारचा सन्मान फारच कमी नेत्यांना मिळाला आहे. जम्मू-काश्मीरला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे असेल, तर इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियत हे तीन स्तंभ मजबूत असायलाच हवे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाआधी झालेल्या श्री वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते.
राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याही मनात राज्याच्या विकासाचाच विचार नेहमी असायचा. विकासाशिवाय दुसरा विकास त्यांच्या मनात येत नव्हता. जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर कमी व्हावे, यासाठी ते सातत्याने झटले. आता मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनादेखील विकासाचाच ध्यास लागला आहे. राज्याच्या उज्ज्वल भवितव्यावरच त्या बोलत असतात. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात विकास आहे, त्या राज्याला विकासापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
दीपा कर्माकरचे कौतुक
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातून पात्र ठरलेल्या त्रिपुराच्या दीपा कर्माकरचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जाहीर कौतुक केले. प्रचंड परिश्रम आणि निर्धाराने तिने देशाचा मान वाढविला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला जिम्नॅस्ट म्हणून दीपाच्या रूपात प्रथमच एका भारतीय कन्येची निवड झाली आहे. देश आणि देशवासीयांसाठी हा क्षण गौरवाचा असाच आहे. घरातील परिस्थिती, संसाधनांची कमतरता यासारख्या अडचणी तिच्या मार्गात आडकाठी ठरू शकल्या नाही, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
काश्मिरींचे दु:ख दूर व्हायला हवे : मेहबुबा
काश्मिरी नागरिकांचे दु:ख दूर व्हायला हवे. येथील तरुण रोज नव्या संकटाचा सामना करीत असतो. सर्व समस्यांवर मात करून राज्यातील तरुणांनाही राष्ट्रीय विकासात योगदान देणे शक्य होईल, अशा वातावरणाची निर्मिती करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. याच महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मेहबुबा प्रथमच जाहीर समारंभात सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तान, सीरिया आणि लिबिया यासारख्या मुस्लिम देशांतील अस्थिरतेचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पाकमध्ये सरकार आपल्याच नागरिकांविरुद्ध लढा देत आहे. सुन्नी पंथीयांचे लोक शिया पंथीयांना ठार मारत आहेत. भारतात जन्मल्याचा मला खरोखरच गर्व आहे. येथे विविध जाती-धर्माचे लोक शांततेत आणि सलोख्याने जीवन जगतात. असे असले, तरी काश्मिरींच्या मनात काही दु:ख आहे आणि ते दूर व्हायलाच हवे, अशी अपेक्षाही त्यांनी त्यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27929

Posted by on Apr 20 2016. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (458 of 2477 articles)


=इशरतप्रकरणी भाजपाचा हल्ला= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] - इशरत जहॉंप्रकरणी भाजपाने आज मंगळवारी थेट कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर हल्ला ...

×